जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईलवर कसा पहायचा? | Jamin Nakasha Online Maharashtra

 

मित्रांनो आपल्याला आपल्या शेत जमिनीची हद्द माहित करण्याकरिता जमिनीचा नकाशा पाहणे महत्वाचा असतो. इतरांना जमिनीचा नकाशा पाहिल्यास आपल्याला आपल्या जमिनीचा बांध कुठपर्यंत आहे, तसेच जमिनीच्या क्षेत्रफळाशी संबंधित सर्व माहिती कळते. जमिनीचा नकाशा पाहण्याकरिता यापूर्वी आपल्याला तलाठी यांच्याकडे चकरा माराव्या लागत होत्या, तसेच तहसील कार्यालयामध्ये हा नकाशा मिळत होता. परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना जमिनीची नकाशे सहज ऑनलाइन उपलब्ध होईल याकरिता जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. हा Jamin Nakasha Online Maharashtra मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचत आहे.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईलवर कसा पहायचा? | Jamin Nakasha Online Maharashtra

 

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शेत जमिनीचे नकाशे ऑनलाईन पद्धतीने सहज उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या त्यांच्या शेताचा नकाशा पाहता येणार आहे. तसेच तो त्यांच्या मोबाईल मध्ये सुद्धा सेव करून ठेवता येणार आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने शेत जमिनीचा नकाशा कसा पाहायचा, याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत. Jamin Nakasha Maharashtra Online पाहणे झाले सोपे. अनेक पांदन रस्ता संबंधित तसेच बांध संबंधित तंटे मिटविण्यासाठी नकाशा हा महत्वाचा असतो.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे तसेच सर्व माहिती ही ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू आहे. पूर्वी आपण सातबारे तलाठी यांच्याकडून काढत असायचो परंतु आता डिजिटल सातबारा आलेले आहे, तसेच आता आपल्याला जमिनीशी संबंधित अनेक बाबी जसे की फेरफार तसेच काही बदल करणे नावामध्ये दुरुस्ती ही सर्व कामे ऑनलाईन करता येत आहे. एवढेच नाही तर आता जमिनीला सुद्धा आधार कार्ड प्रमाणे एक विशिष्ट प्रकारचा ओळख क्रमांक प्राप्त झालेला आहे. Jamin Nakasha Online Maharashtra 2023

जमिनीचा नकाशा असा पहा मोबाईल वरती ऑनलाईन How to check Jamin Nakasha Online

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या शेत जमिनीचा नकाशा घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन(Jamin Nakasha Online) पद्धतीने पाहायचा असेल तर खालील प्रमाणे प्रोसेस पूर्ण करा. Jamin Nakasha Online Maharashtra

1. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्याकरिता आणि दिलेली खालील वेबसाईट ही ओपन करून घ्यायची आहे.
2. नकाशा ऑनलाईन पाहण्याची वेबसाईट वर येथे क्लिक करून जा- 

3. ही भू नकाशा ऑनलाईन पाहण्याची शासनाची वेबसाईट आहे.
4. आता या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुमच्यासमोर तीन आडव्या रेषा डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात दिसत असेल.
5. त्यावर क्लिक करा आता तुमच्यासमोर एक रखना आलेला आहे त्यामध्ये आपली महाराष्ट्र राज्य निवड तसेच तुमची जमीन ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा निवडा, तसेच तुमचा तालुका आणि तुमचं गाव व तुमच्या जमिनीचा गट नंबर त्या ठिकाणी प्रविष्ट करा.
6. आता तुम्ही दिलेल्या माहितीनुसार त्या शेत जमिनीचा ऑनलाइन नकाशा तुमच्या समोर ओपन झालेला आहे.
7. हा नकाशे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तसेच हा नकाशे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकतात किंवा त्याचा स्क्रीन शॉट काढू शकता.
8. तसेच या नकाशाची पीडीएफ फाईल मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटरमध्ये सेव करून ठेवू शकतात.

शेतकरी मित्रांनो वरील प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या शेत जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटर वरून अगदी सहजपणे ऑनलाईन पाहू शकतात तसेच तो सेव्ह करून ठेवू शकतात. शेतकरी मित्रांनो ही माहिती महत्त्वपूर्ण असेल तर तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारच्या विविध शेती योजना संबंधित माहिती करिता आमच्या या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment