पोक्रा योजना 2023; अर्ज प्रक्रिया, योजनांची यादी व लाभार्थी यादी | Pocra Yojana 2023 Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोक्रा योजना हे राबविण्यात येत आहे. या पोखरा योजनेच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. पोक्रा योजना 2023 अंतर्गत ज्या गावांमध्ये ही Pocra Yojana Maharashtra सुरू आहे, त्या गावातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत असतो. शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांचा समावेश पोखरा योजने अंतर्गत करण्यात आलेला असून शेतकरी बांधवांनी पोखरा अंतर्गत असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून त्यांचा आर्थिक विकास साधावा तसेच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्यातील अनेक गावांमध्ये राबविण्यात येत आहे.

पोक्रा योजना 2023; अर्ज प्रक्रिया, योजनांची यादी व लाभार्थी यादी | Pocra Yojana 2023 Maharashtra

 

पोक्रा योजना महाराष्ट्र माहिती Pocra Yojana Maharashtra :-

मित्रांनो पोक्रा योजना ही शेतकऱ्यांच्या हितार्थ राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना असून या योजनेअंतर्गत 15 जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील जवळपास 5142 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पोखरा योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या या गावातील शेतकऱ्यांना pocra yojana अंतर्गत विविध योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करता येतो. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्य शासनाच्या वतीने ही महत्वपूर्ण अशी योजना शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येत आहे.

Pocra Yojana 2023 अंतर्गत विविध योजनांकरिता योजनेच्या अनुसार 50% ते 80 टक्के पर्यंत अनुदान वितरित करण्यात येत आहे. पोखरा योजनेमध्ये मराठवाड्यातील तसेच विदर्भातील व इतरही विभागातील अनेक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पोक्रा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना Pocra Yojna Maharashtra List:-

पोखरा योजना अंतर्गत खालील प्रकारच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या प्रत्येक योजनेसाठी अनुदान हे वेगवेगळे आहे.  पोखरा योजना 2023 महाराष्ट्र (pocra yojana maharashtra 2023) अंतर्गत खालील प्रकारच्या अनेक योजना आपल्या राज्यात राबविण्यात येत आहेत.

1. नवीन विहीर बांधकाम करण्याकरिता अनुदान yojna- 2.50 लाख रुपये अनुदान
2. जुनी विहीर दुरुस्ती अनुदान
3. ठिबक सिंचन, तुषार सिंचन अनुदान
4. शेडनेट, पॉलिहाऊस करिता अनुदान
5. फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान
6. पाईप लाईन (PVC Pipe) अनुदान
7. मधुमक्षिका पालन अनुदान
8. मोटर पंप संच खरेदी अनुदान
9. शेततळे / सामुदायिक शेततळे
10. कुक्कुट पालन
11. नाडेप कंपोस्टिंग
12. जमीन आरोग्य सुधारणे अंतर्गत गांडूळ खत व नाडेप पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा उत्पादन आणि सेंद्रीय खत निर्मिती
13. शेतकरी गटांसाठी कृषी प्रक्रिया उद्योग
14.  मृदा व जलसंधारण संबंधित योजना

या व्यतिरिक्तही अनेक प्रकारच्या योजना या पोखरा योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत राबविण्यात येत असून सविस्तर माहिती Pocra Yojna Maharashtra च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पोक्रा योजना अर्ज कसा करायचा? How to apply Pocra Yojana?

मित्रांनो पोक्रा योजना अंतर्गत लाभ मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पोखरा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा पोकरा मोबाईल ॲप्लिकेशन वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. Pocra Yojana 2023 अंतर्गत अर्ज करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

1. सर्वप्रथम पोखरा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. Pocra Yojana Website
3. किंवा तुमच्या मोबाईल मध्ये पोखरा योजनेचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.
4. आता योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम वैयक्तिक शेतकरी म्हणून नोंदणी करायची आहे.
5. तुमच्या आधार कार्ड चे साह्याने तुमची सर्व वैयक्तिक तसेच जमिनीची व इतर सर्व माहिती टाकून पोखरा योजनेची नोंदणी करून घ्या.
6. आता नवीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड आणि ओटीपी च्या साह्याने लॉगिन करून घ्या.
7. पोखरा योजनेच्या होम पेजवर आल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा नावाचा पर्याय दिसत असेल किंवा अनेक प्रकारच्या योजना दिसत असेल.
8. आता तुम्हाला पोखरा योजनेअंतर्गत जा घटकाकरिता अर्ज करायचा आहे ती बाब या ठिकाणी निवडा.
9. त्या योजनेवर क्लिक करून त्या योजने संदर्भात अर्जाची माहिती भरा आणि शेवटी अर्ज सबमिट करा.
10. पोखरा योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर एसएमएस प्राप्त होणार आहे.

अशाप्रकारे आपण पोखरा योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो.   पोखरा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशन वरून आपण या प्रकल्पा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांकरिता अर्ज करू शकतो.

 

Maha Dbt शेतकरी योजना नवीन अर्ज सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज 

पोक्रा योजना अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो?Who can get benefit under POKRA Yojana?

ज्या गावांचा समावेश पोखरा योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. अशाच शेतकऱ्यांना पोखरा योजना 2023 अंतर्गत लाभ मिळवता येणार आहे. Pocra Yojana 2023 अंतर्गत तुमचे गाव समाविष्ट आहेत का? हे चेक करण्याकरिता तुम्ही पोखरा योजना महाराष्ट्र अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात. Pocra Yojana Maharashtra अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येतो.

पोखरा योजना लाभार्थी निवड प्रक्रिया Pocra Yojana Beneficiary Selection Process:-

मित्रांनो पोक्रा योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज केल्यानंतर तुम्ही ज्या योजना करिता अर्ज केलेला आहे. त्या योजनाचा शासनाच्या वतीने ठरवून देण्यात आलेल्या लक्षांक पाहून त्या घटकासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येत असते. जर Pocra Yojana Maharashtra अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या एखाद्या योजनेसाठी जर लक्षांक पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले असेल तर लाभार्थींची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना पोखरा योजनेच्या घटकाकरिता त्यांची निवड झाल्याचा एसएमएस प्राप्त होत असतो. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची निवड झाल्यानंतर पोखरा योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन पुढील प्रक्रिया करावी लागते.

पोक्रा लाभ वितरण प्रक्रिया POKRA Benefit Disbursement Process:-

Pokra Yojana अंतर्गत लाभार्थ्यांची निवड सुरुवातीला करण्यात येते. ज्या घटकाकरिता लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्या घटकासाठी त्या शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत असते. पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कोणतीही प्रकारची कामे करायची असतात. पुरस मध्ये पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना योजनेचे काम सुरू करायचे असते. योजनेअंतर्गत ज्या घटकाकरिता शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांचे अधिकृत जीएसटी बिल तसेच त्या योजने संदर्भात इतर महत्त्वाची कागदपत्रे शेतकऱ्यांना ऑनलाइन अपलोड करावे लागतात.

पूर्वसंमती पत्र व योजनेत संबंधित सर्व बिले व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर मोका तपासणी करिता पोक्रा योजनेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन पाहणी करतात. त्यानंतर योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोखरा योजनेचे अनुदान जमा करण्यात येत असते.

पोखरा योजना आवश्यक कागदपत्रे Required Documents For Pocra Yojana Maharashtra :-

मित्रांनो पोखरा योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांकडे खालील प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. शेतकऱ्यांचे आधार कार्ड
2. शेत जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा
3. शेतकऱ्यांची बँक पासबुक(बँक पासबुक आधार कार्ड सोबत संलग्न असावे)
4. शेतकऱ्यांचे आधार कार्ड सोबत त्यांचा मोबाईल नंबर लिंक असावा.
5. पूर्व समिती पत्र (योजने करिता निवड झाल्यानंतर मिळते)
6. योजने संदर्भातील सर्व जीएसटी बिल(निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अंतिम लाभ मिळवण्याकरिता gst बिल द्यावे लागते)
8. योजनेनुसार योजनेप्रमाणे इतर महत्त्वाची कागदपत्रे
9. इतर दस्तऐवज योजनेनुसार

पोक्रा योजना लाभार्थी यादी जाहीर; अशी करा डाऊनलोड

 

अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला या योजनेअंतर्गत आवश्यक असतात. सुरुवातीला या योजनेअंतर्गत नोंदणी करण्याकरिता आपल्याकडे सातबारा, आठ अ आणि आधार कार्ड इत्यादींची गरज असते. उर्वरित कागदपत्रे योजने अंतर्गत निवड झाल्यानंतर आपल्याला आवश्यक असतात.

शेतकरी मित्रांनो पोखरा योजना महाराष्ट्र संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. Pocra Yojana संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला असलेल्या अडचणीची नक्कीच समाधान आम्ही करू. ही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment