रब्बी पीक विमा 2022 अर्ज सुरू ; संपूर्ण माहिती | Rabbi Pik Vima Yojana Maharashtra Online

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत रब्बी पिक विमा 2022 हे राबविण्यात येत असून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांचा रब्बी पिक विमा काढायचा आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करायचा असून अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी पिकांचा पिक विमा काढल्यास रब्बी पिकांच्या शेती पिकाला सुरक्षा कवच मिळते व नुकसान झाल्यास Rabbi Pik Vima Yojana Maharashtra नुकसान भरपाईचा दावा विमा कंपनीकडे करता येतो.

रब्बी पीक विमा 2022 अर्ज सुरू ; संपूर्ण माहिती | Rabbi Pik Vima Yojana Maharashtra Online
रब्बी पीक विमा 2022 अर्ज सुरू ; संपूर्ण माहिती | Rabbi Pik Vima Yojana Maharashtra Online

रब्बी पिक विमा योजना (Rabbi Pik Vima Yojana)
अंतर्गत शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर अर्ज करण्याची आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. रब्बी पिक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगामाच्या शेती पिकांच्या पिक विमा शेतकऱ्यांना काढता येतो. याकरिता शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन पिक विमा अर्ज करावा लागत असतो.

रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया Rabi Pik Vima Application Process :-

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रब्बी हंगामाचा पिक विमा काढायचा असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

1. रब्बी हंगामाचा पिक विमा पण स्वतः म्हणजे शेतकरी स्वतः काढू शकतात तसेच सीएससी केंद्रावर जाऊन हा पिक विमा काढता येतो.
2. सीएसटी केंद्र चालकांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना च्या या वेबसाईटवर जायचे आहे.
3. पिक विमा अर्ज करण्याची वेबसाईट
4. आता तुम्हाला रब्बी हंगाम अर्ज करा यावर क्लिक करून तुमचा सीएससी आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
5. आता तुम्हाला शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती प्रविष्ट करायची आहे.
6. आता तुम्हाला शेतकऱ्यांची बँक पासबुक, शेतकऱ्यांचा सातबारा व आठ अ तसेच पिक पेरा प्रमाणपत्र हे अपलोड करायचे आहे.
7. शेवटी अर्ज सबमिट करा आणि अर्ज भरण्याची पावती शेतकऱ्यांना द्या.

महत्वाचं अपडेट:- नवीन पीक विमा यादी जाहीर! आत्ताच डाऊनलोड करा

 

रब्बी पिक विमा अंतर्गत कोण सहभागी होऊ शकतात?

शेतकरी मित्रांनो रब्बी पिक विमा योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना ज्याच्या नावावर शेती आहे अशा शेतकऱ्यांना भाग घेता येतो. शेतकरी कर्जदार असो किंवा मग बिगर कर्जदार पिक विमा योजना ही ऐच्छिक आहे. म्हणजेच जर कर्जदार शेतकरी बांधवांना पिक विमा अंतर्गत सहभागी व्हायचे नसेल तर बँका शेतकऱ्याचा विमा काढणार नाही. Pik Vima Yojana Maharashtra.

Rabbi Pik Vima 2022 अंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांच्या रब्बी हंगामातील शेती पिकांचा पिक विमा काढण्याचे आवाहन हे करण्यात येत आहे. जर शेतकऱ्यांना त्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना संरक्षित करायचे असेल तर रब्बी पिक विमा 2022 काढून घ्यावा.

महत्वाचं अपडेट: महामेश मेंढी पालन योजना अंतर्गत 20 मेंढ्या व 1 नर मेंढा वाटप योजना सुरू 

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख Rabbi Pik Vima Last Date

शेतकरी मित्रांनो रब्बी पिक विमा योजना Rabbi Pik Vima अंतर्गत ज्वारी या पिकाच्या पीक विम्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2022 असून गहू, हरभरा व रब्बी कांदा या पिकांची अंतिम तारीख ही 15 डिसेंबर आहे. तसेच रब्बी हंगामातील भात आणि भुईमूग या पिकाची अंतिम तारीख ही 31 मार्च 2023 आहे. वरील प्रमाणे रब्बी पिकाचा विमा काढायचा असेल तर अंतिम तारीख आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा काढून घ्यावा.

रब्बी पिक विमा अर्ज कुठे करायचा?

रब्बी पिक विमा अंतर्गत अर्ज हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे. जर तुम्ही या योजने अंतर्गत सहभागी होणार असाल तर जवळच्या csc सेंटर वर जाऊन अर्ज करावा.

हे नक्की वाचा:- जिल्हा परिषद योजना 2022 नवीन अर्ज सुरू 

रब्बी पिक विमा योजना (Rabbi Pik Vima) संदर्भातील ही माहिती इतरांना देखील शेअर करा. तुमची काही शंका असतील तर कमेंट करा आम्ही तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन करू. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment