मित्रांनो अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्यामार्फत राज्यातील मातंग समाज तसेच तत्सम 12 पोटजातीतील अर्जदारांना थेट कर्ज पुरविण्यात येत आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच Annabhau Sathe Mahamandal Karj Yojana अंतर्गत आवश्यक कागदपत्रे अटी व शर्ती आणि पात्रता तसेच इतर तपशील आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना 2023 ही सुरू झालेली असून या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या प्रवर्गातील व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी एक लाख रुपये पर्यंतचे थेट कर्ज आपण मिळवू शकतो. जास्तीत जास्त पात्र असलेल्या तरुणांनी Annabhau Sathe Mahamandal Karj Yojana 2023 अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना काय आहे? What is Annabhau Sathe Mahamandal Karj Yojana :-
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक गरीब समाज आहेत, ते दारिद्र रेषेखालील जीवन जगत आहेत, तसेच त्यांची व्यवसाय क्षेत्रात जास्तीत जास्त प्राबल्य नाही. त्यामुळे राज्यातील दारिद्र रेषेखालील व गरजू मातंग समाजातील तसेच तत्सम 12 पोटजातीतील तरुणांना या योजने अंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. समाजातील गरीब व गरजू घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या तसेच त्यांना त्यांची आर्थिक उन्नती करता यावी या उद्देशाने ही Annabhau Sathe Mahamandal Karj Yojana 2023 राबविण्यात येत आहे.
ही योजना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत असून योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या कर्जाच्या योजना राबविण्यात येत आहे. या महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम ही सुरुवातीला 25 हजार रुपये होती ती आता वाढवून एक लाख रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजेच Annabhau Sathe Vikas Mahamandal Karj Yojana 2023 योजना अंतर्गत तरुणांना एक लाख रुपये पर्यंतचे थेट कर्ज मिळणार आहे. राज्यातील मातंग समाजाकरिता राबविण्यात येणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.
महत्वाचं अपडेट: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना पुन्हा सुरू; 1 लाख सौर पंप वाटप होणार
कर्ज किती आणि कसे मिळते?
मित्रांनो अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना अंतर्गत तरुणांना एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते. त्यामध्ये 85 टक्के म्हणजेच 85 हजार रुपये रक्कम ही अनुदान म्हणून असते तर उर्वरित रक्कम म्हणजेच अर्जदारांचा सहभाग अशी मिळून शंभर टक्के म्हणजेच एक लाख कर्ज देण्यात येते.
महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या कर्ज योजनेअंतर्गत उमेदवारांना अर्ज करावा लागतो. अर्जदारांनी कर्ज मागणीचा अर्ज आवश्यक ते कागदपत्र जोडून सादर करायचा आहे. त्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येते निवड समिती समोर अर्ज मंजुरी करिता सादर करण्यात येतो. लक्षांक विचारत घेऊन जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड करण्यात येते.
Annabhau Sathe Mahamandal Karj Yojana Maharashtra वतीने देण्यात येणाऱ्या या कर्जाच्या परतफेड चा कालावधी हा 36 महिन्याचा असतो. महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्जावर दसादशे 4 टक्के दराने कर्ज व्याज आकारण्यात येते.
योजनेअंतर्गत अटी व शर्ती:-
1. योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अर्जदारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
2. तसेच अर्जदार हा राज्यस्तरावर क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्ती असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
3. तसेच सैन्य दलात विर्गती प्राप्त झालेल्या वारसांना प्राधान्य देण्यात येईल.
4. या योजनेअंतर्गत मातंग समाज तसेच तत्सम 12 पोटजातीतील अर्जदारांना कर्ज देण्यात येईल.
5. या महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेअंतर्गत महिलांकरिता 50 टक्के आरक्षण आहे.
6. केवळ महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांनाच या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो
7. महामंडळाच्या या कर्ज योजनेअंतर्गत वयोमर्यादा ही 18 ते 50 वर्ष आहे.
अण्णा भाऊ साठे महामंडळ कर्ज योजना अंतर्गत लाभ कोण मिळवू शकतो?
मित्रांनो या कर्ज योजने अंतर्गत मातंग समाजातील तसेच त्यांच्या पोट जातीतील तरुणांना लाभ मिळतो त्यांची माहिती खाली आहे.
मांग, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मातंग, मिनी-मादीग, मादींग, मांग गोराडी, मादगी व मादिगा, दानखणी मांग, मांग महाशी इत्यादी जात प्रवर्गातील अर्जदारांना या महामंडळ कर्ज योजना अंतर्गत लाभ मिळवता येतो.
आवश्यक कागदपत्रे Required Documents For Annabhau Sathe Mahamandal Karj Yojana:-
1. आधार कार्ड
2. बँक खाते पासबुक
3. ज्या व्यवसायाकरिता कर्ज हवे आहे त्या व्यवसायाबद्दल अर्जदारांना ज्ञान असावे
4. सिबिल स्कोर 500 पेक्षा जास्त असावा
5. अर्जदाराची कास्ट सर्टिफिकेट
6. इनकम सर्टिफिकेट
7. पासपोर्ट साईज चे फोटो
8. महामंडळांनी नमूद केलेली इतर सर्व कागदपत्रे
9. यापूर्वी या महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभ न घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र
मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात Annabhau Sathe Mahamandal Karj Yojana अंतर्गत मातंग समाजातील बांधवांना थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.