विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा वर्ष 2023 मध्ये देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता लवकरच बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जायचे आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या वतीने SSC (10th) आणि HSC (12th) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2023 तसेच बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2023 संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.
![]() |
दहावी बारावी परीक्षा 2023 नवीन वेळापत्रक जाहीर; असे करा डाऊनलोड | Maharashtra Board SSC (10th) HSC (12th) Exam 2023 Timetable |
महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रका मुळे आता दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य नियोजन करता येणार आहे. विद्यार्थी वेळापत्रकाचा अंदाज घेऊन त्यानुसार अभ्यास करू शकतात, आणि येणाऱ्या SSC आणि HSC बोर्ड एक्झाम ला सामोरे जाऊ शकतात. Maharashtra Board SSC 10th, HSC 12th Exam 2023 बद्दल विस्तृत माहिती आपण खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्डाची दहावीची परीक्षा ही 02 मार्च 2023 पासून सुरू होणारा असून 25 मार्च 2023 ला दहावी बोर्डाचे पेपर संपणार आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची एक्झाम 12th Board Exam Time Table 2023 Maharashtra ही 21 फेब्रुवारी 2023 ला सुरू होणार असून 21 मार्च 2023 पर्यंत ही एक्झाम चालणार आहे.
महत्वाचं अपडेट: पोलीस भरती हॉल तिकीट जाहीर; असे करा डाऊनलोड
मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली हे एक संभाव्य वेळापत्रक असून या वेळापत्रकावर आक्षेप तसेच सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आता हे एक अंतिम वेळापत्रक उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या वतीने दरवर्षी बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक हे सप्टेंबर महिन्यात संभाव्य स्वरूपात जाहीर करण्यात येत असते. त्यामुळे यावर्षी सुद्धा संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आलेले होते. आणि आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे.
दहावी व बारावीच्या बोर्डाच्या वेळापत्रक संदर्भात विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना:-
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले हे वेळापत्रक केवळ विद्यार्थ्यांना माहिती करिता उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या Maharashtra Board Exam Time Table 2023 हे त्यांच्या शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात आलेले वेळापत्रक अंतिम असेल.
दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला तुमच्या शाळा किंवा कॉलेजच्या माध्यमातून देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम समजावे. बाहेर उपलब्ध असलेल्या किंवा कोणत्याही प्रसार माध्यमातून उपलब्ध झालेल्या वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी. शाळा व महाविद्यालयातून मिळणारे वेळापत्रक अंतिम समजावे.
दहावी आणि बारावी तोंडी तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक SSC, HSC Time Table 2023 Maharashtra
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक त्यांच्या www.mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहे. दहावी तोंडी परीक्षा वेळापत्रक तसेच बारावी तोंडी परीक्षा वेळापत्रक आणि दहावी प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रक तसेच बारावी प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रक हे परीक्षेच्या पूर्वी स्वतंत्रपणे महाविद्यालय तसेच शाळा यांना कळविण्यात येणार आहे.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक कसे डाउनलोड करायचे? How to download 10th and 12th board exam time table?
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या बोर्ड परीक्षांचे दहावी आणि बारावीचे वेळापत्रक डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. खालील लिंक वरून तुम्ही दहावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड वेळापत्रक तसेच बारावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड वेळापत्रक(Maharashtra State Board Time Table) डाउनलोड करू शकतात.
दहावी (SSC) वेळापत्रक(ssc time table maharashtra) डाउनलोड करा-
बारावी(HSC) वेळापत्रक(hsc time table maharashtra) डाऊनलोड करा –
बारावी(HSC) VOCATIONAL वेळापत्रक डाऊनलोड करा–
वरील वेळापत्रक विद्यार्थ्यांनी केवळ माहिती करिताच वापरायचे असून शाळा व महाविद्यालयांमध्ये मिळणारे वेळापत्रक अंतिम समजावे.
दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना techinfomarathi.in टीम कडून बेस्ट ऑफ लक…