प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार रुपये कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू | Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra

 

मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही सुरू करण्यात आलेली होती. या Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra अंतर्गत पतविक्रेत्यांना 50000 रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते. या पीएम स्वानिधी योजना अंतर्गत 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज मिळण्याकरिता अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार रुपये कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू | Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra
प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार रुपये कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू | Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra

 

 

मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने कोरोना काळात पतविक्रेत्यांकरिता महत्त्वपूर्ण अशी कर्ज उपलब्ध करून देणारी तसेच अर्थसहाय्य पुरविणारी ही प्रधानमंत्री स्वनिधी योजना (Pradhan Mantri Svanidhi Yojana) सुरू करण्यात आलेली होती. या योजनेच्या अंतर्गत कोरोना काळामध्ये पथविक्रेत्यांना सुरुवातीला दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज हे उपलब्ध करून देण्यात आलेले होते. केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या योजनेला संपूर्ण देशभरात खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता. आता केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना वीस हजार रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार असून pm svanidhi yojana in marathi याकरिता ऑनलाईन अर्ज सुरू झालेली आहे. पतविक्रेत्यांनी कर्जाची परतफेड केल्यास त्यांना पन्नास हजार रुपये कर्ज उपलब्ध होते.

 

 

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत लाभ किती मिळतो

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत खालील प्रमाणे लाभ मिळतो. Pm Swanidhi Yojana Maharashtra

 

1. या योजनेच्या अंतर्गत पतविक्रेत्याला सुरुवातीला दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज एका वर्षाच्या मुदतीसाठी दिले जाते. एका वर्षानंतर पत विक्रेत्याला या योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाची प्रत्येक महिन्याला हप्त्या द्वारे परतफेड करावी लागते.

2. पथविक्रेत्यांनी पहिल्या दहा हजार रुपयांच्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास त्या पथविक्रेत्यास वीस हजार रुपये नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

3. आता पतविक्रेत्यांनी मिळवलेल्या वीस हजार रुपये कर्जाची पूर्ण परतफेड केल्यास तो पतविक्रेता आता पन्नास हजार रुपये कर्ज घेण्यास पात्र असून त्याकरिता तो अर्ज करू शकतो.

4. व पन्नास हजार रुपये स्व निधी कर्ज मिळण्यास अर्ज केल्यानंतर त्याला ते कर्ज मिळतील.

5. प्रधानमंत्री स्व निधी योजना अंतर्गत पथविक्रेत्यांनी मिळवलेल्या कर्जाची वेळेच्या आत परतफेड केल्यास त्यांना 7 % व्याज अनुदान म्हणून मिळते.

 

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची वैशिष्ट्ये

मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने पथविक्रेत्यांकरिता राबविण्यात येणारी प्रधानमंत्री स्वनिधी योजना(pradhanmantri Svanidhi Yojana) ची खालील प्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. Pradhan Mantri Svanidhi Yojana

 

या योजनेअंतर्गत पतविक्रेत्यांना सुरुवातीला वीस हजार व दहा हजार रुपये या प्रमाणात कर्ज मिळते त्यानंतर त्यांनी कर्जाची योग्य वेळेत परतफेड केल्यास अशा पत्रिक्रेत्यांना पन्नास हजार रुपये कर्ज मिळण्यास पात्र ठरवण्यात येते. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना जास्त कर्ज देऊन प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेअंतर्गत मिळवलेले कर्ज डिजिटल पद्धतीने परत करता येते त्यामुळे डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन मिळते.Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra 2022

 

 

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री स्व निधी योजना Pradhan Mantri Svanidhi Yojana अंतर्गत केवळ पथविक्रेत्यांनाच लाभ मिळतो, जर तुम्ही असाल तर खालील कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. Pm svanidhi Information in Marathi

1. आधार कार्ड

2. पथविक्रेता प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र

3. मतदान कार्ड

4. बँक पासबुक

वर दिलेली चार कागदपत्रे असल्यास आपण या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो.

 

महत्वाचं अपडेट: ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत नवीन अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा 

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत पन्नास हजार पर्यंतचे कर्ज कोण मिळवू शकतो?

Pradhan Mantri Svanidhi Yojana अंतर्गत खालील प्रमाणे खालील लाभार्थ्यांना कर्ज मिळवता येते. Pm svanidhi yojana mahiti marathi

 

1. मित्रांनो या योजनेअंतर्गत जे सर्वेक्षण झालेले होते त्या सर्वेक्षणामध्ये जे पत विक्रेते वगळलेले होते किंवा सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या पतविक्रेत्यांनी विक्री सुरू केलेली होती अशा पथविक्रेत्यांना लाभ मिळेल. त्याकरिता महानगरपालिका किंवा नगर पालिकेने अशा या पत विक्रेत्यांना शिफारस पत्र जारी केलेले असावे लागते.

2. नोंदणी कृत पथविक्रेत्यांना लाभ मिळवता येतो.

3. महानगरपालिकेने शिफारस पत्र जारी केलेले पथविक्रेते लाभ मिळवू शकतात.Pradhan Mantri Svanidhi Yojana Maharashtra 2022

 

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अर्ज प्रक्रिया:-

प्रधानमंत्री स्वनिधी योजना(Pradhan Mantri Svanidhi Yojana) अंतर्गत ऑनलाईन अर्ज करावा लागतो, त्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. जर तुम्ही नोंदणीकृत पथविक्रेते असाल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज मिळवायचे असेल तर सर्वप्रथम अर्ज करण्याकरिता या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2. योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्याची लिंक-

3. आता या पोर्टल वर गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा ऑप्शन दिसेल.

4. त्यावर क्लिक करून तुमची सर्व बेसिक माहिती प्रविष्ट करा त्यानंतर पतविक्रेते संबंधित तुमच्याकडे असलेले प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र ऑनलाइन अपलोड करा.

5. त्यानंतर अर्ज सबमिट करा अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो किंवा तुमच्या जवळील सीएससी केंद्रावर जाऊन त्या ठिकाणाहून अर्ज करून घेऊ शकतो.

 

हे नक्की वाचा:- शेळी मेंढी व कुकुट पालन योजना अंतर्गत; 50 लाख रुपये अनुदान अर्ज सुरू 

प्रधानमंत्री स्व निधी योजना अंतर्गत 50 हजार रुपये कर्ज मिळविण्यासंदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. ही माहिती तुमच्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा, अशाच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!