महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) भरती 2023 सुरू; 8169 पदांसाठी अर्ज सुरू | MPSC Recruitment 2023

 

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहीर करण्यात आलेली आहे. या MPSC Recruitment अंतर्गत एकूण 8169 पदांची अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राबविण्यात येणारी ही एमपीएससी भरती 2023 ही मेगा स्वरूपाची आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) भरती 2023 सुरू; 8169 पदांसाठी अर्ज सुरू | MPSC Recruitment 2023

 

 

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेली गट ब आणि गट क संवर्गातील रिक्त पदे ही या mpsc bharti अंतर्गत भरण्यात येत आहे. तब्बल 85 वर्षानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदांकरिता MPSC Recruitment 2023 प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे. या एमपीएससी भरती अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा असून भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे आहे.

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती तपशील MPSC Bharti Details:

एकूण रिक्त जागा: 8169

परीक्षेचे नाव :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

वयोमर्यादा: पदानुसार वेगवेगळी अधिकृत जाहिरात पाहावी

शैक्षणिक अर्हता:

1) कर सहाय्यक / लिपिक-टंकलेखक – पदवीधर, टंकलेखन (मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.)

2) उर्वरित सर्व पदे – पदवी किंवा समतुल्य पात्रता

फी: सर्वसाधारण प्रवर्ग – 394 (आ.दु.घ/अनाथ, मागासवर्गीय यांना 294 रू फी)

अंतिम तारीख: 14 फेब्रुवारी 2023

 

महत्वाचं अपडेट: जिल्हा परिषद भरती 2023 सुरू; लगेच अर्ज करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 महत्वाच्या तारखा MPSC Bharti 2023 Important Dates :

1. अर्ज सुरू होण्याची तारीख: 25 जानेवारी 2023

2. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 फेब्रुवारी 2023

3. संयुक्त पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2023

4. मुख्य परीक्षा –(गट-ब 02 सप्टेंबर 2023) तर (गट-क 09 सप्टेंबर 2023)

 

विभागाचे नाव:

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत खालील विभागांमध्ये Maharashtra Public Service Commission (MPSC) Recruitment प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

1. सामान्य प्रशासन विभाग

2. महाराष्ट्र लोकसेवा आयोग

3. वित्त विभाग

4. गृह विभाग

5. महसूल व वन विभाग

6. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये

 

 

महत्वाचं अपडेट: पोलीस भरती च्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण आणि 6000 रुपये दरमहा Scholorship; ऑनलाइन अर्ज सुरू

पदाचे नाव व पदसंख्या:

1. सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे

2. सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे

3. राज्य कर निरीक्षक – १५९ पदे

4. पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे

5. दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे

6. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे

7. तांत्रिक सहायक – १ पद

8. कर सहायक – ४६८ पदे

9. लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) भरती 2023 सुरू; 8169 पदांसाठी अर्ज सुरू | MPSC Recruitment 2023

भरती तसेच जॉब विषयक अपडेट what’s app वर मिळविण्यासाठी येथे आत्ताच what’s app ग्रुप जॉईन करा.

 

एमपीएससी भरती 2023 अधिकृत नोटिफिकेशन:

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची अधिकृत पीडीएफ नोटिफिकेशन ही https://www.mpsc.gov.in/ या एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ नोटिफिकेशन एक वेळ अवश्य वाचून घ्यावी, नंतर अर्ज करावा.

 

Notification येथे पहा

 

एमपीएससी भरती 2023 अर्ज कसा करायचा? How to Apply for MPSC Recruitment 2023?

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राबविण्यात येणारी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब आणि गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही भरती मेगा स्वरूपाची असून आत्तापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या भरती पैकी सर्वात मोठी ही mpsc recruitment आहे. या mpsc bharti 2023 अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावा.

अर्ज येथे करा 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वरील प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या एमपीएससी भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास किंवा विस्तृत माहिती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.

Leave a Comment