मागेल त्याला शेततळे योजना 2023 महाराष्ट्र | Magel Tyala Shettale Yojna Maharashtra

 

शेतकरी मित्रांनो जर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला शेततळे उभारणी करायची असेल. तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे, मागेल त्याला शेततळे ही योजना महाराष्ट्र सरकारने पुन्हा नव्याने सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत अनुदानात सुद्धा भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. Magel Tyala Shet tale Yojna अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुद्धा अत्यंत सुलभ करण्यात आलेली आहे. तर चला जाणून घेऊया मागेल त्याला शेततळे योजना संदर्भात माहिती.

 

मागेल त्याला शेततळे योजना 2023 महाराष्ट्र | Magel Tyala Shettale Yojna Maharashtra
मागेल त्याला शेततळे योजना 2023 महाराष्ट्र | Magel Tyala Shettale Yojna Maharashtra

 

 

शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेली महत्त्वपूर्ण अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी मागेल त्याला शेततळे योजना 2023(Shettale Yojana 2023) ही महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळवता येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या अटी किंवा शर्ती नाहीत. ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ पाहिजे असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे योजना(shettale anudan yojna maharashtra) अंतर्गत 15 हजार शेततळे बांधण्याची उद्दिष्ट समोर ठेवली आहे. शासनाने ठरवून दिलेला लक्षांक पूर्ण करण्याकरिता या योजनेतील असलेल्या अटी शर्ती सुद्धा रद्द करण्यात आलेले आहे. जे शेतकरी नवीन पद्धतीने या योजनेअंतर्गत मागणी करतील त्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात येत आहे.

 

महत्वाचं अपडेट: पशु संवर्धन विभाग योजना 2023 सुरू

मागेल त्याला शेततळे योजना(magel tyala shettale yojana 2023 maharashtra) अंतर्गत अर्जदार लाभार्थ्यांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर करायचा आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित करण्यात येईल. ज्याला लाभार्थ्यांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेली आहे त्या लाभार्थ्यांना एसएमएस पाठवण्यात येईल.

 

मागेल त्याला शेततळे योजना पात्रता Magel Tyala Shettale Scheme Eligibility

Shettale Yojna अंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्जदाराने यापूर्वी या प्रकारच्या योजना मधून लाभ घेतलेल्या नसावा. त्याचप्रमाणे अर्जदाराकडे कमीत कमी 60 गुंठे जमीन असावी लागते. या योजनेअंतर्गत दिव्यांग व महिला शेतकरी व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

 

मागेल त्याला शेततळे योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे Required Documents for Shet tale Yojana:

या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. शेत जमिनीचा सातबारा

2. आठ अ

3. शेतकऱ्यांचे आधार कार्ड

4. आधार संलग्न असलेले बँक पासबुक

वरील कागदपत्रे असल्यास आपण या shettale yojna maharashtra अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहोत.

 

हे नक्की वाचा: पाईप लाईन योजना महाराष्ट्र अंतर्गत नवीन अर्ज सुरू; असा करा अर्ज 

 

मागेल त्याला शेततळे योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया आणि लाभ वितरण प्रक्रिया :

1. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या शेततळे योजना अंतर्गत उमेदवारांना महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

2. अर्ज जर योजनेच्या लक्षांकपेक्षा जास्त प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीने निवड होईल. जर अर्ज लक्षात काय एवढे किंवा त्यापेक्षा कमी प्राप्त झाल्यास सर्व शेतकऱ्यांना पात्र समजून लाभ वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

3. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येते त्यांना एसेमेस प्राप्त झाल्यानंतर काम सुरू करण्याकरिता पूर्वसंमती पत्र देण्यात येते.

4. योजनेअंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर अधिकारी पाहणी करतात, आणि शासनाच्या वतीने अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येते.

 

शेततळे योजना महाराष्ट्र संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या योजना विषयक माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment