राष्ट्रीय पशुधन अभियान 2023; शेळी व मेंढी पालन करिता 50 लाख अनुदान | National Livestock Mission 2023

 

राष्ट्रीय पशुधन अभियान हे केंद्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान 2023 आपल्या राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत 500 शेळ्या किंवा मेंढ्याचा प्रकल्प उभारण्याकरिता 50 लाख रुपयांपर्यंतच अनुदान लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत असते. याकरिता 50 टक्के अनुदान हे लाभार्थ्यांना मिळणार आहे. National Livestock Mission काय आहे? तसेच या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना त्याकरिता लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

राष्ट्रीय पशुधन अभियान 2023; शेळी व मेंढी पालन करिता 50 लाख अनुदान | National Livestock Mission 2023

 

 

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना Rashtriya Pashudhan Abhiyan Scheme:-

1. शेळी व मेंढी पालन प्रकल्प उभारणी अनुदान

2. कुकुट पालन अनुदान योजना

3. वराह पालन अनुदान योजना

4. वैरण विकास योजना(मुरघास निर्मिती प्रकल्प योजना)

5. याव्यतिरिक्त पशुपालनाच्या योजना

 

मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या National Livestock Mission Scheme 2023 अंतर्गत वरील प्रकारच्या अनेक योजना आपल्या राज्यात राबविण्यात येत आहेत. याकरिता 50 टक्के अनुदान मिळणार असून 50 लाख रुपये पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे.

 

मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला मंजुरी देण्यात आलेली असून या Rashtriya pashudhan vikas abhiyan अंतर्गत राज्यात विविध प्रकारचे शेळी व मेंढी पालनाचे प्रकल्प तसेच कुक्कुटपालनाची व वराह पालन आणि मुरघास निर्मितीचे प्रकल्प उभारण्याकरिता अनुदान वितरण सुरू झालेल्या असून याकरिता अर्ज करायचे आहेत.

 

 

राष्ट्रीय पशुधन अभियान 2023 अंतर्गत अनुदान किती मिळणार? National Livestock Mission Yojana Anudan :-

मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत अनेक प्रकारच्या NLM Scheme 2023 राबविण्यात येणार असून त्याकरिता 50 टक्के पर्यंत अनुदान वितरित करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेळी व मेंढी पालन योजनेअंतर्गत 50 लाख रुपये पर्यंत अनुदान, तर वराह पालनाकरिता 30 लाख रुपये पर्यंत अनुदान, तसेच कुक्कुटपालनाकरिता 25 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.

 

या NLM scheme 2023 अंतर्गत तुमच्या प्रकल्पाच्या खर्चानुसार 50% पर्यंत अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. या National Livestock Mission Scheme Maharashtra 2023 अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना बँकेकडून कर्जाच्या रूपामध्ये मिळवावी लागेल किंवा स्वतःच्या स्वनिधी मधून खर्च करावे लागेल.

 

 

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत लाभ कोण मिळवू शकतो? NLM Scheme 2023 Maharashtra :-

मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियान 2023 सुधारित अंतर्गत खालील व्यक्ती किंवा संस्थांना लाभ मिळवता येतो.

1. वैयक्तिक लाभार्थी

2. स्वयंसहायता बचत गट

3. शेतकरी उत्पादक संस्था किंवा कंपनी

4. शेतकऱ्यांची सहकारी संस्था (जी कलम 8 अंतर्गत स्थापन झालेली असेल)

5. सह जोखिम गट

6. सहकारी दूध उत्पादक संस्था

7. खाजगी संस्था किंवा सहकारी संस्था किंवा स्टार्टअप ग्रुप

वरील लाभार्थ्यांना या राष्ट्रीय पशुधन अभियान 2023 अंतर्गत अर्ज करून लाभ मिळवता येतो.

 

 

महत्वाचं अपडेट: पशुसंवर्धन योजना 2023 महाराष्ट्र सुरू; आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

राष्ट्रीय पशुधन अभियान महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे:-

या National live stock mission 2023 Maharashtra अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आपल्याकडे खालील प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

1. डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल)

2. अर्जदाराची आधार कार्ड

3. अर्जदाराचे पॅन कार्ड

4. आयकर रिटर्न

5. अनुभव प्रमाणपत्र (जो प्रकल्प उभारणार असाल त्या व्यवसायाबद्दल अनुभव)

6. प्रशिक्षण प्रमाणपत्र

7. जमिनी बाबत कागदपत्रे

8. वार्षिक लेखा मेळ प्रमाणपत्र

9. Gst नोंदणी (असल्यास)

10. बँकेचा रद्द केलेला धनादेश

 

शेळी व मेंढी पालन योजनेसाठी अनुदान:

मित्रांना या Rashtriya pashudhan abhiyan अंतर्गत तुम्ही ज्या कोणत्याही योजनेचा प्रकल्प तयार करणार असाल त्या प्रकल्पावर झालेला एकूण भांडवली खर्चाच्या 50 टक्के अनुदान मिळणार आहे. शेळी व मेंढी पालन करिता खालील प्रमाणे अनुदान आहे.

1. 100 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 05 बोकड किंवा 05 नर मेंढा करिता 10 लाख रुपये अनुदान

2. 200 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 10 बोकड किंवा 10 नर मेंढा करिता वीस लाख रुपये अनुदान

3. 300 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 15 बोकड किंवा 15 नर मेंढा करिता 30 लाख रुपये अनुदान.

4. 400 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 20 बोकड किंवा 20 नर मेंढा करिता 40 लाख रुपये अनुदान

5. 500 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 25 बोकड किंवा 25 नर मेंढा करिता 50 लाख रुपये अनुदान

 

अशाप्रकारे या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत अर्जदारांना 50 टक्के पर्यंत प्रकल्पाच्या नुसार अनुदान मिळणार असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी बँकेच्या माध्यमातून किंवा स्वतः उभारू शकतात. 50 टक्के अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. उर्वरित असलेली 50% अनुदानाची रक्कम ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर अर्जदार लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

 

 

महत्वाचं अपडेट: 724 कोटी पिक विमा मंजूर; यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करून यादी डाऊनलोड करा

 

शेळी व मेंढी पालन तसेच वराह पालन आणि मुरघास निर्मिती करिता अर्ज कसा करायचा? How to Apply for National Livestock Mission 2023

राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजना अंतर्गत अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने केंद्र शासनाच्या नॅशनल national livestock mission च्या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. या Rashtriya pashudhan abhiyan 2023 अंतर्गत लाभ मिळवून इच्छिणाऱ्या अर्जदारांना nlm या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण वर दर्शवलेली कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करायची आहेत. योजनेअंतर्गत आपल्याकडे असलेली जास्तीत जास्त कागदपत्रे अर्जदारांनी अपलोड करावी जेणेकरून त्यांची निवड होईल व त्यांना लाभ मिळेल.

आत्ताच ऑनलाईन अर्ज येथे सादर करा

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना करिता संपर्क Rashtriya pashudhan vikas abhiyan Contact:-

राष्ट्रीय पशुधन अभियान सुधारित 2023 अंतर्गत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आपण राज्य पशुसंवर्धन विभागाच्या https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती मिळवू शकतात तसेच केंद्र शासनाच्या nlm पोर्टलवर देखील जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात. तसेच तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील अधिक माहिती करिता संपर्क करू शकतात.

Leave a Comment