एस टी महामंडळ भरती जाहीर; परभणी येथे दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज | MSRTC Bharti 2022 Parbhani

 

मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग महामंडळामध्ये परभणी जिल्हा डेपो मध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून या MSRTC Bharti 2022 Parbhani अंतर्गत दहावी पास उमेदवार तसेच आयटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. एसटी महामंडळ भरती मध्ये अर्ज करण्यासाठी आयटीआय केलेल्या उमेदवारांना चांगली संधी आलेली आहे. एस टी महामंडळ भरती अर्ज प्रक्रिया तसेच कागदपत्र व इतर माहिती आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

एस टी महामंडळ भरती जाहीर; परभणी येथे दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज | MSRTC Bharti 2022 Parbhani
एस टी महामंडळ भरती जाहीर; परभणी येथे दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज | MSRTC Bharti 2022 Parbhani

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ(MSRTC Bharti 2022) यांच्या वतीने परभणी विभागात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून या एसटी महामंडळ भरती मध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. एसटी महामंडळामध्ये होणारी ही भरती अप्रेंटिस तत्त्वावर आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर उमेदवारांना एसटी महामंडळाच्या सेवेत सामावून घेतले जाणार नसून जोपर्यंत कालावधी आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार आहे. Iti केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येत असून लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एस टी महामंडळ भरती परभणी अंतर्गत कोणत्या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . याविषयी विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.

एस टी महामंडळ भरती पदांचा तपशील MSRTC Bharti 2022 Maharashtra

MSRTC Parbhani Bharti अंतर्गत खालील पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून तुम्ही ज्या फिल्डमध्ये आयटीआय केलेला आहे त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. जसे की तुम्ही इलेक्ट्रिशियन मध्ये आयटीआय केलेला असेल तर ऑटो इलेक्ट्रिशियन या पदाकरिता तुम्ही पात्र आहात. त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. एस टी महामंडळ भरती खालील पदे भरण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाच्या(MSRTC Bharti) वतीने होणारी ही भरती शिकाऊ उमेदवार करिता असून यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे.

1. मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर – 07 जागा
2. ऑटो इलेकट्रिशिअन – 05 जागा
3. पेंटर – 01 जागा
4. पदवीधर पदविका अभियांत्रिकी – 01 जागा
5. मोटर मेकॅनिक व्हेईकल – 43 जागा

एस टी महामंडळ भरती परभणी(MSRTC Requirement 2022 Maharashtra) अंतर्गत वरील पाच पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून आयटीआय व दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

 

महत्वाचं अपडेट: जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू 

Msrtc Requirements पात्रता :-

एस टी महामंडळ भरती अंतर्गत आपल्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहेत. MSRTC Requirement 2022 Maharashtra

1. या भरती अंतर्गत अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास अर्ज करणारा अर्जदार हा किमान दहावी पास असावा व संबंधित विषयांमध्ये आयटीआय केलेला असावा.
2. पदवीधर पदविका अभियांत्रिकी साठी अभियांत्रिकी विषयातून पदवी किंवा पदविका धारण केलेले असावे.
3. या भरती अंतर्गत वयोमर्यादा ही कमीत कमी 14 वर्षे ते जास्तीत जास्त 38 वर्षे ठरवून देण्यात आलेली आहे.

उमेदवारांनी एस टी महामंडळ भरती (st maha mandal bharati) परभणी अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी.

महत्वाचं अपडेट:- वनरक्षक भरती 2022 अर्ज सुरू; आत्ताच अर्ज करा 

 

एस टी महामंडळ भरती अर्ज शुल्क Msrtc Bharati Maharashtra:-

एसटी महामंडळ भरती(MSRTC Bharti) परभणी अंतर्गत अर्ज करण्याकरिता शुल्क आकारण्यात येणारा असून खुल्या तसेच सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 590 रुपये शुल्क आहे तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता 295 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

एस टी महामंडळ भरती परभणी अंतर्गत वेतन किती मिळणार?

मित्रांनो कोणतीही भरती देण्यापूर्वी आपण त्या पोस्टमध्ये मिळणारे वेतन किती आहे हे जाणून घेत असतो त्यामुळे या भरती अंतर्गत आपले सिलेक्शन झाल्यास आपल्याला पेमेंट किती पडेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

या भरती अंतर्गत वेतन श्रेणी ही 8,388 ते 9,436 असणार आहे. ही भरती शिकाऊ उमेदवारांची असल्यामुळे त्यांना हे येवढेच विद्यावेतन मिळते.

एस टी महामंडळ भरती ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

एस टी महामंडळ भरती (st bharati Maharashtra)अंतर्गत भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून संबंधित उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज महामंडळाकडे सादर करायचा आहे.

एस टी महामंडळ भरती अर्ज करण्याची लिंक

वर दिलेल्या लिंक वर जाऊन उमेदवार आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना MSRTC Bharti 2022 Important Instructions:-

मित्रांनो जर तुम्ही एसटी महामंडळ भरती (MSRTC Bharti 2022 Maharashtra) अंतर्गत अर्ज करणार असाल तर त्यापूर्वी खालील महत्त्वाच्या सूचना वाचून घ्याव्या.

1. एस टी महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणारी ही भरती शिकाऊ उमेदवारांची असून अप्रेंटिस म्हणून तुम्हाला नोकरी मिळणार आहे.
2. उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार शिकावू उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
3. ही शिकाऊ उमेदवार भरती असल्यामुळे उमेदवारांना करारनामा करून द्यावा लागेल.
4. शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना एसटी महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्यात येणार नाही
5. या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे अधिकार एसटी महामंडळ परिवहन विभागाने राखून ठेवण्यात आलेली आहे.

एसटी महामंडळ भरती MSRTC Bharti 2022 संदर्भातील ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. या भरती बद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा आम्ही तुमच्या शंका नक्कीच दूर करू.

Leave a Comment