नगरपरिषद भरती 2023 लवकर सुरू होणार; नगरपरिषद भरती बाबत नवीन शासन निर्णय जाहीर | Nagar Parishad Bharti 2023

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात लवकरच नगर परिषद भरती 2023 प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नगरपरिषद भरती सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात नगर परिषदेच्या अंतर्गत विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण नगरपरिषद भरती संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

नगरपरिषद भरती 2023 लवकर सुरू होणार; नगरपरिषद भरती बाबत नवीन शासन निर्णय जाहीर | Nagar Parishad Bharti 2023नगरपरिषद भरती 2023 लवकर सुरू होणार; नगरपरिषद भरती बाबत नवीन शासन निर्णय जाहीर | Nagar Parishad Bharti 2023

 

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत Nagar Parishad Bharti करिता महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात गट क व गट ड ही नगर परिषदेच्या अंतर्गत येणारी सर्व पदे भरण्यात येणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या या अपडेट मुळे नगरपरिषद मध्ये नोकरी मिळू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ही एक उत्तम संधी प्राप्त झालेली आहे. Nagar Parishad Bharti Update

 

मित्रांनो राज्यात नगरपरिषद तसे नगरपंचायतीच्या आकृतीबंधानुसार आस्थापनेवरील अनेक पदे रिक्त आहेत. राज्यातील अनेक नगरपरिषदांमध्ये विविध पदे रिक्त असल्यामुळे नगर परिषदेचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज योग्य रीतीने पार पडण्याकरिता अडचणी निर्माण होत असल्यामुळे विविध संघटनांमार्फत शासना च्या दरबारी पदभरती संदर्भात मागणी करण्यात आलेली होती. नगरपरिषद तसेच नगरपंचायतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे मागणी केल्यामुळे शासनाच्या वतीने नगर परिषदेमध्ये असणाऱ्या एकूण रिक्त पदांचा आढावा घेण्यात येत आहे.

 

त्यामुळे शासन दरबारी नगरपरिषदांमध्ये असणाऱ्या एकूण रिक्त जागांची माहिती मिळाल्यानंतर शासनाच्या वतीने Nagar Parishad Bharti 2023 प्रक्रिया राबवण्याकरिता सुरुवात करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या 04 मे 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार गट क संवर्गातील पदे आणि गट ड संवर्गातील पदे तसेच गट ब संवर्गातील अराजपत्रित पदे ही सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे.

 

वरील प्रकारची सर्व पदे भरण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठित करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने नगरपरिषद तसेच नगरपंचायतीमधील विविध पदांची Nagar Parishad Bharti Maharashtra सुरू करण्याकरिता पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.

 

नगरपरिषद भरती अंतर्गत भरण्यात येणारी पदे:

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राबविण्यात येणाऱ्या नगरपरिषद भरती 2023(Nagar Parishad Bharti 2023) अंतर्गत खालील पदे भरण्यात येणार आहे.

1. ग्रंथपाल

2. साहित्यक ग्रंथपाल

3. ड्रायव्हर

4. क्लार्क

5. वीजतंत्री/पंप ऑपरेटर

6. वायरमन/तारतंत्री

7. उद्यान पर्यवेक्षक

8. गळणी चालक

9. शिपाई

10. फायरमन

11. व्हॅलमन

12. हवालदार

13. सफाई कामगार

 

अशा प्रकारची विविध पदे ही नगरपरिषद भरती महाराष्ट्र अंतर्गत भरण्यात येणार आहे. नगरपरिषद भरती 2023 महाराष्ट्र संदर्भात विस्तृत माहिती आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीने नगरपरिषद भरती 2023 ची अधिकृत जाहिरात काढल्यानंतर समजेल. भरती जाहीर झाल्यानंतर नवीन पोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला या वेबसाईटवर कळवण्यात येईल.

 

 

ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!