पोलीस भरतीच्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण व 6000 स्कॉलरशिप अर्ज सुरू | Mahajyoti Scholorship For Police Bharti Students

 

मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा पोलीस भरती अंतर्गत पोलीस भरतीचा फॉर्म भरणार असाल तर तुमच्या करिता एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर प्राप्त झालेली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना महाज्योती या संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण आणि दर महिन्याला 6000 रुपये स्कॉलरशिप वितरित करण्यात येणार आहे. महा ज्योतीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप कशी मिळवायची? Mahajyoti Scholorship For Police Bharti Students या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

पोलीस भरतीच्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण व 6000 स्कॉलरशिप अर्ज सुरू | Mahajyoti Scholorship For Police Bharti Students
पोलीस भरतीच्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण व 6000 स्कॉलरशिप अर्ज सुरू | Mahajyoti Scholorship For Police Bharti Students

 

महा ज्योती मोफत पोलीस भरती प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप माहिती Mahajyoti police bharti training and scholarship in Marathi :-

महाज्योती ही राज्य शासनाच्या अंतर्गत येणारी स्वायत्त संस्था आहे. महाज्योती ही इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग या घटकातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांसाठी निःशुल्क प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप उपलब्ध करून देते. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तसेच पोलीस भरती अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना मोफत निशुल्क प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप (Mahajyoti Police Bharti Free Coaching ) ही महा ज्योती तर्फे मिळणार आहे.

ज्याप्रमाणे अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांकरिता Barti संस्था आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता Mahajyoti ही संस्था आहे. Mahajyoti या राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थेअंतर्गत राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सरकारी तसेच निमसरकारी परीक्षांची तसेच भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोफत पणे प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप वितरित करण्यात येत असते.

मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. अनेक तरुण अशी आहेत जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत परंतु मोठमोठ्या शहरांमध्ये ते पोलीस भरतीचे क्लासेस लावू शकत नाहीत. गरीब घरातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये पोलीस भरतीचे क्लासेस लावणे शक्य नसल्यामुळे असे तरुण परिणामी क्लासेस लावणाऱ्या तरुणांच्या तुलनेने मागे राहतात त्यामुळे त्यांचे पोलीस बनण्याची स्वप्न अपूर्ण राहू शकते. त्यामुळे राज्य शासनाच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या अशा संस्था आहेत, ज्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप उपलब्ध करून देत असतात.

महा ज्योती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण 2023 अंतर्गत कोण लाभ मिळवू शकतो? Mahajyoti Police Bharti Training and Scholarship:-

MahaJyoti Police bharti mofat Prashikshan आणि स्कॉलरशिप अंतर्गत OBC, SBC, VJ, VJNT, NT-A, NT-B, NT-C, NT-D या प्रवर्गातील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप करिता लाभ मिळवता येतो. महा ज्योती ही संस्था वरील प्रकारच्या उमेदवारांकरिता विविध प्रकारची स्कॉलरशिप तसेच विविध प्रकारच्या परीक्षांकरिता मोफत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देते. Maha Jyoti Police bharti coaching and scholarship

महत्वाचं अपडेट: कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत वार्षिक 30 हजार रुपये स्कॉलरशिप अर्ज सुरू

महा ज्योती पोलीस भरती प्रशिक्षण आवश्यक कागदपत्रे Maha Jyoti Police Recruitment Training Required Documents:-

मित्रांनो महाज्योती या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप करिता उमेदवारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

1. ओळखपत्र
2. जातीचा दाखला
3. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
4. बारावी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र
5. आधार कार्ड
6. बँक पासबुक

वरील सर्व कागदपत्रे उमेदवारांना महाज्योती मोफत पोलीस भरती प्रशिक्षण करिता ऑनलाईन अर्ज करताना वरील कागदपत्रांवर स्वाक्षरी करून ही कागदपत्रे स्पष्ट ओळखू येईल अशी स्कॅन करून अपलोड करायची आहेत.

महा ज्योती मोफत पोलीस भरती प्रशिक्षण मिळणारी स्कॉलरशिप आणि प्रशिक्षणाचा कालावधी :-

मित्रांनो maha Jyoti या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरतीच्या मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप योजना अंतर्गत उमेदवारांना 4 महिन्याचे ऑफलाइन किंवा ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Maha Jyoti police bharti free coaching and scholarship अंतर्गत पोलीस भरतीची मोफत प्रशिक्षण ऑफलाइन मिळवणाऱ्या उमेदवारांना दरमहा 6000 रुपये विद्या वेतन मिळणार आहे. उमेदवारांचा प्रशिक्षणाचा कालावधी असेपर्यंत दरमहा 6 हजार रुपये स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळणार. महाज्योती च्या वतीने राज्यातील वरील प्रवर्गातील 400 उमेदवारांना मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप वितरित करण्यात येत आहे.

महत्वाचं अपडेट: वनरक्षक भरतीची जाहिरात या तारखेला येणार. या दिवशी होणार पेपर.

पोलीस भरती मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप अर्ज कसा करायचा? How to apply for maha Jyoti police bharti free training & scholarship :-

मित्रांनो जर तुम्ही महाज्योती मोफत पोलीस भरती प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज करणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम महा ज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. आता तुम्हाला notice board या पर्यावर जायचे आहे.
3. तुमच्यासमोर नोटीस मध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण-२०२३ असा ऑप्शन असेल त्या समोरील पर्यावर क्लिक करा.
4. सुरुवातीला या योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेली जाहिरात वाचून घ्या. नंतर संपूर्ण तपशील वाचा आणि खाली Registation Link या पर्यायावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख– 25 जानेवारी 2023

मित्रांनो अशा प्रकारे महा ज्योती तर्फे पोलीस भरतीच्या उमेदवारांकरिता मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या maha Jyoti Police bharti free coaching अंतर्गत अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज येथे करा.

पोलीस भरती मोफत प्रशिक्षण pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा –

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांपर्यंत ही माहिती नक्कीच शेअर करा. महा ज्योतीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोफत प्रशिक्षणासंदर्भात कोणतेही प्रकारची अडचण असेल तर आम्हाला कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला असलेल्या शंकांची नक्कीच आम्ही उत्तर देऊ. अशाच प्रकारच्या माहितीसाठी या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment