मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यामध्ये राबवलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना ही राज्यात सुरू आहे. पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान योजनेच्या आतापर्यंत तीन याद्या प्रकाशित झालेल्या असून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50 हजार प्रोत्साहनची रक्कम जमा झालेली नाही. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने 17 जानेवारी 2023 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच पन्नास हजार प्रोत्साहन योजनेच्या यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. या Niyamit Karjmafi 50000 Anudan Yojana अंतर्गत निधी वितरण संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार 50000 प्रोत्साहन रकमेची वितरण करण्याकरिता 700 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात सन 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अल्पमुदती पीक कर्जाची किमान दोन वर्षे परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या 50000 Anudan Yojana Maharashtra अंतर्गत पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे.
50000 प्रोत्साहन रकमेची 700 कोटी कुणाला मिळणार? 50000 Anudan Yojana Maharashtra
मित्रांनो 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना अंतर्गत आत्तापर्यंत तीन याद्या प्रकाशित झालेले आहेत. यामध्ये पहिल्या यादी मधील जवळपास सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण केलेले आहे. 6.50 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान मिळालेल्या असून उर्वरित शेतकरी अजूनही अनुदान बँकेत जमा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 50000 प्रोत्साहन रकमेच्या पहिल्या यादीतील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे आतापर्यंत प्रकाशित झालेल्या 50000 Anudan Yojana यादीतील आधार प्रमाणीकरण केलेल्या परंतु प्रोत्साहन न मिळालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
महत्वाचं अपडेट: आता धरणातील गाळ तुमच्या शेतात फ्री मध्ये टाकण्यात येणार! असा करा अर्ज
नियमित कर्जमाफी करिता आत्तापर्यंत मंजूर केलेली रक्कम किती? Niyamit Karjmafi Nidhi Vitarit
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित Niyamit Karjmafi Yojana च्या पन्नास हजार प्रोत्साहन योजना अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये लाभाचे वितरण करण्यात येणार होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पहिले हप्त्याकरिता 2350 कोटी तर दुसऱ्या हप्त्याकरिता 650 कोटी रुपये तर आता 17 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित केलेल्या शासन निर्णयानुसार 700 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आतापर्यंत एकूण 3700 कोटी रुपये नियमित कर्जमाफी अंतर्गत बसलेल्या शेतकऱ्यांकरिता मंजूर केलेले आहेत.
700 कोटी मंजूर केल्याचा शासन निर्णय जाहीर:
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सातशे कोटी रुपये मंजूर करून महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करून हे पैसे वितरित करण्यास मान्यता दिली आहे. शासन निर्णय पाहायचा असल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
मित्रांनो वरील लिंक करून तुम्ही शासन निर्णय पाहू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या निधी नुसार आता प्रत्यक्ष असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच 50000 प्रोत्साहन रकमेची वितरण करण्यात येणार आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा माहितीकरिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.