पोलीस भरती 2022 अर्ज कसा करायचा? How to Apply Police Bharti 2022

 

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना आनंदाची बातमी आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती 2022 ही राबविण्यात येणार असून तब्बल 18000 पेक्षा जास्त जागांकरिता पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील खेड्यापाड्यातील दररोज ग्राउंड वर जाणारे विद्यार्थी पोलीस भरती व सैन्य भरती प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी यांना या भरतीमुळे खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्याची आश्वासने देण्यात आलेली होती. परंतु आत्ता पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत अर्ज प्रक्रिया How to Apply Police Bharti 2022 तसेच इतर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

पोलीस भरती 2022 अर्ज कसा करायचा? How to Apply Police Bharti 2022
पोलीस भरती 2022 अर्ज कसा करायचा? How to Apply Police Bharti 2022

 

 

पोलीस भरती प्रक्रिया 2022 महाराष्ट्र police bharti 2022 maharashtra

आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुणांकरिता पोलीस भरती 2022 महाराष्ट्र राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य जवळपास सर्व जिल्ह्यांकरिता पोलीस भरतीच्या जागा काढण्यात आलेल्या आहे. पोलीस भरती 2022 अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली असून लवकरात लवकर पोलीस भरती मध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची कागदपत्रे तयार करून म्हणजे कागदपत्रांची जुळवा जुळव करून अंतिम तारखेच्या आत पोलीस भरती करता अर्ज करायचा आहे.

 

 

पोलीस भरती महाराष्ट्र अर्ज करण्याची तारीख

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत पोलीस भरती अर्ज प्रक्रिया ही 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेली असून पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2022 आहे. विद्यार्थी मित्रांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर कागदपत्रे जमा करून अर्ज करायचे आहे.

 

 

पोलीस भरती 2022 अर्ज कसा करायचा? Police Bharti Maharashtra Application Process

विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत अर्ज How to Apply Police Bharti 2022 सुरू झालेले असून ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती अंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने पोलीस भरती अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. पोलीस भरती अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून आपण अगदी मोबाईल वरून सुद्धा हा अर्ज करू शकतो. पोलीस भरती 2022 अर्ज करण्याकरता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा. police bharti 2022 maharashtra

 

1. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पोलीस भरती अर्ज करण्याकरिता पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

पोलीस भरती अधिकृत संकेतस्थळ

2. आता तुम्हाला सर्वप्रथम नवीन डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन झालेला आहे त्यामध्ये सूचना या पर्यायावर क्लिक करून पोलीस भरती संबंधित असलेल्या संपूर्ण सूचना वाचून घ्यायचा आहे.

3. त्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड मध्ये उजव्या साईटला नवीन नोंदणी करा हा पर्याय असेल त्यावर क्लिक करा. नवीन नोंदणी यापूर्वीच केलेली असेल तर लॉगिन करायचे आहे.

4. पोलीस भरती नवीन नोंदणी करण्याकरिता तुम्हाला विचारले ली तुमची बेसिक माहिती जसे की तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी, पूर्ण नाव ही माहिती प्रविष्ट करा आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

5. आता तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले आहे त्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे त्याकरिता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड जो तुम्ही क्रियेट केलेला आहे किंवा तुमच्या मोबाईलवर मेसेज म्हणून आलेला आहे तो प्रविष्ट करून त्याच प्रमाणे खाली दिलेल्या इमेज वरील अंक टाकून लॉगिन करून घ्या.

6. आता तुम्हाला पोलीस भरती 2022 चा अर्ज करण्याकरिता पाच स्टेप पूर्ण करायच्या आहे.

7. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून तुमचे स्वतःचे पूर्ण नाव इंग्लिश व मराठी मध्ये टाईप करायचे आहे त्याचप्रमाणे पद व घटक हे ऑप्शन निवडायचे आहे.

8. आता तुम्हाला तुमची प्रोफाइल पूर्ण रित्या भरायची आहे म्हणजे प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला विचारलेली संपूर्ण बेसिक माहिती टाकायची आहे.

9. त्यानंतर तुम्हाला पुढे जा वर क्लिक करून संपर्क या पर्यायांमध्ये संपर्क संबंधित संपूर्ण माहिती प्रविष्ट करायची आहे.

10. आता तुम्हाला इतर तपशील प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर

11. तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती शैक्षणिक तपशील या पर्यायांमध्ये संपूर्ण रित्या व्यवस्थितपणे भरायचे आहे.

12. आता ही सर्व माहिती व्यवस्थितपणे भरल्या नंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे कागदपत्र अपलोड करणे आहे.

13. आता तुम्हाला तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर ही व्यवस्थितपणे स्कॅन करून त्यांनी ज्या फॉरमॅटमध्ये मागितलेली आहे त्या फॉरमॅटमध्ये बनवून अपलोड करायची आहे.

14. आता सर्व बाबी पूर्ण झालेले आहे आता सबमिट या पर्यायावर क्लिक करा. आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला तुमचे पेमेंट पूर्ण करायची आहे.

15. ओपन कॅटेगिरी करिता 450 रुपये पेमेंट करायचे आहे. पेमेंट पूर्ण झाल्यानंतरच तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट होईल.

16. जर तुम्ही अर्ज पूर्ण भरला आणि पेमेंट केले नाही तर तुमचा अर्ज ग्राह्य होणार नाही.

17. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या अर्जाला प्रिंट करून घ्यायचे आहे किंवा तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये पीडीएफ च्या स्वरूपात सेव करून ठेवायचे आहे.

18. ते तुम्हाला भविष्यामध्ये कामी पडेल

 

 

पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अर्ज करतांना ही काळजी नक्की घ्या police bharti 2022 maharashtra

पोलीस भरती 2022 महाराष्ट्र(Police Bharti Maharashtra 2022) अंतर्गत पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी अंतिम तारखेच्या आत किंवा अर्ज करण्याच्या पूर्वीच्या तारखे पर्यंत डॉक्युमेंट्स तयार करून घ्यावे. अर्जदारांनी पोलीस भरती अर्ज करताना स्वतःचा मोबाईल नंबर तसेच स्वतःचा ई-मेल आयडी प्रविष्ट करावा. एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाही.

 

पोलीस भरती 2022 कागदपत्रे Documents For Police Bharti 2022

पोलीस भरती महाराष्ट्र (Police Bharti Maharashtra) अंतर्गत आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी आम्ही या पूर्वीच्या पोस्ट मध्ये दिलेली आहे. पोलीस भरती 2022 करिता लागणारी सर्व कागदपत्रे ही तुम्हाला अर्ज करण्यापूर्वीच काढून ठेवायची आहे. police bharti 2022 maharashtra

 

पोलीस भरती कागदपत्रे लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

पोलीस भरती 2022 अर्ज कसा करायचा? How to Apply Police Bharti 2022 संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. पोलीस भरती संदर्भातील माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment