निकॉन स्कॉलरशिप अर्ज सुरू; मिळवा 1 लाख रुपये स्कॉलरशिप | Nikon Scholarship 2023

 

मित्रांनो निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत फोटोग्राफी क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता स्कॉलरशिप उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निकॉन कंपनी अंतर्गत स्कॉलरशिप प्रोग्राम राबविण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही बारावी पास असाल आणि फोटोग्राफी क्षेत्राचे शिक्षण घेत असाल तर एक लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळण्याची ही तुमच्याकरिता चांगली संधी निर्माण झालेली आहे. या Nikon Scholarship संदर्भात अर्ज प्रक्रिया तसेच पात्रता व इतर माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

निकॉन स्कॉलरशिप अर्ज सुरू; मिळवा 1 लाख रुपये स्कॉलरशिप | Nikon Scholarship 2023

 

मित्रांनो निकॉन स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निकोन या कंपनीतर्फे राबविण्यात येणाऱ्या या स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच पात्रतेचे निकष व इतर सर्व माहिती आपण खाली जाणून घेत आहोत. समाजातील कमी उत्पन्न असणाऱ्या वंचित गटातील विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिप करिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अनेक कंपन्या त्यांच्या सीएसआर प्रोग्राम अंतर्गत अशा स्कॉलरशिप आयोजित करीत असतात. या Nikon Scholarship 2023 अंतर्गत फोटोग्राफी संबंधित अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

निकॉन स्कॉलरशिप अंतर्गत पात्रता Eligibility under Nikon Scholarship :-

1. अर्ज करणारा विद्यार्थी हा फोटोग्राफी संबंधित कोर्स करणारा असावा.
2. फोटोग्राफीचा कोर्स हा तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी करिता असावा.
3. अर्जदार हा 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
4. अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे.

स्कॉलरशिप किती मिळणार?

मित्रांनो या निकॉन स्कॉलरशिप प्रोग्राम(Nikon Scholarship Program 2023)अंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदारांना एक लाख रुपये पर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे.

हे नक्की वाचा: डिमॅट अकाउंट म्हणजे काय? ते कसे ओपन करायचे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-

या Nikon Scholorship अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी 2023 आहे.

निकॉन स्कॉलरशिप करिता अर्ज कसा करायचा? How to Apply for Nikon Scholorship :-

मित्रांनो Nikon Scholarship 2023 मार्फत राबविण्यात येणाऱ्या या स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत फोटोग्राफी मध्ये शिक्षण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची लिंक 

मित्रांनो जर तुम्ही सुद्धा फोटोग्राफी संबंधित शिक्षण घेत असाल किंवा कोणताही फोटोग्राफी संदर्भातील कोर्स करत असाल, तर या निकॉन स्कॉलरशिप अंतर्गत तुम्ही पात्र आहात. वरील लिंक वरून अंतिम तारखेच्या आत तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.

वरील स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा इतर माहिती आवश्यक असल्यास, तुम्ही निकॉन इंडियाच्या संकेतस्थळावर भेट देऊ शकतात, किंवा अर्ज करण्याच्या लिंक करून अधिक माहिती मिळवू शकतात.

Leave a Comment