शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील काही जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम 2021-22 च्या पिकांची अंतिम पैसेवारी काय निघणार याची शेतकरी वाट पाहत होते. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी Kharip Hangam Antim Paisewari याबद्दल विस्तृत माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झालेली असून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पैसेवारी बद्दल माहिती खाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Kharip Hangam 2022 Antim Paisewar निघण्याची वाट शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाहण्यात येत होती. आपल्या तालुक्याची तसेच आपल्या जिल्ह्याची एकंदरीत पैसेवारी किती निघणार याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले होते. आता खरीप पिकांची पैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगाम 2022 जिल्हानिहाय अंतिम पैसेवारी Kharip Hangam 2022 Antim Paisewari :-
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांच्यामार्फत तालुक्यातील शेती पिकांची तसेच हंगामाची पैसेवारी Kharip Hangam Paisewari काढून ती जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येत असते. सर्व तालुक्यांची पैसेवारी मिळून जिल्ह्याची पैसेवारी ठरत असते त्यानंतर शासनाच्या वतीने नुकसान तसेच पैसेवारी यांच्या आधारावर नुकसान भरपाई वितरित करण्यात येत असते.
तालुका निहाय पिकांची पैसेवारी तसेच जिल्हा निहाय पिकांची पैसेवारी यानुसार त्या तालुक्याच्या जिल्ह्यामध्ये पिकांची स्थिती तसेच शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांची सद्यस्थिती कळत असते. राज्यात दरवर्षी खरीप हंगामाच्या सर्व पिकांची पैसेवारी जाहीर करण्यात येत असते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत कापूस पिकांची अंतिम पैसेवारी तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत मूग व उडीद या पिकांची पैसेवारी, जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत सोयाबीन पिकांची पैसेवारी जाहीर करण्यात येत असते.
आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली असून आपण त्या जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी तसेच सर्व तालुक्यांची अंतिम पैसेवारी(Kharip Hangam Antim Paisewari) जाणून घेणार आहोत.
या शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रू बोनस जाहीर; आत्ताच तुमचे गाव पहा
खरीप हंगाम अंतिम पैसेवारी Kharip Hangam Antim Paisewari
1. यवतमाळ अंतिम पैसेवारी Yavatmal Paisewari:-
मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम 2022 23 करिता पिकांची अंतिम पैसेवारी ही 47 पैसे इतकी जाहीर झालेली आहे. Kharip Hangam 2023 Antim Paisewari
यवतमाळ जिल्हा तालुका निहाय अंतिम पैसेवारी:
1. यवतमाळ 48 पैसे
2. झरी 48 पैसे
3. मारेगाव 46 पैसे
4. वनी 45 पैसे
5. कळम 46 पैसे
6. बाबुळगाव 46 पैसे
7. आर्णी 45 पैसे
8. दिग्रस 47 पैसे
9. दारव्हा 47 पैसे
10. नेर 46 पैसे
11. घाटंजी 47 पैसे
12. केळापूर 47 पैसे
13. राळेगाव 47 पैसे
अशाप्रकारे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची अंतिम पैसेवारी लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 47 पैसे ठरली आहे.
2. वाशिम अंतिम पैसेवारी Washim Paisewari:
मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2022 23 करिता पिकांची अंतिम पैसेवारी ही 47 पैसे इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी आलेली आहे.
वाशिम जिल्हा तालुका निहाय अंतिम पैसेवारी:
1. मालेगाव 47 पैसे
2. रिसोड 46 पैसे
3. मंगरूळपीर 47 पैसे
4. कारंजा 47 पैसे
5. मानोरा 47 पैसे
अशाप्रकारे तालुक्यांची सर्व सरासरी पैसेवारी लक्षात घेता एकूण जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 47 पैसे ठरवण्यात आलेली आहे.
3. अकोला अंतिम पैसेवारी Akola Paisewari :-
मित्रांनो अकोला जिल्ह्यातील खरीप हंगाम 2022 23 करिता पिकांची अंतिम पैसेवारी ही 48 पैसे इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. Kharip Hangam Antim Paisewari खालील प्रमाणे.
अकोला जिल्हा तालुका निहाय अंतिम पैसेवारी:
1. अकोला 45 पैसे
2. तेल्हारा 47 पैसे
3. आकोट 48 पैसे
4. पातुर 51 पैसे
5. बाळापुर 51 पैसे
6. मूर्तिजापूर 46 पैसे
7. बार्शीटाकळी 50 पैसे
अशाप्रकारे अकोला जिल्ह्यातील तालुक्यांची पैसेवारी यांचा सरासरी अंदाज घेता अकोला जिल्ह्याची एकूण अंतिम पैसेवारी ही 48 पैसे ठरली आहे.
4. नांदेड अंतिम पैसेवारी Nanded Paisewari :
नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम 2022 23 करिता अंतिम पैसेवारी ही 48 पैसे इतकी निश्चित करण्यात आलेली आहे.
नांदेड जिल्हा तालुका निहाय अंतिम पैसेवारी:
1. नांदेड 47 पैसे
2. कंधार 47 पैसे
3. अर्धापूर 48 पैसे
4. लोहा 44 पैसे
5. भोकर 49 पैसे
6. मुदखेड 49 पैसे
7. हदगाव 49 पैसे
8. हिमायतनगर 47 पैसे
9. माहूर 47 पैसे
10. किनवट 47 पैसे
11. देगलूर 48 पैसे
12. मुखेड 49 पैसे
13. नायगाव 48 पैसे
14. बिलोली 47 पैसे
15. धर्माबाद 48 पैसे
16. उमरी 49 पैसे
अशाप्रकारे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची अंतिम पैसेवारी लक्षात घेता नांदेड जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 48 पैसे निश्चित करण्यात आलेली आहे.
5. परभणी अंतिम पैसेवारी Parbhani Paisewari:-
परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम सन 2022 23 करिता परभणी जिल्हा अंतिम पैसेवारी (kharip Paisewari) ही 47.60 पैसे इतकी ठरली आहे.
मित्रांनो परभणी जिल्ह्यात एकूण 848 गावे असून या सर्व गावांची अंतिम पैसेवारी लक्षात घेतल्यास परभणी जिल्ह्याची एकूण अंतिम पैसेवारी ही 47.60 पैसे इतकी इतकी निश्चित करण्यात आलेली आहे.
खरीप हंगाम पैसेवारी संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.