मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिक विमा 2022 करिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. खरीप पीक विमा योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात आलेली होती. त्याच अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने खरीप पीक विमा 2022 चे पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे याकरिता 724 कोटी रुपये पिक कंपनीस वितरित केले आहेत. त्यामुळे आता पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आजच्या पोस्ट मध्ये आपण पिक विमा 2023 संदर्भात अपडेट जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात खरीप पिक विमा 2022 ही राबविण्यात आली होती. याच खरीप हंगामाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिक विमा कंपनीस 724 कोटी रुपये वितरित करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आलेली असून यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय 13 जानेवारी 2013 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिक विमा 2023(pik vima 2023) वितरित होऊ शकणार आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यात पिक विमा योजना 2023-23 ही भारतीय कृषी विमा कंपनी, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच कंपन्यांच्या मार्फत राबविण्यात आलेली होती.
पीक विमा योजना 724 कोटी मंजूर Pik Vima Yojana Maharashtra :-
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप व्हावे याकरिता राज्य शासनाच्या वतीने त्यांच्या हिष्यची 724 कोटी रुपये इतकी रक्कम ही विमा कंपनी ला वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. विमा कंपनी मार्फत राज्य शासनाकडे अनुदान मागणी केली होती. ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच विमा कंपन्या शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2022 वितरित करतील अशी आशा व्यक्त करूया.
महत्वाचं अपडेट: अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरित करण्याकरिता 675 कोटी रुपये मंजूर; GR डाऊनलोड करा
पिक विमा 724 कोटी वितरण GR डाऊनलोड करा :-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिक विमा राज्य शासन हिष्या पोटी 724 कोटी वितरण केले असून त्या बाबत महत्वपूर्ण असा शासन निर्णय हा राज्य शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. पीक विमा 2023(pik vima 2023) निधी वितरणाचा शासन निर्णय आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. खालील लिंक वर पिक विमा शासन निर्णय डाउनलोड करून घ्या.
पीक विमा निधी वितरण शासन निर्णय (GR) येथे डाऊनलोड करा
पीक विमा योजना महाराष्ट्र निधी वितरण संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या या वेबसाईटवर भेट देत रहा.