आभा हेल्थ आयडी कार्ड काय आहे? कसे काढायचे? | Abha Health ID Card in Marathi

 

मित्रांनो आभा हेल्थ आयडी कार्ड बद्दल तुम्ही माहिती ऐकली असेल किंवा आभा कार्ड हा शब्द तुमच्या कानावर ऐकायला मिळालेला असेलच. किंवा तुमच्या गावातील आशा सेविकांनी तुम्हाला आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या आभा हेल्थ आयडी कार्ड बद्दल माहिती सांगितलेली असेल. तुम्हाला आभा कार्ड काढून घेण्याबद्दल सूचना मिळालेली असेल, किंवा तुम्ही इतरांनी काढलेले आभा कार्ड पाहिले असेल, आजच्या या पोस्टमध्ये आपण आभा कार्ड काय आहे? याचा फायदा काय याचा नेमका उपयोग काय आहे, तसेच हे Abha Health ID Card कसे काढायचे? या Abha Card Information in Marathi संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

आभा हेल्थ आयडी कार्ड काय आहे? कसे काढायचे? | Abha Health ID Card in Marathi

 

आभा कार्ड काय आहे? Abha Card Information Marathi:-

मित्रांनो आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट होय. आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट यांचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच आभा कार्ड आहे. मित्रांनो आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन(aayushman Bharat digital health mission) अंतर्गत आपल्या राज्यामध्ये Abha Card काढण्यात येत आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आभा कार्ड हे महत्त्वपूर्ण असून आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती या आभा कार्ड मध्ये जतन होणार आहे. आभा कार्डला एक विशिष्ट प्रकारचा नंबर असतो. या नंबर मध्ये तुमची सर्व माहिती साठवून ठेवण्यात येणार आहे. मित्रांनो तुम्ही Abha Health ID Card काढले म्हणजे तुमचे एक प्रकारे हेल्थ अकाउंट उघडण्यात येईल. ज्याप्रमाणे आपले आधार कार्ड असते त्याचप्रमाणे हे Abha Card असणार आहे. आधार कार्ड प्रमाणेच आपल्याला कार्ड मिळणार आहे. मित्रांनो आरोग्य विभागाच्या मार्फत राबवण्यात येणारे ही एक महत्त्वपूर्ण अशी आयुष्मान भारत डिजिटल मोहीम आहे. आता आपण abha card mahiti marathi जाणून घेत आहोत.

आभा कार्डचा उपयोग काय आहे? Use of Abha Card in Marathi:-

मित्रांनो आभा कार्ड चा उपयोग हा आपल्याला आरोग्याशी संबंधित सर्व माहिती जपून ठेवण्याकरिता होणार आहे. आपण कोण कोणते ट्रीटमेंट घेतलेले आहे, कोणकोणत्या डॉक्टर कडे कोणती ट्रीटमेंट घेतलेली आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या आजारांवर केलेल्या तपासण्या तसेच टेस्ट व डॉक्टरांनी दिलेली औषधे ही सर्व माहिती एका वेळेस एकाच ठिकाणी जतन राहिल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला कोणत्याही डॉक्टर कडे गेल्यानंतर या Abha Card च्या माध्यमातून मागील माहिती मिळवता येईल आणि त्यानुसार पुढे उपचार सुरू करता येईल. या व्यतिरिक्त या abha card चे अनेक उपयोग होणार आहे.

आभा हेल्थ आयडी कार्ड काय आहे? कसे काढायचे? | Abha Health ID Card in Marathi

सर्व शेतकरी योजनांचे अपडेट तसेच कर्जमाफी योजनेच्या याद्या तसेच सर्व माहिती तात्काळ मिळवण्याकरिता येथे What’s App ग्रुप जॉईन करा 

आभा कार्ड चे फायदे Abha Health ID Card Benifits in Marathi :-

आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या या आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणेजच आभा कार्ड चे खालील प्रमाणे फायदे होणार आहेत. Benefits of abha card in Marathi लक्षात घ्या.

1. आपली आरोग्याशी संबंधित सर्व माहिती जतन राहिल्यामुळे भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ट्रीटमेंट करताना पूर्वीची माहिती लक्षात घेऊन ट्रीटमेंट करता येणार आहे.
2. आरोग्याशी संबंधित सर्वच डाटा एका ठिकाणी जतन असल्यामुळे ते सहज उपलब्ध होणार आहे.
3. जर आपण उपचार करत असताना एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेलो, म्हणजेच डॉक्टर चेंज केला तर नवीन डॉक्टरला आधार कार्डच्या माध्यमातून मागील सर्व रिपोर्ट पाहता येणार आहे. आणि त्यानुसार पुढील ट्रीटमेंट सुरू करता येणार आहे.
4. पुन्हा पुन्हा रिपोर्ट तयार करणे वेगवेगळ्या टेस्ट करणे यांचा खर्च वाचणार आहे.
5. आतापर्यंत घेतलेल्या ट्रीटमेंट ची संपूर्ण माहिती डॉक्टरला उपलब्ध झाल्यामुळे त्यांना उपचार करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. उपचार पद्धती सोपी होईल.

अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला या आभा हेल्थ आयडी कार्ड चे होणार आहे. आतापर्यंत आपण Abha Health ID Card बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आता आपण आभा कार्ड कसे काढायचे याबद्दल माहिती जाणून घेऊया.

महत्वाचं अपडेट: 724 कोटी पिक विमा मंजूर; आत्ताच तुमचं गाव चेक करा 

आभा हेल्थ आयडी कार्ड कसे काढायचे? How to apply for Abha Health ID card?

मित्रांनो आपण Abha Health ID Card घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो. आपण आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटर च्या माध्यमातून हे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट(आभा कार्ड) काढू शकतो. Abha Card काढण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करा.

1. सर्वप्रथम गुगल वर जा. आणि “abha” हा शब्द टाकून सर्च करा.
2. किंवा डायरेक्ट गुगल वर https://healthid.ndhm.gov.in/register ही वेबसाईट ओपन करा.
3. आता आपल्याला Create ABHA number हा पर्याय दिसत असेल, त्याखाली using adhar number या पर्याय वर क्लिक करा. म्हणजेच आपण आधार कार्ड च्या माध्यमातून हे आभा कार्ड काढू शकतो. जर आपण या ठिकाणी using driving licence हा पर्याय निवडला तर   driving licence वापरून हे कार्ड काढू शकतो.
4. आता आपला आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर i agree वर क्लिक करून next बटणावर क्लिक करा.
5. आता मोबाईल वर आलेला otp प्रविष्ट करून next करा.
6. आता तुमच्यासमोर तुमच्या आधार कार्ड मधील सर्व माहिती ओपन झाली असेल. आधार कार्ड authentication झालं आहे.
7. आता next बटणावर क्लिक करा. नंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर तेथे प्रविष्ट करा. जर तुमच्याकडे ईमेल आयडी असेल ते ती टाका. आणि get otp वर क्लिक करून otp आलेला प्रविष्ट करा.
8. आता तुमच्या समोर तुमच्या Abha Health ID Card आयडी नंबर हा आलेला असेल. हा 14 अंकी आभा कार्ड नंबर जपून ठेवा. पुढे याचे काम आपल्याला पडणार आहे.
9. आता आपल्याला आभा कार्ड नंबर मिळालेला आहे, आता आंबा काढून पीडीएफ स्वरूपात मिळण्याकरिता किंवा कार्ड प्रिंट करण्यासाठी लॉगिन करून घ्या.
10. आता आपल्याला समोर आपले आभा कार्ड हे ओपन झाले असेल, आता त्याची प्रिंट काढा किंवा ते पीडीएफ मध्ये सेव करून ठेवा.

हे नक्की वाचा: अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता 675 कोटी वितरित

अशाप्रकारे आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या साह्याने किंवा कम्प्युटरच्या साह्याने आभा कार्ड काढू शकतो. आभा हेल्थ आयडी कार्ड संदर्भातील मराठी भाषेतील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता वेळोवेळी या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!