रिलायन्स स्कॉलरशिप 2023 अर्ज सुरू; 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2 लाख स्कॉलरशिप | Reliance Foundation Scholarship 2023

 

मित्रांनो अशा अनेक प्रायव्हेट सेक्टर मधील कंपन्या आहेत तसेच फाउंडेशन आहेत, जे देशातील विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमान करिता स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यापैकी महत्त्वाची असणारी स्कॉलरशिप म्हणजे रिलायन्स फाउंडेशन तर्फे देण्यात येणारी रिलायन्स स्कॉलरशिप होय. या शिष्यवृत्ती प्रोग्राम अंतर्गत रिलायन्स स्कॉलरशिप 2023 करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहेत. 12 वी पास असलेले उमेदवार या Reliance Foundation Scholarship अंतर्गत लाभ मिळवू शकतात.

रिलायन्स स्कॉलरशिप 2023 अर्ज सुरू; 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2 लाख स्कॉलरशिप | Reliance Foundation Scholarship 2023

 

रिलायन्स फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या Reliance Scholarship 2023 करिता कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत, तसेच या स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख व इतर सर्व माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो रिलायन्स फाउंडेशन देशातील बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध करून देत असते. स्कॉलरशिप अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळते. यावर्षी करिता विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे असून सध्या अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर Reliance Foundation Scholarship 2023 अंतर्गत तुमच्याकरिता सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

 

रिलायन्स स्कॉलरशिप माहिती मराठी What is Reliance Scholorship:-

मित्रांनो दरवर्षी रिलायन्स फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते. Reliance Foundatio तर्फे राबवण्यात येणारी ही स्कॉलरशिप दरवर्षी 5 हजार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते. गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी चांगले शिक्षण मिळवता यावे, तसेच पदवी पूर्व महाविद्यालयीन शिक्षण मिळवता यावे याकरिता ही स्कॉलरशिप देण्यात येते. रिलायन्स कंपनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ही Reliance Scholarship 2023 आयोजित करीत असते. बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप अंतर्गत लाभ मिळवता येत आहे.

रिलायन्स स्कॉलरशिप करिता कोण अर्ज करू शकतो? Who can apply for Reliance Scholarship?

मित्रांनो या Reliance Foundation Scholarship अंतर्गत पदी पूर्व अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षामध्ये कोणत्याही शाखेत प्रवेश घेतलेला विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहे. जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि फर्स्ट इयर मध्ये तुमची ऍडमिशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात. तसेच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्व मार्गांनी मिळणारे घरगुती कौटुंबिक उत्पन्न हे 15 लाख रुपये पेक्षा कमी असावे. मुले तसेच मुली आणि दिव्यांग विद्यार्थी सुद्धा या Reliance Scholarship अंतर्गत अर्ज करू शकता.

स्कॉलरशिप किती मिळेल?

रिलायन्स फाउंडेशनच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या या स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण होण्याच्या कालावधीपर्यंत दोन लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांची भविष्य उज्वल करण्याकरिता करिअरच्या दृष्टीने सपोर्ट सिस्टम सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

Nikon Scholarship अंतर्गत 1 लाख रुपये स्कॉलरशिप करिता ऑनलाईन अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा 

रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप 2023 करिता अर्ज कसा करायचा? How to Apply for Reliance Scholorship?

मित्रांनो रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप 2023 अंतर्गत जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. खाली दिलेल्या अटी व शर्ती तसेच पात्रता वाचून घ्या. जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि पदवीच्या पहिल्या वर्षाकरिता प्रवेश घेतलेला असेल तर खालील लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 फेब्रुवारी 2023 असून त्यापूर्वी आपला अर्ज सादर करा.

येथे ऑनलाईन अर्ज करा

रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप करिता पात्रता Eligibility for Reliance Foundation Scholarship

1. या Reliance Foundation Scholarship प्रोग्राम अंतर्गत अर्ज करणारा उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असावा तसेच विद्यार्थ्याला बारावी मध्ये किमान 60 टक्के गुण असावे.
2. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवीच्या कोणत्याही शाखेमध्ये प्रथम वर्षाकरिता पूर्णवेळ प्रवेश घेतलेला असावा.
3. अर्ज करणारा विद्यार्थी हा आपल्या भारत देशाचा नागरिक असावा.
4. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांपेक्षा कमी असावी.

कोलगेट स्कॉलरशिप करिता अर्ज सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज 

रिलायन्स शिष्यवृत्ती ची वैशिष्ट्ये Features of Reliance Scholarship:

रिलायन्स फाउंडेशनच्या मार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची खालील प्रमाणे वैशिष्ट्ये आहेत.

1. पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये ऍडमिशन असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे.
2. कोणत्याही शाखेनुसार अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे.
3. मेरिट लिस्ट आधारावर विद्यार्थ्यांची निवड या स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत करण्यात येणार आहे.
4. बारावी उत्तीर्ण असलेल्या व पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये प्रवेश असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवता येणार आहे.
5. या स्कॉलरशिप अंतर्गत 5000 पर्यंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
6. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बरोबर आहे त्यांचे करिअर घडवण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

1 thought on “रिलायन्स स्कॉलरशिप 2023 अर्ज सुरू; 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2 लाख स्कॉलरशिप | Reliance Foundation Scholarship 2023”

  1. मी सेक्युरिटी चे काम करतो माझा मुलगा १२नंतर पहिल्या वर्षी होटेल मॅनेजमेंट कोर्स करत आहे त्याला शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल का?

    Reply

Leave a Comment