फळ पिक विमा 2022 मंजूर नवीन यादी जाहीर | Fal Pik Vima 2022 Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना ही सन 2019-20 मध्ये राबविण्यात आलेली होती. फळ पिक विमा योजना चा आंबिया बहाराचा 2019 चा निधी महाराष्ट्र शासनाने आता वितरित केलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी यापूर्वी आंबिया बहार फळ पिक विमा योजना 2022(Fal Pik Vima 2022 Maharashtra) काढलेला होता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हा निधी वितरित करण्यात येणार आहे. या फळ पिक विमा योजना संदर्भातील माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

फळ पिक विमा 2022 मंजूर नवीन यादी जाहीर | Fal Pik Vima 2022 Maharashtra
फळ पिक विमा 2022 मंजूर नवीन यादी जाहीर | Fal Pik Vima 2022 Maharashtra

 

शेतकरी बांधवांच्या फळ पिकांना हवामानामुळे होणाऱ्या विविध धोक्यांपासून संरक्षण मिळावे व शेतकऱ्यांच्या फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत पुरवावी या उद्देशाने आपल्या महाराष्ट्र राज्यात फळ पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येत असते. आंबिया बहार फळ पिक विमा योजना (Fal Pik Vima 2022 Maharashtra Yadi) आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सण 2019-20 मध्य राबविण्यात आलेली होती. या योजना अंतर्गत राज्य शासनाला त्यांच्या हिष्यावर येणारी रक्कम भरावी लागत असते. ही रक्कम महाराष्ट्र शासनाच्या वतीने विमा कंपनीकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे.

फळ पिक विमा योजना महाराष्ट्र Fal Pik Vima Yojana Maharashtra

त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी सन 2019 20 मध्ये त्यांच्या फळ पिकांचा खास करून आंबिया बहाराचा विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना आता त्यांचे नुकसान झालेले असल्यास फळ पिक विम्याची नुकसान भरपाई(Fal Pik Vima Nuksan Bharpai Maharashtra) वितरित करण्यात येणार आहे. एखाद्या वेळेस शेतकऱ्यांच्या फळ पिकावर हवामानात होणाऱ्या अचानक बदलामुळे फळ पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असते परिणामी शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो व मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

या सर्व बाबींपासून शेतकऱ्यांची सुटका व्हावी याकरिता राज्यामध्ये सात पिकांकरिता फळ पिक विमा योजना(Fal Pik Vima Nuksan Bharpai Maharashtra List 2022) राबविण्यात येत असते. त्यामध्ये प्रामुख्याने संत्रा,डाळिंब , आंबा,केळी, मोसंबी, काजू,  द्राक्ष या सात पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे 2019 मध्ये शेतकऱ्यांच्या फळ पिकांचे झालेले नुकसान ग्राह्य धरून भारतीय कृषी विमा कंपनीने राज्य शासनाकडे विम्याच्या हप्त्याची रकमेची मागणी केली होती. ती मागणी मान्य करून महाराष्ट्र शासनाने त्या संबंधित महत्वपूर्ण असा शासन निर्णय काढून निधी वितरित केलेला आहे.

हे नक्की वाचा : रब्बी पिक विमा 2022 अर्ज सुरू 

फळ पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

ज्या शेतकरी बांधवांनी सण 2019-20 या कालावधीत त्यांच्या फळ पिकांचा पिक विमा उतरवला होता, अश्या शेतकऱ्यांना फळ पिक विमा(Fal Pik Vima 2022 Maharashtra ) अंतर्गत फळ पिक विम्याचे पैसे मिळणार आहे.

Fal pik vima काढलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही फळ पिक विम्याची Fal Pik Vima Yadi रक्कम जमा करण्यात येणार आहे. ज्या फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या महसूल मंडळात नुकसान भरपाई झालेली होती, त्या अहवालानुसार फळ पिक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे.

फळ पिक विमा करिता किती निधी वितरित केला?

मित्रांनो फळ पिक विमा योजना 2019-20 करिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिक विमा कंपनीस राज्य हिष्याची 16,25,040 रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. ही रक्कम विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली असून विमा कंपन्या ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे त्यांना वितरित करणार आहे. fal pik vima yadi

महत्वाचं अपडेट: पीक विम्याचे हेक्टरी 9 हजार या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा 

 

फळ पिक विमा यादी महाराष्ट्र Fal Pik Vima Yadi Maharashtra:-

फळ पिक विमा योजना अंतर्गत फळ पिक विमा योजना ची यादी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. फळ पिक विमा यादी 2022 महाराष्ट्र मध्ये फळ पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. Fal pik vima yadi download करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

फळ पिक विमा यादी डाऊनलोड करा –

फळ पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार या विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही फळ पिक विमा Fal Pik Vima कंपनीशी संपर्क साधू शकतात. फळ पिक विम्याच्या पावती वर कंपनीचा नंबर दिलेला आहे. त्याच प्रमाणे या संदर्भात जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर ऑनलाइन त्या बाबत स्टेटस चेक करू शकतात.

या वर्षीचे फळ पिक विम्याचे पैसे कधी मिळणार?

मित्रानो या वर्षी हवामानात झालेल्या बदलामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळ बागांचे नुकसान झालेले आहेत. त्याबाबत शासनाने पंचनामे सुद्धा पूर्ण केलेले असून पिक विमा कंपन्या लवकरच फळ पिक विमा वितरित करतील अशी अपेक्षा आहे. परंतु राज्य आणि तसेच केंद्र शासनाच्या हिश्याची रक्कम वितरित झाल्या नंतर या विम्याचे पैसे मिळण्याची शक्यता आहे.

आंबिया बहार फळ पिक विमा योजना (Ambiya Bahar Fal Pik Vima) निधी वितरणा संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. फळ पिक विमा योजना संदर्भातील अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment