मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील धान पिकांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता महत्त्वपूर्ण अशी दिलासादायक व आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. राज्यात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकांचे नुकसान झालेले होते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये धान पिकांच्या नुकसानी संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याचे उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनस 2023 वितरित करण्याची घोषणा केलेली आहे.
![]() |
धान बोनस 2023 महाराष्ट्र | Dhan Bonus Maharashtra |
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली होती, या अतिवृष्टीचा फटका राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांची धान पीक नष्ट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. त्याच अनुषंगाने धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून धान बोनस वितरित करण्याचे जाहीर केलेले आहे. लवकरच राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना Dhan Bonus 2023 Maharashtra हे वितरित करण्यात येणार आहे.
किती मिळणार धान बोनस? Dhan Bonas
शेतकरी मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये प्रमाणे धान बोनस वितरित करण्यात येणार आहे. या धान बोनस योजना महाराष्ट्र अंतर्गत एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंतचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला 30 हजार रुपये पर्यंत धान बोनस मिळणार आहे.
धान बोनस कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Which farmers will get dhan bonus?
शेतकरी मित्रांनो राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना हे धान बोनस मिळणार आहे. हे dhan Bonas केवळ धान उत्पादक शेतकऱ्यांकरिताच आहे.
महत्वाचं अपडेट: कुक्कुटपालन योजना 2023 नवीन अर्ज सुरू; असा करा अर्ज
हेक्टरी 15000 रुपये कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये धान बोनस हे लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. Dhan Bonus 2023 वितरित करण्यासंदर्भात सध्या केवळ घोषणा झालेली असून यासंदर्भात शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. येणाऱ्या काळामध्ये dhan bonas संदर्भात नवीन अपडेट आल्यास या वेबसाईटवर तुम्हाला कळविण्यात येईल.
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस वितरणाचा अधिकृत शासन निर्णय जाहीर
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 बोनस वितरण करण्याच्या निर्णय शासनाने घेतला होता. घोषणा होऊन बरेच दिवस होऊन गेले होते, परंतु कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय जाहीर झालेल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळणार का नाही याची काळजी लागली होती.
परंतु आता महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर केला आहे.
15000 वितरणाचा शासन निर्णय pdf येथे पहा
धान बोनस 2023 संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. धान बोनस संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारा. अशाच प्रकारच्या योजना विषयक तसेच नवीन अपडेट करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.