म्हाडा लॉटरी 2023 अंतर्गत घर मिळवण्याकरिता अर्ज सुरू | Mhada Lottery Scheme Maharashtra 2023

 

मित्रांनो म्हाडा अंतर्गत सर्वसामान्य लोकांना अतिशय स्वस्त दरामध्ये घरे उपलब्ध करून देण्यात येत असतात. म्हाडा अंतर्गत घर मिळवण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत असतो. Mhada अंतर्गत 5990 घरांची ऑनलाईन लॉटरी निघालेली असून ज्यांना म्हाडा लॉटरी 2023 अंतर्गत स्वतःची घर मिळवायचे आहे त्यांनी अंतिम तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. आजच्या या पोस्टमध्ये Mhada Lottery Scheme 2023 Maharashtra आपण म्हाडा लॉटरी अंतर्गत घर मिळवण्याकरिता करावयाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

म्हाडा लॉटरी 2023 अंतर्गत घर मिळवण्याकरिता अर्ज सुरू | Mhada Lottery Scheme Maharashtra 2023

 

Mhada Scheme Maharashtra अंतर्गत पुणे येथे राहण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची घरे कमी खर्चामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही सर्व सामान्य व्यक्तीला या म्हाडा अंतर्गत घर मिळवण्याकरिता अर्ज करता येतो. Mhada Lottery 2023 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना अतिशय कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची घरे उपलब्ध करून देण्यात येते.

 

म्हाडा लॉटरी 2023 अंतर्गत घर कसे मिळवायचे?

मित्रांनो सर्वप्रथम Mhada Lottery Maharashtra 2023 अंतर्गत तुम्हाला जर घर मिळवायचे असेल तर नोंदणी करावी लागते त्यानंतर म्हाडा Mhada Yojana Lottery पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. सोडती मध्ये नाव असलेल्या अर्जदारांना म्हाडा अंतर्गत कमी पैशात घर उपलब्ध करून देण्यात येते.

1. सर्वप्रथम अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे. Mhada Lottery Scheme अंतर्गत ऑनलाइन अर्ज 5 जानेवारी 2023 ते 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी येथे करा

2. सोडती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 7 फेब्रुवारी 2023 असून ऑनलाईन पेमेंटची स्वीकृती 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत करण्यात येणार आहे.

3. स्वीकृती करिता अर्जाची सोडती करिता प्रारूप यादीची प्रसिद्धी 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत करण्यात येणार आहे.

4. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत स्वीकृत झालेल्या सर्व अर्जाची प्रारूप यादी ची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

5. म्हाडा योजनेची सोडत ही 24 फेब्रुवारी 2023 ला सकाळी दहा वाजता होणार आहे.

6. त्यानंतर माडाच्या सोडतीमध्ये म्हाडा 2023 लॉटरी अंतर्गत घर मिळालेल्या अर्जदारांची यादी तसेच प्रतिक्षा यादी म्हाडा योजनेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

महत्त्वाचं अपडेट: घरकुल योजना नवीन यादी 2023 जाहीर; कशी करा घरकुल यादी डाऊनलोड लगेच.

म्हाडा योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे Required documents for MHADA scheme

1. अर्जदाराचे आधार कार्ड

2. अर्जदाराची पॅन कार्ड

3. बँक पासबुकची झेरॉक्स किंवा बँकेचा रद्द केलेला धनादेश

4. ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक(व्हाट्सअप वाला मोबाइल नंबर)

5. पासपोर्ट आकाराचा फोटो

6. अधिवास पुरावा

7. उत्पन्न पुरावा

 

म्हाडा लॉटरी योजना अंतर्गत आवश्यक पात्रता व अटी Eligibility For Mhada Lottery Maharashtra:-

1. अर्जदाराने तसेच त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनेमधून एखादा भूखंड किंवा निवासी गाळा घेतलेला नसावा.

2. अर्जदाराचे अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

3. अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती तसेच विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लाभार्थीना जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

4. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

5. या म्हाडा लॉटरी संदर्भात अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे संपर्क करता येणार नाही. सर्व बाबी म्हाडा ऑनलाईन वेबसाईट वर चेक कराव्या.

6. अर्जदारांनी त्यांची बँकेची माहिती अचूक द्यावी.

7. मागील म्हाडा जाहिरात अर्जदाराने अर्ज केला असल्यास आत्ता सुद्धा तोच युजर आयडी वापरावा.

8. म्हाडा ऑनलाईन सोडतीत पात्र ठरलेल्या अर्जदारांना मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व जी.एस.टी. अदा करावा लागेल.

म्हाडा योजना संपर्क तसेच अधिकृत वेबसाईट:

अर्जदारांनी म्हाडा योजना अंतर्गत ऑनलाईन सोडत तसेच इतर सूचना व अधिक माहिती करिता www.mhadamaharashtra.gov.in तसेच https://lottery.mhada.gov.in संकेतस्थळावर भेट द्यावी. योजने संदर्भात संदर्भात काही अडचण असल्यास किंवा अधिकृत माहिती हवी असल्यास महाराचे अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. म्हाडाची लॉटरी निघाल्यानंतर वरील वेबसाईटवर चेक करू शकतात.

मित्रांनो आपण आजच्या या पोस्टमध्ये Mhada Lottery Scheme Maharashtra संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे. अधिक माहिती करिता अर्जदारांनी म्हाडा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. ही माहिती महत्त्वपूर्ण असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारचे योजना विषयी माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!