मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात जमिनीची सुपीकता वाढवण्याकरिता जमिनीमध्ये धरणातील असलेला गाळ टाकून जमिनीची सुपीकता वाढवता यावी याकरिता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना ही राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही योजना नवीन शासन निर्णय काढून पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana राज्यात सुरू करण्यात आलेली होती. आणि आता या योजनेला नवीन मान्यता देऊन ही योजना आता राज्यात पुढील 03 वर्ष राबविण्यात येणार आहे.
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजना 06 मे 2017 रोजी राबविण्यास मंजुरी मिळालेली होती. आणि आता ही Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2023 राज्यात पुढील तीन वर्षे राबविण्याकरिता 16 जानेवारी 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढून मान्यता देण्यात आलेली आहे.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना काय आहे? What is Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana :-
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या धरणातून गाळ काढून त्यांच्या शेतामध्ये मोफत टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात 2017 मध्ये सुरू झालेली योजना चार वर्ष म्हणजेच 2021 पर्यंत राबविण्यात आलेली होती. आणि आता या योजनेची मुदत संपलेली असताना नवीन शासन निर्णय काढून महाराष्ट्र शासनाने पुन्हा Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2023 Maharashtra योजना 03 वर्षे राबवण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यात धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्यामुळे धरणामध्ये असलेली पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही घटत चाललेली आहे. गाळामुळे धरणामध्ये जास्त पाण्याचा साठा राहत नाही त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक धरणे कोरडी होतात. त्यामुळे राज्यातील या धरणांमध्ये असणारा मोठ्या प्रमाणातील सुपीक गाळ काढून शेतामध्ये टाकल्यास धरणांमधील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढेल तसेच जमिनीची सुपीकता देखील वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि शेतकरी सुखी होईल.
महत्वाचं अपडेट: या दहा जिल्ह्यांसाठी 724 कोटी पिक विमा मंजूर; यादी जाहीर
याच उद्देशाने महाराष्ट्र राज्यात धरणातील गाळ काढून तो शेतामध्ये टाकण्याकरिता एक स्वतंत्र अशी योजना तयार करण्यात आलेली आहे. या Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana अंतर्गत मागेल त्याला गाळ मिळणार असून याकरिता येणारा खर्च शासन उचलणार आहे.
गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना अंमलबजावणी:-
या Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra 2023 अंतर्गत 250 हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या तसेच पाच वर्षापेक्षा जुन्या असलेल्या तलावातील गाळ तसेच धरणातील गाळ उपसून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात येणार आहे. गाळ उपसण्यासाठी लागणारा खर्च या Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana अंतर्गत शासनाच्या मार्फत करण्यात येणार आहे. संगणक प्रणालीवर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची जिओ टॅगिंग सुद्धा करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत केवळ धरणातील तसेच तलावातील गाव उपसण्यात येणार असून वाळू उत्खननास बंदी असणार आहे. विभागीय अधिकारी (प्रांत), महसूल विभाग यांच्यामार्फत त्या लेव्हलवर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा: अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता 675 कोटी मंजूर
गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना अर्ज कसा करायचा? How to Apply for Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana :-
या Galmukt Dharan Galyukt Shivar Maharashtra अंतर्गत ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकतात, तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील आपले सरकारच्या पोर्टलवर अर्ज करता येतो.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना चे फायदे Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana 2023
महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत खालील फायदे होणार आहेत.
1. धरणातील तसेच तलावातील जलसाठा वाढणार आहे.
2. धरणातील जलसाठा वाढल्यामुळे याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल.
3. नापीक जमिनीत धरणातील सुपीक गाळ टाकल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
4. सुपीक काळामुळे शेतकऱ्यांचा खतावर येणारा खर्च कमी होईल.
5. जनावरांना मुबलक पाणी आणि चारा उपलब्ध होईल परिणामी जनावरांच्या पालनपोषणावर येणारा खर्च कमी होईल.
6. जमीन सुपीक झाल्यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल.
मित्रांनो अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” ही राबविण्यास मंजुरी मिळालेली आहे. या योजने संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर सर्वांना शेअर करा. अशा प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.