घरकुल योजना यादी 2023 जाहीर; अशी करा डाऊनलोड | Gharkul Yadi 2023 Maharashtra

 

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत देशातील बेघर असलेल्या गरीब कुटुंबांना स्वतःचे पक्के व हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या घरकुल योजना अंतर्गत देशातील तसेच राज्यातील कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बनण्याकरिता शासनाच्या वतीने अनुदान वितरित करण्यात येत आहे. त्याच घरकुल योजनेची 2023 ची नवीन यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही Gharkul Yojana 2023 List Maharashtra डाउनलोड करण्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

घरकुल योजना यादी 2023 जाहीर; अशी करा डाऊनलोड | Gharkul Yadi 2023 Maharashtra
घरकुल योजना यादी 2023 जाहीर; अशी करा डाऊनलोड | Gharkul Yadi 2023 Maharashtra

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ग्रामीण भागातील नागरिकांना घर उपलब्ध करून देण्याकरिता सुरू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन प्रकार आहेत त्याचा पहिला प्रकार म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना – शहरी आणि दुसरा प्रकार म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण होय. आपल्या महाराष्ट्र राज्यात केंद्र पुरस्कृत असलेली ही घरकुल योजना 2016 पासून राबविण्यात येत आहे. Gharkul Yadi 2023 ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री घरकुल योजना ची 2022 ची यादी यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेली होती. आता घरकुल योजना 2023 (Gharkul Yojana Yadi 2023) ची नवीन यादी ही केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करणे सुरू झालेले आहे. राज्यातील काही गावांची घरकुल यादी 2023 जाहीर झालेली असून अनेक गावांच्या याद्या लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महत्वाचं अपडेट: शेतकरी योजना 2023 नवीन अर्ज सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज 

घरकुल यादी 2023 अशी करा डाउनलोड? Gharkul Yadi 2023 download

मित्रांनो घरकुल योजना 2023 ची नवीन यादी डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे आहे. Gharkul Yadi 2023 Maharashtra Download Process

1. सर्वप्रथम तुम्हाला घरकुल योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
2. घरकुल योजनेच्या वेबसाईटची अधिकृत लिंक 
3. आता या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे अनेक ऑप्शन दिसत आहे. यामध्ये तुम्हाला awaassoft हा एक पर्याय दिसत असेल.
4. या पर्यायावर क्लिक करा, तुमच्यासमोर report हा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा.
5. रिपोर्ट या पर्यायांमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे रिपोर्ट दिसत असतील त्यापैकी social audit report या पर्याय वर क्लिक करायचा आहे.
6. आता तुमच्या गावातील घरकुल योजनेची नवीन यादी पाहण्याकरिता Beneficiary details for verification या पर्याय वर क्लिक करायचा आहे.
7. आता तुम्हाला एक नवीन डॅशबोर्ड दिसत आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपली महाराष्ट्र राज्य निवडून घ्या. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा तसेच तुमचा तालुका सिलेक्ट करा.
8. आता तुम्हाला तुमचे तालुक्यातील ज्या गावाची यादी पाहिजे आहे, ते गाव या ठिकाणी निवडा.
9. आता तुम्हाला घरकुल योजनेची ज्या वर्षाची यादी पाहिजे आहे ते वर्ष या ठिकाणी निवडा. घरकुल योजनेची 2023 ची नवीन यादी जाणून घेण्याकरिता, 2022-23 हा पर्याय त्या ठिकाणी निवडून घ्या.
10. आता तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत यादी जाणून घ्यायची आहे, त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा ऑप्शन निवडा.
11. आता तुमच्यासमोर एक बॉक्स आहे आणि त्याच्यासमोर काही गणितीय प्रक्रिया आहे जसे की बेरीज किंवा वजाबाकी ते सोडवा, आणि त्याचे उत्तर त्या बॉक्समध्ये प्रविष्ट करा.
12. आणि शेवटी सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा.
13. आता तुमच्या समोर तुमच्या गावाची संपूर्ण घरकुल यादी दिसत असेल. Gharkul Yojana Yadi डाऊनलोड करण्याकरिता पीडीएफ ऑप्शन क्लिक करून पीडीएफ मध्ये ही यादी तुम्ही डाऊनलोड करू शकतात.

घरकुल योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते? Gharkul Yojana Anudan:-

मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागामध्ये गरीब कुटुंबांना घरकुल बांधण्याकरिता साधारण क्षेत्रात 1 लाख 20 हजार रुपये अनुदान तर नक्षलग्रस्त भागांमध्ये 1 लाख 30 हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्याचप्रमाणे Gharkul Yojana च्या लाभार्थ्यांना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत त्यांच्या घराच्या बांधकामा बरोबर शौचालयाची बांधकाम करण्याकरिता स्वतंत्रपणे 12 हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

 

हे नक्की वाचा: शेत जमिनीशी संबंधित वाद व भांडण, तंटे मिटविण्यासाठी सलोखा योजना सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

घरकुल योजनेचे अनुदाना संदर्भात अधिक माहिती करिता तुम्ही पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवू शकतात.

घरकुल यादी 2023 संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या योजना विषयक तसेच इतर महत्त्वाच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment