मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र 2023; अर्ज प्रक्रिया, पात्रता | Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra

मित्रांनो आपल्या राज्यात मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 महाराष्ट्र सुरू करण्यात आलेली आहे. शासकीय यंत्रणेवरील कामकाजाचा अनुभव तसेच कामकाजाची माहिती तरुणांना व्हावी याकरिता राज्यात ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा ही योजना राज्यामध्ये राबविण्यात आलेली होती, आणि पुन्हा एकदा शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढून ही Mukhyamantri Fellowship Yojana 2023 राबविण्यास मान्यता दिली आहे. या पोस्टमध्ये आपण मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 संदर्भात विस्तृत माहिती तसेच अर्ज प्रक्रिया व पात्रता या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

 

मुख्यमंत्री फेलोशिप योजना राबविण्या मागचा उद्देश Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra

1. राज्यातील विविध प्रकारच्या विकास प्रक्रियेमधील असणारे सर्व टप्पे समजून घेता यावे.

2. शासकीय यंत्रणेतील विविध घटकांचा ताळ मिळत असेच निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा.

3. शासकीय यंत्रणेच्या कामकाजाबद्दल माहिती उपलब्ध करून देणे.

4. तरुणांमध्ये समाज सेवा करण्याची प्रेरणा तसेच प्रामाणिक वृत्ती व समर्पितपणा तयार करून सुजाण नागरिक व्हावेत.

5. तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा.

 

उतरण राज्यामध्ये 2015-16 पासून ते सन 2019-20 पर्यंत हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात आलेला होता. 30 जानेवारी 2020 ला नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून हा कार्यक्रम बंद करण्यात आला होता आणि आता पुन्हा 20 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढून मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 सुरू केलेली आहे.

 

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे फायदे Benefits of Mukhyamnatri Fellowship Scheme Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारा मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम हा एक महत्वपूर्ण असा कार्यक्रम आहे. या मुख्यमंत्री फेलोशिप योजना अंतर्गत राज्यातील तरुणांना राज्य सरकारचा एक भाग बनवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. युवकांमध्ये असणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची राज्य शासनाला सुद्धा मदत होते. युवकांना शासनासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो तसेच या Mukhyamantri Fellowship Yojana मुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती सुद्धा वाढते. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत तरुणांना जे मिळालेले ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे लोकांचा दृष्टिकोन विस्तार होतो.

महत्वाचं अपडेट: शेतकरी नुकसान भरपाई भरपाई वितरणाच्या प्रक्रियेत बदल; अशी मिळणार नुकसान भरपाई

त्याचबरोबर या फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कार्यालयीन वापराकरिता ईमेल आयडी तसेच तात्पुरते ओळखपत्र देण्यात येईल. तसेच दरमहा 70 हजार रुपये विद्या वेतन तसेच प्रवास खर्च व अनुषंगिक खर्चा करिता प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये असे मिळून एकूण 75 हजार रुपये मिळतील. निवड झालेल्यांना फेलोशिपच्या कार्यकाळामध्ये एकूण दहा दिवसांची सुट्टी मिळेल. त्याचबरोबर अपघात विमा कवच सुद्धा प्रदान करण्यात येईल.

 

मुख्यमंत्री फेलोशिप योजना करिता पात्रता Eligibility for Mukhymantri Fellowship Program

मुख्यमंत्री फेलोशिप योजना अंतर्गत काही पात्रता ठरवून देण्यात आलेले आहेत त्या खालील प्रमाणे आहे.

1. या प्रोग्राम अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार भारत देशाचा नागरिक असावा.

2. अर्जदाराकडे किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असायला हवा. जर अर्जदार व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तर त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अर्जदारांनी पूर्ण वेळ अप्रेंटशिप किंवा इंटर्नशिप हे एक वर्ष केलेले असावे.

3. अर्जदाराकडे मराठी तसेच हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेशी ज्ञान असावे. अर्जदाराला मराठी भाषा लिहिता व वाचता आली पाहिजे.

4. अर्जदाराकडे इंटरनेटचे पुरेसे ज्ञान असावे तसेच संगणक हाताळणी करता यावी.

5. अर्जदारांची वयोमर्यादा ही 21 वर्षे ते 26 वर्षे दरम्यान असावी.

6. अर्जदारांना अर्ज करण्याकरिता पाचशे रुपये इतके शुल्क भरावे लागेल.

 

मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत अर्ज कसा करायचा? How to Apply for Mukhymantri Fellowship Yojana

मित्रांनो मुख्यमंत्री फेलोशिप योजना अंतर्गत जर तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असाल तर तुम्हाला अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईन एप्लीकेशन सिस्टीमद्वारे अर्ज करावयाचा आहे. या मुख्यमंत्री फेलोशिप 2023 अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच महत्त्वाच्या तारखा या संदर्भात विस्तृत माहिती https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/indexmr.html या अधिकृत वेबसाईटवरून मिळवा.

 

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची अंमलबजावणी

1. या मुख्यमंत्री फेलोशिप महाराष्ट्र अंतर्गत अर्जदारांना निवड झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ 12 महिन्याचा असेल.

2. सर्व फेलोना एकाच दिवशी रुजू करण्यात येईल. त्यासाठी तारीख व वेळ निश्चित करून देण्यात येईल.

3. या प्रोग्राम अंतर्गत निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल.

4. ज्या कार्यालयामध्ये किंवा ज्या प्राधिकरणाकडे या योजनेअंतर्गत फेलों ची निवड होईल त्या ठिकाणचे काम अधिक प्रभावी व्हावे याकरिता फेलो काम करतील.

5. मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र अंतर्गत निवड झालेल्या फेलोंना आय आय एम नागपूर किंवा आयटी मुंबई यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

6. फेलोनी त्यांचा अभ्यासक्रम तसेच फील्ड वर्क पूर्ण केल्यानंतर फेलोशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल.

व्यवसायासाठी कर्ज मिळविण्यासाठी नवीन अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा

मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र संदर्भात विस्तृत माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा शासन निर्णय देखील वाचू शकतात. ही माहिती महत्त्वपूर्ण असेल तर इतरांना देखील शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!