पी एम किसान योजना 13 वा हप्ता मिळवण्याकरिता हे काम लगेच करा | Pm Kisan Yojana 13th installment

 

मित्रांनो पीएम किसान योजना अंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने वार्षिक 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान योजनेचे आतापर्यंत बारा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजना 13 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. जर तुम्हाला पीएम किसान संबंधित योजनेचा 13 वा हप्ता पाहिजे असेल तर खालील काम तुम्हाला लगेच करून घ्यायचे आहे. जर तुम्ही आम्ही सांगितलेले खालील काम केले तर Pm Kisan 13th installment ही 100% तुम्हाला मिळणार.

 

पी एम किसान योजना 13 वा हप्ता मिळवण्याकरिता हे काम लगेच करा | Pm Kisan Yojana 13th installment

 

 

मित्रांनो pm kisan yojana ही शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2 हजार रुपये असे वर्षात तीन वेळा म्हणजेच एका वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. देशातील कोणताही शेतकरी या योजनेअंतर्गत नोंदणी करून लाभ मिळवू शकतो. पी एम किसान योजना चा लाभ अनेक बोगस शेतकरी मिळवत होते. पी एम किसान योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळवता येतो परंतु असे अनेक कुटुंबे आहेत ज्यातील अनेक व्यक्ती लाभ मिळत होते. त्यामुळे पी एम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता पी एम किसान योजना अंतर्गत पुढील 13 वा हप्ता फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

 

त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा Pm Kisan Yojana 13th installment पाहिजे असेल, तर तेरावा हप्ता शासनाच्या वतीने वितरित करण्यापूर्वी काही गोष्टी चेक करायचे आहे. तसेच काही गोष्टी अजून तुम्ही केलेले नसतील तर त्या करायच्या आहेत.

 

पी एम किसान योजना 13 वा हप्ता मिळण्याकरिता खालील काम आत्ताच करा ;-

पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत तुम्हाला तेरावा हप्ता मिळणार आहे की नाही हे चेक करण्यासाठी तसेच pm kisan next installment मिळवण्याकरिता तुम्हाला खालील तीन गोष्टी करायच्या आहेत. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की तुम्हाला पुढील हप्ता मिळणार की नाही, त्याचप्रमाणे तुम्हीही काम केल्याने तुम्हाला तेरावा हप्ता नक्की मिळेल.

 

1. पी एम किसान योजना स्टेटस चेक करा check pm kisan status:-

मित्रांनो पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता आपल्याला मिळणार आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. आता पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर आल्यानंतर फार्मर्स कॉर्नर हा पर्याय तुम्हाला दिसत असेल त्या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या पी एम किसान योजनेचे स्टेटस चेक करायचे आहे त्याकरिता बेनिफाईसरी स्टेटस हा पर्याय त्या ठिकाणी निवडा. या ठिकाणी तुम्हाला विचारलेली माहिती टाकून तुमची पी एम किसान योजना डिटेल काढा.

 

महत्वाचं अपडेट: पोखरा योजना 2023 सुरू; आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

 

जर या ठिकाणी तुम्हाला तुमची स्टेटस approved किंवा Yes दिसत असेल तर पी एम किसान योजना कडून पुढील हप्ता मिळवण्याकरिता तुम्ही पात्र आहात, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

 

2. Benificery List मध्ये नाव चेक करा:-

मित्रांनो पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळवण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या गावच्या pm kisan लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का? ते चेक करायचे आहे. पी एम किसान योजना अंतर्गत Benificery List मध्ये तुमचे नाव चेक करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

 

1. सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. अधिकृत वेबसाईटवर जाण्याची लिंक-

2. आता या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ वर आल्यानंतर होम पेजवर तुम्हाला Benificery List हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

3. आता तुम्हाला सर्वप्रथम तुमचे राज्य निवडायचे आहे.

4. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका निवडा.

5. आता तुमची तहसील आणि तुमचं गाव निवडा.

6. आणि शेवटी तुमची लिस्ट चेक करण्याकरिता Get Report या पर्यायवर क्लिक करून तुमची सर्व माहिती मिळवा. जर तुमची या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता मिळणार आहे.

 

3. आधार बँक लिंकिंग स्टेटस चेक करा Check Aadhar Bank Linking Status :-

मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत तेरावा हप्ता मिळविण्याकरिता तसेच तेरावा हप्ता मिळणार आहे का? ते चेक करण्यासाठी तिसरा व महत्त्वाचा पर्याय म्हणजे तुमची आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक आहे का ते चेक करणे. मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान चे पैसे येतात त्यामुळे आपल्याला आपल्या आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का ते चेक करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

 

1. सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे.

2. अधिकृत वेबसाईटवर जाण्याची लिंक ही आहे-

3. आता या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारचे ऑप्शन दिसतील त्यापैकी माय आधार या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

4. आता तुम्हाला आधार सर्विसेस या पर्यायावर क्लिक करून या पर्यायाच्या आत “Check Aadhar Bank Linking Status” असा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

5. आता तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओटीपी च्या माध्यमातून मिळालेल्या ओटीपी त्या ठिकाणी प्रविष्ट करून तुम्ही तुमच्या आधार कार्ड सोबत बँक लिंक आहे का ते चेक करू शकतात.

6. आता तुमच्यासमोर Aadhar Bank Linking Status हे ओपन झालेले आहे तुमची कोणती बँक आधार कार्ड सोबत लिंक आहे, याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे.

 

जर तुमचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल आणि ते या ठिकाणी दिसत असेल, तर तर तुम्हाला pm kisan 13th installment नक्की मिळणार आहे. वरील तीन पैकी कोणत्याही ठिकाणी जर तुमचे नाव नसेल किंवा काही अडचण असेल तर ती प्रॉब्लेम लगेच solve करून घ्यावी.

 

 

हे नक्की वाचा: नवीन विहीर अनुदान योजना 2023 सुरू; 2.50 लाख अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज 

 

मित्रांनो आपण वरील प्रमाणे तिन्ही बाबी चेक केल्यानंतर जर सर्वच ठिकाणी आपण चेक केल्याप्रमाणे तुमची स्थिती दाखवत असेल तर तुम्हाला पीएम किसान योजना 13 वा हप्ता 100% मिळणार आहे.

 

मित्रांनो अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून सुद्धा पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळणार आहे का नाही ते चेक करू शकतो. पी एम किसान योजनेच्या पुढील हत्या संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. जर ही माहिती तुम्हाला तुमच्या कामाची वाटत असेल तर इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.

Leave a Comment