नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया 2023 सुरू; असा मिळवा मोफत प्रवेश | Navoday Admission 2023-24

 

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या पाल्याला नवोदय शाळेमध्ये टाकायचे असेल, तर सध्या नवोदय विद्यालयामध्ये वर्ष 2023 करिता प्रवेश देणे सुरू झालेले आहे. Navoday Admission 2023-24 मिळवण्याकरिता तुम्हाला अर्ज करायचा आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण नवोदय विद्यालय प्रवेश मिळण्यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया 2023 सुरू; असा मिळवा मोफत प्रवेश | Navoday Admission 2023-24

 

मित्रांनो नवोदय विद्यालय मध्ये तुम्ही तुमच्या पाल्याला मोफत उच्च दर्जाचे शिक्षण शिकवू शकतात. भारत सरकारच्या अंतर्गत संपूर्णतः निवासी स्वरूपाचे असणारे हे जवाहर नवोदय विद्यालय आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा राहणीमानाचा खर्च सरकार उचलते. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. Navoday Admission 2023 ह्या सुरू झालेल्या असून त्याकरिता नवीन अर्ज करता येत आहेत. मित्रांनो नवोदय विद्यालयामध्ये तुमच्या पाल्यांना शिक्षण मिळवायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला निवड चाचणी परीक्षा द्यावी लागते. नवोदय विद्यालयामध्ये सन 2023-24 करिता इयत्ता सहावी मध्ये Navoday Admission करिता निवड चाचणी परीक्षेची ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.

नवोदय विद्यालयात प्रवेश मिळण्याकरिता अर्ज कसा करायचा? How to Apply for Navoday Admission 2023

मित्रांनो जर तुम्ही सुद्धा तुमच्या पाल्यांना नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश देऊ इच्छित असाल तर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश 2023 करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration या लिंक वरून विद्यार्थ्यांनी अर्ज करावयाचा असून अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारची शुल्क तुम्हाला अदा करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांना अर्ज करत असताना विद्यार्थी पाचवी इयत्ता मध्ये ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतील मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील सर्टिफिकेट चा नमुना हा त्यांना अपलोड करायचा आहे.

जर विद्यार्थ्यांना अपलोड करावयाचा नमुना पाहिजे असेल तर त्यांनी http://www.navodaya.gov.in या वेबसाईटवरून डाउनलोड करावा.

नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा कधी होणार?

मित्रांनो नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळण्याकरिता विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा द्यावयाची असून ही परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी शनिवार या दिवशी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 दरम्यान होणार होणार आहे.

नवोदय विद्यालय प्रवेशा करिता आवश्यक कागदपत्रे Required Documents for Navoday Admission

मित्रांनो Navoday Vidyaalay मध्ये ऍडमिशन मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावे लागतात ती खालील प्रमाणे आहेत.

1. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
2. विद्यार्थ्यांची तसेच पालकांची सही
3. विद्यार्थ्यांचा फोटो

वरील कागदपत्रे ही जेपीजी फॉरमॅट मध्ये अपलोड करावयाची असून त्या कागदपत्रांची साईज 10 kb ते 100 kb पर्यंत असावी. तसेच कागदपत्रे ही स्कॅन करून अपलोड करावी.

नवोदय विद्यालय प्रवेशा करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख Last Date For Javahar Navoday Admission

नवोदय विद्यालय मध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता प्रवेश करण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी 2023 आहे.

अशाप्रकारे नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावी करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून या संदर्भात विस्तृत माहिती करिता Navoday Vidyaalay च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती मिळवू शकतात.

 

ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटत असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!