पी एम किसान योजना 14 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार | PM Kisan Yojana 14th Installment

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. पी एम किसान योजना ही केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे याकरिता सुरू करण्यात आलेली आहे. पी एम किसान योजना अंतर्गत राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रू अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. आत्ता पर्यंत पी एम किसान योजना अंतर्गत 13 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे. आणि आता पी एम किसान योजना 14 वा हप्ता(PM Kisan Yojana 14th Installment) वितरित करण्यात येणार आहे. पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

देशातील तसेच राज्यातील सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. PM Kisan Yojana 14th Installment हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा 14 वा हप्ता राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार हे आपल्याला घरबसल्या चेक करता येणार आहे. त्यामुळे आपल्याला Pm kisan yojna 13th installment date ही माहिती असली पाहिजे.

 

देशातील सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजना अंतर्गत दरवर्षी दोन हजार रुपयाचे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये वितरित करण्यात येत असतात. पी एम किसान योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये बारावा हप्ता जमा झालेला असून आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान 14 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे.

पी एम किसान 14 वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार असे चेक करा? Check which farmers will get PM Kisan 14th installment?

मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता देशातील काही शेतकऱ्यांना मिळणार नाही, त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पुढील हप्ता आपल्याला मिळणार का हे आपण जाणून घेतले पाहिजे. देशातील अनेक शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ई केवायसी अजून केलेली नाही. त्यामुळे पी एम किसान केवायसी न करणारे देशातील अनेक शेतकरी या तेरावा हप्ता मिळण्यापासून वंचित राहणार आहे.

पी एम किसान 14 वा हप्ता मिळणार का ते असे चेक करा.

1. सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2. या वेबसाईटवर होम पेजवर आल्यानंतर आता तुमच्यासमोर farmers corner हा एक पर्याय दिसत असेल त्यावर क्लिक करा.

3. आता benificery list या पर्यायावर क्लिक करा.

4. आता तुमच्यासमोर सर्व तुमची माहिती ओपन झालेली आहे जर तुमच्या पीएम किसान योजनेचे स्टेटस yes असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेचा पुढील आता हप्ता मिळवण्यास पात्र आहात.

5. जर त्या ठिकाणी रिजेक्टेड असे स्टेटस असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा पुढील हक्का मिळणार नाही.

 

 

पी एम किसान योजना 14 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही These farmers will not get the 14th installment of PM Kisan Yojana:-

शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्यांनी अजून पर्यंत पीएम किसान योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान 14 वा हप्ता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही अजून पर्यंत पीएम किसान केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून PM Kisan Yojana 13th Installment मिळवण्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची पीएम किसान अर्ज चुकलेले आहेत तसेच शेतकऱ्यांची बँक अकाउंट नंबर किंवा आयएफसी कोड किंवा इतर माहिती चुकलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान 14 वा हप्ता येणार नाही.

 

महत्वाचं अपडेट: सलोखा योजना महाराष्ट्र सुरू; आता शासन सोडविणार जमिनीचे भांडणे

त्यामुळे जर तुमची कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती असेल तर लवकरात लवकर योजनेचा तुम्ही केलेला अर्ज व्यवस्थितपणे करून घ्यावा.

 

पी एम किसान योजना हप्ता संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच योजना विषयक माहिती जाणून घेण्यासाठी या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment