पोलीस भरती मैदानी चाचणी ची तारीख जाहीर | Police Bharti Physical Test Date Declared

 

विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात 18000 पेक्षा जास्त पदांकरिता पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलीस भरती अंतर्गत अर्ज करण्याची सुरुवात झालेली असून 30 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे पोलीस भरतीची मैदानी चाचणी ची तारीख(Police Bharti Physical Test Date 2022) डिक्लेअर करण्यात आलेली आहे. पोलीस भरती मैदानी चाचणी आता 12 डिसेंबरला होण्याची तारीख फिक्स झालेली आहे.

 

पोलीस भरती मैदानी चाचणी ची तारीख जाहीर | Police Bharti Physical Test Date Declared
पोलीस भरती मैदानी चाचणी ची तारीख जाहीर | Police Bharti Physical Test Date Declared

 

 

मित्रांनो जे उमेदवार पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अठरा हजार पदांकरिता सुवर्ण संधी चालून आलेली असून आता पोलीस भरती 2022 ची प्रक्रिया लवकरच राबवण्यात येत आहे. जानेवारी महिन्यामध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार असून पोलीस भरती फिजिकल टेस्ट ही 12 डिसेंबरला होण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पोलीस भरती अंतर्गत सिलेक्शन होण्याकरिता दररोज ग्राउंड वर जाणारे उमेदवार आता या बातमीमुळे खुश झालेले असणार. Police Bharti Physical Test Date

 

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर हे एक मोठी सुवर्णसंधी आणि मेहनतीची परीक्षा असणार आहे. पोलीस भरती मैदानी चाचणी 12 डिसेंबरला होणार असल्यामुळे लवकरात लवकर आपण मैदानी चाचणी करता तयारी करून घ्यावी. जास्तीत जास्त ग्राउंड वर सराव करावा कारण की आता फक्त 18 ते 20 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. Police Bharti Physical Test 2022

 

सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती 2022 चे फॉर्म भरणे सुरू असून विद्यार्थ्यांचा यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलीस भरतीच्या अर्जाच्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस अर्ज येत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा पोलीस बनायचे असेल तर अंतिम तारखेच्या आत फॉर्म भरून घ्यावा. पोलीस भरतीचा अर्ज आपण मोबाईल वरून सुद्धा भरू शकतो. किंवा जर तुम्हाला भरता येत नसेल तर जवळच्या कम्प्युटर वाल्याला शंभर रुपये देऊन हा अर्ज तुम्हाला कोणीही भरून देईल.

 

महत्वाचं अपडेट:- पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत कागदपत्रात बदल; आता ही कागदपत्रे तयार ठेवा.

पोलीस भरती फिजिकल टेस्ट वेळापत्रक Police Bharti Physical Test 2022 Date

मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती 2022 अंतर्गत अर्ज भरणे सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व अर्जदारांना मैदानी चाचणी करिता(police bharti 2022 Maharashtra physical test date) 12 डिसेंबर २०२२ पासून बोलावण्यात येणार आहे.

 

पोलीस भरती मैदानी चाचणीची प्रक्रिया(Police Bharti Physical Test Date 2022) पूर्ण झाल्यानंतर पोलीस भरती 2022 ची लेखी परीक्षा ही आयोजित करण्यात येणार आहे. पोलीस भरती महाराष्ट्राची लेखी परीक्षा जानेवारी 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे.

 

पोलीस भरती 2022 महाराष्ट्र

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती प्रक्रिया ही  राबविण्यात सुरुवात झालेली असून या भरती अंतर्गत 17130 पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस, शिपाई व चालक या पदांचा समावेश आहे. आपल्या महाराष्ट्रात जवळपास दोन ते तीन वर्षानंतर ही पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आतापर्यंत पोलीस भरती अंतर्गत जवळपास तीन लाख उमेदवारांनी अर्ज केलेले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहेत. तसेच आता पोलीस भरती 2022 अंतर्गत मैदानी चाचणीची तारीख police Bharti physical test सुद्धा जाहीर झालेली आहे.

 

हे नक्की वाचा:- पोलीस भरती अर्ज असा करा ऑनलाईन अर्ज घरबसल्या ऑनलाईन 

पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी मध्ये उमेदवाराला किमान 40 टक्के गुण असले पाहिजे तरच पुढील लेखी परीक्षेकरिता त्यांची सिलेक्शन होणार आहे. पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत सुरुवातीला मैदानी चाचणी होणार आहे नंतर लेखी परीक्षा होणार आहे. सुरुवातीला मैदानी चाचणीचा फायदा ग्रामीण भागातील उमेदवारांना होणार आहे ग्रामीण भागातील मुलांचा जास्त सराव असतो. परंतु फिजिकल टेस्टमध्ये सिलेक्ट झाली म्हणजे पोलीस बनले असे नाही, पोलीस भरती मध्ये लागण्याकरिता विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये सुद्धा मेहनत करावी लागेल, चांगले मार्क मिळवावे लागतील.

 

तब्बल तीन वर्षानंतर पोलीस भरती प्रक्रिया महाराष्ट्र राबविण्यात येत असल्यामुळे अनेक तरुण जे पोलीस भरतीची तयारी करत होते अशा तरुणांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. पोलीस भरती 2022 महाराष्ट्र(Police Bharti 2022 Maharashtra) मैदानी चाचणी संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो. ही माहिती सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment