आपले सरकार सेवा केंद्र 2023 करिता नवीन अर्ज सुरू; असा करा अर्ज | Apale Sarkar Seva Kendra 2023

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू केंद्र वितरित करण्यात येत असते. आपले Apale Sarkar Seva Kendra च्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र धारक व्यक्तीला विविध प्रकारच्या सेतू संबंधित सुविधा तसेच विविध कागदपत्रे व शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत असतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये एका गावाकरिता एका व्यक्तीला आपले सरकार सेवा केंद्र ची आयडी उपलब्ध करून देण्यात येत असते. आपले सरकार सेवा केंद्र मुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. जर गाव हा तालुका असेल किंवा मोठे शहर असेल तर त्या ठिकाणी जास्त आपले सरकार सेवा केंद्र आयडी आयडी उपलब्ध करून देण्यात येत असतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्र 2023(Apale Sarkar Seva Kendra 2023 ) अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा करिता नवीन अर्ज मागविण्यात येत आहे.

आपले सरकार सेवा केंद्र 2023 करिता नवीन अर्ज सुरू; असा करा अर्ज | Apale Sarkar Seva Kendra 2023
आपले सरकार सेवा केंद्र 2023 करिता नवीन अर्ज सुरू; असा करा अर्ज | Apale Sarkar Seva Kendra 2023

 

 

आपले सरकार सेवा केंद्र करिता कोण अर्ज करू शकतो?Who can apply for Apale Sarkar Seva Kendra?

आपले सरकार सेवा केंद्र ज्या गावांमध्ये अजून पर्यंत वितरित करण्यात आलेले नाही. म्हणजे ज्या गावांमध्ये अजून पर्यंत कोणत्याही व्यक्तीला Apale Sarkar Seva Kendra उपलब्ध करून दिलेली नाही, अशा गावातील व्यक्तींना आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत जागा निघाल्यानंतर अर्ज करता येतो. आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरिता त्या उमेदवाराकडे सीएससी आयडी असणे आवश्यक आहे. नसल्यास अशा उमेदवारांना सर्वप्रथम सीएससी आयडी मिळवून नंतर आपले सरकार सेवा केंद्र अर्ज करावा लागतो. प्रत्येक जिल्ह्याच्या आपले सरकार सेवा केंद्र वितरण पद्धतीमध्ये थोडाफार बदल असतो. त्याकरिता जाहिरात निघाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राची अधिकृत जाहिरात वाचावी.

 

 

आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात कोण काढते?

आपले सरकार सेवा केंद्राच्या जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात येत असतात. ज्या गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र अजून पर्यंत कुणाकडेही नसेल, अश्या गावांच्या जागा निश्चित करून Apale Sarkar Seva Kendra ची जाहिरात कलेक्टर ऑफिस कडून काढण्यात येत असते.

 

महत्वाचं अपडेट: घरकुल योजना 2023 नवीन यादी जाहीर; अशी करा डाऊनलोड 

आपले सरकार सेवा केंद्र उस्मानाबाद जिल्हा अर्ज सुरू Apale Sarkar Seva Kendra Osmanabad :-

याच आपले सरकार सेवा केद्राच्या नवीन नोंदणी साठी उस्मानाबाद जिल्ह्याकरिता नवीन जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 12 रिक्त जागांकरिता उमेदवारांकडून आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

 

आपले सरकार सेवा केंद्र उस्मानाबाद अर्ज करण्याची तारीख Apale Sarkar Seva Kendra Last Date :-

आपले सरकार सेवा केंद्र उस्मानाबाद अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरिता उमेदवारांना 01 जानेवारी 2023 पासून 16 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

 

 

हे नक्की वाचा: शेत जमीन संबंधित वाद तसेच भांडण, तंटे मिटविण्यासाठी सलोखा योजना सुरू 

 

आपले सरकार सेवा केंद्र उस्मानाबाद अर्ज कसा आणि कुठे करायचा? Assk Nondani 2023

Apale Sarkar Seva Kendra Osmanabad अंतर्गत उमेदवारांना आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज डाउनलोड येथे करा 

आपले सरकार सेवा केंद्र उस्मानाबाद अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे जमा करायचा आहे.

 

इतर जिल्ह्यांकरिता आपले सरकार सेवा केंद्र नवीन अर्ज सुरू झाल्यानंतर, तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून कळविण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!