राज्यात 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार | Anganwadi Sevika Bharti Maharashtra 2023

आपल्या महाराष्ट्र राज्यात 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. अंगणवाडी भरती महाराष्ट्र संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे. राज्यात अंगणवाडी भरती महाराष्ट्र 2023 राबविण्यात मान्यता मिळालेली असून ही भरती येत्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. Anganwadi Bharti Maharashtra बरोबरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आलेले आहे.

राज्यात 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार | Anganwadi Sevika Bharti Maharashtra 2023

 

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. राज्याची महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच राज्याचे सचिव, वित्त विभागाचे मुख्य सचिव आणि इतरही मंत्री तसेच मान्यवर आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटना या बैठकीमध्ये उपस्थित होते.

 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनांमध्ये वाढ तसेच त्यांच्या करिता विमा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल तसेच अंगणवाड्यांसाठी नवीन वर्ग इत्यादी विषयांवर सकारात्मक निर्णय येणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये सांगितलेले आहे. त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे एकरकमी पैसे मिळावे याकरिता एलआयसी कडे 100 कोटी रुपये केलेले आहे. त्याचबरोबर भारतीय जीवन विमा महामंडळाकडे सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विमा संबंधित प्रश्नावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.

 

अंगणवाडी कर्मचारी भरती महाराष्ट्र Anganwadi Sevika Bharti 2023 :-

मित्रांनो मुख्यमंत्री यांच्याबरोबर पार पडलेल्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात लवकरच येत्या सहा महिन्यांमध्ये अंगणवाडी कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदांच्या वीस हजार पेक्षा जास्त पदांकरिता भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे म्हटले आहे. Anganwadi Bharti Maharashtra 2023

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वरील पदांकरिता 20,186 पदांकरिता Anganwadi Bharti Maharashtra प्रक्रिया आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून या Anganwadi Bharti 2023 Maharashtra प्रक्रियेला मान्यता देण्यात आलेली आहे. सहा महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

 

महत्वाचं अपडेट: परीक्षा न देता वन विभाग भरती 2023 सुरू; थेट मुलाखती द्वारे होणार निवड

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकरिता इतर घोषणा:-

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात अंगणवाड्यांकरिता अस्तित्वात असलेले वर्ग यांचा आढावा घेण्यात येणार असून तसेच जे वर्ग अंगणवाडी चालवण्याकरिता भाड्याने घेतलेले आहेत यांचा सुद्धा आढावा घेऊन महानगरपालिकेतील शाळा तसेच नगरपालिकेतील शाळा या ठिकाणी अंगणवाड्यांचे वर्ग भरवण्यात येणार आहे. मित्रांनो कोरोना महामारीच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकरिता प्रोत्साहन भत्ता लागू केला होता, तो भत्ता आता लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. आपण जाणून घेत आहोत Anganwadi Bharti Maharashtra माहिती.

महत्वाचं अपडेट: जिल्हा परिषद भरती 2023 सुरू; या तारखेला होणार पेपर

अंगणवाडी मध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर वाढवण्याची मागणी करण्यात आलेली होती, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा केलेली असून लवकरच त्याबाबत सुद्धा निर्णय येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.

याप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती(Anganvadi Sevika Bharti) आयोजित करण्यात येणार असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतरही मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. Anganwadi Bharti 2023 Maharashtra संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारची माहिती मिळण्याकरिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!