एक देश एक खत योजना 2023; जाणून घ्या संपूर्ण माहिती | One Nation One Fertilizer Yojana

 

मित्रांनो आपल्या देशामध्ये केंद्र शासनाच्या संकल्पनेतून एक देश एक खत योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. One Nation One Fertilizer ची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असून लवकरच तुम्हाला एक देश एक खत योजना अंतर्गत सर्व खते पाहायला मिळणार आहे. ही योजना काय आहे? या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

एक देश एक खत योजना 2023; जाणून घ्या संपूर्ण माहिती | One Nation One Fertilizer Yojana

 

आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा एकच ब्रँड व एकच लोगो असावा या दृष्टीने प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना राबविण्याचा निर्णय हा केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. ही One Nation One Fertilizer Scheme आपल्या देशामध्ये राबविण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या.

 

एक देश एक खत योजना अंतर्गत होणारे बदल:

मित्रांना आपल्या देशामध्ये एक देश एक खत योजना(ek desh ek khat yojana)लागू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व खतांकरीता एकच ब्रँड व एकच नाव असणार आहे. मित्रांना अनेक रासायनिक कंपन्या आहेत ज्या डीएपी, एमओपी तसेच युरिया, एमपीके अशा प्रकारची अनेक रासायनिक खते उत्पादन करत असतात. आता या कंपन्यांचे एकच ब्रँडच्या नावाने मार्केटिंग करण्यात येणार आहे, जसे की युरिया हे खात असेल तर त्यावर भारत युरिया तसेच डीएपी करिता भारत डीएपी अशाप्रकारे असणार आहे. या योजनेअंतर्गत रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपन्या प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजनेच्या नावासह छापलेल्या बॅग वापरतील तसेच या खतांच्या बॅगवर एका साईटला छपाई करण्यात येईल त्यामध्ये प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना चे नाव आणि लोगो यांचा समावेश असेल आणि उरलेल्या भागांवर कंपन्या त्यांची कंपनीची नाव व ब्रॅण्डिंग करू शकतात.

 

महत्वाचं अपडेट: आभा हेल्थ आयडी कार्ड वितरण सुरू; असे काढा आभा कार्ड ऑनलाईन

त्याचबरोबर कंपन्यांना विविध कृषी आणि खतांच्या संबंधित कायद्याची माहिती छापण्याच्या सल्ला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या वतीने खतांवर देण्यात येणारे सबसिडी सुद्धा या पिशव्यांवर छापण्यात येणार आहे. अशाप्रकारे आता बाजारामधून जुन्या खतांच्या जागा नष्ट होणारा असून नवीन One Nation One Fertilizer Scheme 2023 अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या बॅगांचा समावेश असणार आहे

 

वन नेशन वन फर्टीलायझर संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. अशा प्रकारच्या विविध योजना संदर्भातील माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment