कृषी योजना 2023 महाराष्ट्र लिस्ट; राज्यात सुरू असलेल्या सर्व कृषी योजना | Krushi Yojana 2023 Maharashtra List

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक krushi yojana maharashtra सुरू आहेत. अनेक प्रकारच्या कृषी योजना समाजातील वेगवेगळ्या घटकांकरिता राबविण्यात येत असतात. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना वेळोवेळी राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असतात. आजच्या पोस्टमध्ये आपण राज्यात राबवण्यात येणाऱ्या संपूर्ण शेतकरी योजनांची यादी जाणून घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण कृषी योजना 2023 यादी(krushi yojana 2023 List) त्याचबरोबर त्या योजनेचा तपशील जाणून घेणार आहोत.

 

कृषी योजना 2023 महाराष्ट्र लिस्ट; राज्यात सुरू असलेल्या सर्व कृषी योजना | Krushi Yojana 2023 Maharashtra List
कृषी योजना 2023 महाराष्ट्र लिस्ट; राज्यात सुरू असलेल्या सर्व कृषी योजना | Krushi Yojana 2023 Maharashtra List

 

कृषी योजना महाराष्ट्र Krushi Yojana Maharashtra:-

आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट व्हावे तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे बळून जास्तीत जास्त नफा मिळवावा, शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्या, शेतकरी समृद्ध व्हावा या दृष्टीने अनेक प्रकारच्या krushi yojana आपल्या राज्यात राबविण्यात येत आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या हितार्थ राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कृषी योजनांची माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेत आहोत.

 

 

कृषी योजना महाराष्ट्र 2023 लिस्ट Krushi Yojana Maharashtra List 2023 :-

1. महाडीबीटी शेतकरी योजना Krushi Yojna:-

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवता यावा या दृष्टीने महाडीबीटी शेतकरी योजना ही महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर राबविण्यात येत असते. या महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सर्वप्रथम नोंदणी करून नंतर या योजनेअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही योजनेकरिता अर्ज करता येतो. या पोर्टलवर अनेक प्रकारच्या krushi yojana समाविष्ट आहेत, त्यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळवता येतो. महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून योजनेच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.

शेतकरी योजना 2023 अर्ज येथे करा 

2. पोक्रा योजना(नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) :-

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात 15 जिल्ह्यातील 5142 गावांमध्ये Pocra योजना राबविण्यात येत आहे. पोखरा योजनेअंतर्गत अनेक योजनांचा समावेश करण्यात आलेला असून ज्या गावांमध्ये पोखरा अभियान राबविण्यात येत असते त्या गावातील नागरिकांना पोखरा योजनेतील विविध योजना अंतर्गत लाभ मिळवता येतो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून शेतकऱ्याची योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

 

पोखरा योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या गावांना विविध प्रकारच्या योजना प्रामुख्याने नवीन विहीर बांधकाम योजना तसेच जुनी विहीर दुरुस्ती, ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजना व पीव्हीसी पाईप अनुदान योजना अशा प्रकारच्या अनेक krushi yojana maharashtra या पोखरा अंतर्गत राबविण्यात येत असतात.

Pocra Yojana आत्ताच अर्ज करा

3. नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र:-

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत पशुपालकांना तसेच शेतकऱ्यांना पशुधनाचा पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात येत असतो. नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत गाय व म्हशीचे गट वाटप करणे तसेच शेळी व मेंढीचे गट वाटप करणे कुकुट पालन अनुदान अशा प्रकारच्या योजना या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत राबविण्यात येत असतात. नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने नाविन्यपूर्ण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागत असतो. आपल्या जिल्हा करिता krushi yojana 2023 योजनेचा जो लक्षांक ठरवून देण्यात आलेला आहे. त्या लक्षांकाप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. अश्या अनेक कृषी योजना(krushi yojana) राज्यात पशु संवर्धन विभागाच्या वतीने सुरू करण्यात येत आहे.

नावीन्य पूर्ण योजना ऑनलाईन पद्धतीने येथे करा

 

4. जिल्हा परिषद योजना:-

मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मार्फत अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात. जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग व पशुसंवर्धन विभाग जिल्ह्यातील नागरिकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवित असतात. प्रत्येक जिल्हा परिषद त्यांच्या जिल्ह्यातील नागरिकांकरिता योजना राबवत असते. जिल्हा परिषद योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता अर्जदारांना ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असतो.

 

5. कुसुम योजना:-

राज्यात राबविण्यात येणारी पाचवी महत्वाची कृषी योजना महाराष्ट्र 2023 म्हणजे कुसुम कुसुम योजना होय. ही राज्यात राबविण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे. केंद्र शासनाच्या वतीने ही कुसुम योजना राज्यात राबविण्यात येत आहे. पीएम कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्याकरिता अनुदान वितरीत करण्यात येत असते. पी एम कुसुम योजना ही आपल्या राज्यात राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागतो. पीएम कुसुम योजना अंतर्गत सौर पंप करिता 90% पर्यंत अनुदान वितरित करण्यात येत आहे.

 

6. कृषी यांत्रिकीकरण योजना:-

आपल्या महाराष्ट्र राज्यात कृषी योजना 2023(Krushi Yojana 2023) अंतर्गत महत्त्वपूर्ण अशी कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. ही योजना  शेतकऱ्यांना आधुनिकीकरणाकडे वळविणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत अनेक प्रकारची यंत्र तसेच शेती उपयोगी संसाधने, उपकरणे यांच्या खरेदी करिता अनुदान देण्यात येते. जसे की, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलीत अवजारे, अनेक प्रकारची यंत्रसामग्री. कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्याकरिता महाडिबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असतो. कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येत असते.

 

7. पी एम किसान योजना:

Krushi Yojana Maharashtra अंतर्गत पीएम किसान योजना राबविण्यात येत आहे.  ही केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी महत्वपूर्ण अशी योजना आहे. पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सन्मान राशी म्हणून 6000 रुपये वितरित करण्यात येत असतात. पी एम किसान योजना अंतर्गत राज्यातील तसेच देशातील प्रत्येक शेतकरी लाभ मिळवू शकतो. पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना पी एम किसान योजना पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते.

 

8. पिक विमा योजना :-

पिक विमा योजना ही राज्यात राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा धारक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळवता येते. पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा करून पिक विमा अर्ज करायचा असतो. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पिक विमा दावा दाखल केल्या नंतर नुकसान भरपाई ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

 

9. बियाणे अनुदान योजना:-

Krushi Yojana List मधील बियाणे अनुदान योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. शेतकऱ्यांना खरीप तसेच रब्बी पिकांची बियाणे या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत असतात. बियाणे अनुदान योजना ही MahaDBT पोर्टल वर राबविण्यात येत असते. बियाणे अनुदान अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज सुरू झाल्या नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. ज्या शेतकऱ्यांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात येते त्यांना कृषी केंद्रातून अनुदान वजा करून बियाण्यांचे वितरण करण्यात येत असते.

 

10. दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना:-

दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जमीन खरेदी करण्याकरिता 100% अनुदान देण्यात येत असते. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जमीन नसलेल्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येतो. या योजनेअंतर्गत 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करण्याकरिता 100% अनुदान देण्यात येते.

 

अश्या प्रकारच्या अनेक Krushi Yojana आपल्या राज्यात राबविण्यात येत आहे. आपण Krushi Yojana Maharashtra 2023 List मध्ये महत्वाच्या दहा शेतकरी योजना बद्दल माहिती जाणून घेतली आहे.

Leave a Comment