पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र; 40,889 रिक्त जागांकरिता बिना परीक्षा निवड होणार | Post Office Bharti Maharashtra 2023

मित्रांनो भारतीय डाक विभाग म्हणजेच इंडिया पोस्टाच्या मार्फत पोस्ट ऑफिस भरती 2023 राबविण्यात येत आहे. या post office bharti 2023 अंतर्गत एकूण 40,889 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत BPM/ABPM/ Dak Sevak ही पदे भरण्यात येणार असून या Post Office Bharti Maharashtra करिता विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारे ही भरती होणार आहे.

 

भारतीय डाक विभागाच्या मार्फत ही ग्रामीण डाक सेवक भरती 2023 राबविण्यात येत असून भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती indiapostgdsonline.gov.in या इंडिया पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही भरती एकूण 40,889 रिक्त जागांकरिता राबविण्यात येत Maharashtra Gramin Dak Sevak Bharti 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्य करिता 2508 रिक्त जागा उपलब्ध आहेत. अर्ज करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करायचे आहे.

New recruitment process is being implemented through post office. This Indian Postal Department Recruitment 2023 Maharashtra official notification has been released. The complete information regarding GDS Recruitment 2023 Maharashtra is as follow

 

इंडिया पोस्ट भरती महाराष्ट्र 2023 Post Office Bharti 2023 Maharashtra

मित्रांनो या पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्र अंतर्गत उमेदवारांना केवळ 100 रुपये फी पेड करावे लागेल. तसेच अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वय हे 18 ते 40 या दरम्यान असावे. तसेच अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा. उमेदवारांना 27 जानेवारी 2023 पासून 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मध्ये बिना परीक्षा थेट सरकारी मिळवण्याचीही तुमच्याकरिता एक अत्यंत चांगली संधी आहे. त्यामुळे सर्वांनी Post Office Bharti Maharashtra अंतर्गत अर्ज करावा.

 

 

पोस्ट ऑफिस भरती 2023 तपशील Post Office Recruitment 2023 Details

 • एकूण रिक्त जागा: 40889 जागा (2508 जागा महाराष्ट्र)
 • पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
 • शैक्षणिक पात्रता: देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बोर्डातून गणित आणि इंग्रजी या विषयांमधून 10वी उत्तीर्ण
 • वयोमर्यादा: 18 ते 40 वर्ष
 • अर्ज करण्याची फी: 100 रू (महिला तसेच ट्रान्सजेंडर व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना फी नाही)
 • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
 • वेतन: 10 ते 12 हजार रुपये
 • अर्ज सुरू होण्याचा दिनांक: 27 जानेवारी 2023
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 फेब्रुवारी 2023
 • निवड प्रक्रिया: दहावीच्या टक्केवारी नुसार मेरिट लिस्ट प्रमाणे
 • अधिकृत वेबसाईट (Official Website): येथे पहा
 • जाहिरात/ नोटिफिकेशन पीडीएफ: येथे पहा

पोस्ट ऑफिस भरती 2023 अर्ज कसा करायचा? How to Apply for Post Office Bharti 2023?

मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत राबविण्यात येणाऱ्या Maharashtra Gramin Dak Sevak Bharti 2023 अंतर्गत जर तुम्ही पात्र आणि इच्छुक उमेदवार असाल तर तुम्हाला शेवटच्या तारखेच्या पूर्वी ऑनलाइन पद्धतीने https://indiapostgdsonline.cept.gov.in या डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करायचा आहे. मित्रांनो या post office gds bharti maharashtra 2023 अंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे जर तुम्हाला दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले पर्सेंटेज मिळाले असेल तर तुमची निवड होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र 2023; अर्ज प्रक्रिया, पात्रता

अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार करण्यात येते आणि त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यात येत असते. या Maharashtra Post Office Bharti अंतर्गत केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करायचा असून उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑनलाईन भरताना कोणत्याही प्रकारची चुका होऊ देऊ नये. जर तुम्ही केलेला अर्ज चुकीचा असेल तर तो नाकारण्यात येऊ शकतो. GDS Bharai 2023 Maharashtra संदर्भात आवश्यक त्या सूचना तसेच सर्व माहिती तुम्हाला भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा Post Office Bharti 2023 संदर्भात विस्तृत माहिती हवी असल्यास तुम्ही डाक विभागाच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात. अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी भरतीची अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा.

पोस्ट ऑफिस भरती आवश्यक कागदपत्रे Required Documents For Post Office Recruitment 2023

पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत उमेदवारांकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

1. 10 वी गुणपत्रिका
2. 10 वी प्रमाणपत्र
3. संगणक प्रमाणपत्र
4. ड्रायव्हिंग लायसन्स
5. आधार कार्ड

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) भरती 2023 सुरू; 8169 पदांसाठी अर्ज सुरू

पोस्ट ऑफिस भरती संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!