पहा कोणत्या शेतकऱ्याला किती आली अतिवृष्टी नुकसान भरपाई; याद्या जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai Yadi

 

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात जून महिना ते ऑक्टोबर महिना या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रचंड पाऊस झाला होता. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला होता. परिणामी शेतकऱ्यांना झालेली अतिवृष्टीमुळे नुकसान हे भरून काढण्याकरिता शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णय काढून निधी वितरीत करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे आता राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे मिळालेले आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत लाभ मिळवलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या Ativrushti Nuksan Bharpai Yadi या आता प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे.

पहा कोणत्या शेतकऱ्याला किती आली अतिवृष्टी नुकसान भरपाई; याद्या जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai Yadi

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणत्या शेतकऱ्याला किती आलेली आहे. हे आता यादीच्या माध्यमातून आपल्याला पाहता येत आहे. शेतकरी मित्रांनो Ativrushti Nuksan Bharpai List जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे. सध्या आपल्याकडे अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या (धाराशिव) उस्मानाबाद तसेच नांदेड या दोन जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत. टप्प्याटप्प्याने इतरही जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध होणार आहे.

 

 

त्यामुळे आता राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोणत्या शेतकऱ्यांची किती क्षेत्र नुकसानग्रस्त झाले होते तसेच त्या शेतकऱ्याला मिळालेली अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही पीडीएफ च्या यादीमध्ये दर्शविण्यात आलेली आहे. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या याद्या उपलब्ध करून देत आहोत. शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत लाभ मिळवलेल्या सर्व शेतकऱ्यांची नावे असून कोणत्या शेतकऱ्याला किती रुपये नुकसान भरपाई मिळालेली आहे हे आता आपण पाहूया.

 

महत्वाचं अपडेट: 50 हजार अनुदान योजना दुसरी व तिसरी यादी जाहीर; येथे करा यादी डाऊनलोड 

अतिवृष्टी नुकसान भरपाई Ativrushti Nuksan Bharpai

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात सन 2022 मध्ये जून ते ऑक्टोबर या महिन्याच्या कालावधीत अनेक वेळा मुसळधार तसेच अतिवृष्टी ग्रस्त पाऊस तसेच ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने नुकसान भरपाई ही जाहीर केली होती. राज्य शासनाच्या वतीने जिरायत शेतकऱ्यांसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर तर बागायत शेतकऱ्यांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टरी आणि फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांना 36,000 रु प्रति हे. अशी नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्या ativrushti nuksan bharpai list 2022 खाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

 

आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता Ativrushti anudan yadi 2022 ही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

 

Ativrushti Nuksan Bharpai List Pdf Download:-

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने वितरित केलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे मिळालेल्या शेतकऱ्यांच्या ativrushti nuksan bharpai list खालील प्रमाणे आहेत.

1. उस्मानाबाद(धाराशिव) यादी डाऊनलोड करा

2. नांदेड जिल्हा यादी डाऊनलोड करा

3. Umri यादी डाऊनलोड करा

4. Kandhar यादी डाऊनलोड करा

5. Mahur यादी डाऊनलोड करा

6. हिमायतनगर यादी डाऊनलोड करा 

 

शेतकरी मित्रांनो वरील लिंक वरून तुम्हाला Ativrushti Nuksan Bharpai Yadi डाउनलोड करता येत आहे.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता शासनाने वितरित केलेला  निधी? ativrushti nuksan bharpai nidhi

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई वितरित करण्याकरिता एकूण 5346 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मदत म्हणून वितरित केलेला आहे.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यानंतर या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment