मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू; नवीन GR आला 1 लाख सौर पंप मिळणार | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Maharashtra

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत असते, राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाची वितरण करण्यासाठी Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023 Maharashtra ही पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू; नवीन GR आला 1 लाख सौर पंप मिळणार | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Maharashtra

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023 :-

मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढून नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री सोलर पंप योजना हे राज्यात अनेक दिवसांपासून सुरू होती मध्यंतरी या योजनेअंतर्गत लाभ वितरण करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने योजना नव्या रूपाने पुन्हा ही Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana सुरू केली आहे. या योजनेच्या नवीन GR संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया.

 

शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख सौर कृषी पंप:

केंद्र शासनाच्या वतीने कुसुम सोलर पंप योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. Pm Kusum Yojana अंतर्गत राज्य करिता 2 लाख सौर कृषी पंप वितरित करण्यात येणार असून त्यापैकी 1 लाख सौर कृषी पंप हे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र(mukhymantri saur krushi pump Yojana 2023 Maharashtra) तसेच पीएम कुसुम सोलर योजना अंतर्गत एकूण 2 लाख सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.

 

महत्वाचं अपडेट: घरकुल योजना 2023 नवीन यादी जाहीर; आत्ताच डाऊनलोड करा 

पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रासाठी एकूण 2 लाख पारेषण विरहित सौर पंप मंजूर करण्यात आलेली असून त्यापैकी एक लाख सौर कृषी पंप शेतकऱ्यांना वितरित करण्याची अंमलबजावणी ही महाऊर्जाद्वारे करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या दोन लाख सौर कृषी पंपापैकी उर्वरित एक लाख सौर कृषी पंप हे स्टेट नोडल एजन्सी द्वारे महावितरण कंपनी मार्फत वितरित करण्यात येणार आहे. अशाप्रकारे यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप (Mukhyamantri Saur Krushi Pump) तसेच केंद्र शासनाच्या पीएम कुसुम योजना अंतर्गत 2 लाख सौर कृषी पंपाचे वितरण करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत 1 लाख सौर कृषी पंपाचे वितरण असे होणार :-

आपल्या महाराष्ट्र राज्यात स्टेट नोडल एजन्सी द्वारे एक लाख सौर कृषी पंपाची वितरण हे पीएम कुसुमंतर्गत प्राप्त झालेल्या दोन लाख सौर पंपापैकी करण्यात येणार आहे. Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023 अंतर्गत महा ऊर्जा म्हणजेच स्टेट मॉडेल एजन्सी ही या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र अंतर्गत वितरित करण्यात येणारे एक लाख सौर कृषी पंप वितरण करण्यासाठी नवीन पोर्टलची स्थापना केली आहे. याकरिता पोर्टलमध्ये समांतर अंमलबजावणी यंत्रणा म्हणून महावितरण कार्यवाही करणार आहे.

 

अनेक शेतकरी योजनांसाठी नवीन अर्ज सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज 

1 लाख सौर कृषी पंप वितरित करण्यासाठी शासन निर्णय जाहीर:-

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी पंप वितरित करण्याकरिता या योजनेअंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी नवीन शासन निर्णय काढून मान्यता दिलेली आहे. Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेला आहे. योजने संदर्भात अधिक माहिती करिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला अधिकृत शासन निर्णय वाचून घ्यावा. खालील दिलेल्या लिंक करून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा अधिकृत GR डाऊनलोड करा.

 

शासन निर्णय (GR) DOWNLOAD करण्याची लिंक

 

अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख सौर कृषी पंपाचे नवीन वितरण करण्यात येणार असून त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या विविध योजना संदर्भात माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment