मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्य सिंचनाच्या पद्धतीमध्ये आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत “प्रती थेंब अधिक पीक योजना” ही राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि इतर आधुनिक सिंचन पद्धतीने अनुदान देण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Rashtriya Krushi Vikas Yojana information in Marathi जाणून घेणार आहोत.
![]() |
“प्रती थेंब अधिक पीक योजना” काय आहे? अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे | Rashtriya Krushi Vikas Yojana information in Marathi |
ठिबक सिंचन पद्धतीद्वारे आपण पिकांच्या मुळाशी लहान नळीद्वारे थेंब थेंब पाणी दिल्यामुळे त्या झाडाला आवश्यक तेवढे पाणी मुबलक स्वरूपात उपलब्ध होते. तसेच पाणी इतर ठिकाणी वाया जात नाही, आणि पाण्याची बचत सुद्धा होते. ठिबक सिंचन पद्धती ही महाराष्ट्रात अग्रेसर आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून शेती करत आहेत. संपूर्ण भारत देशाचा विचार केल्यास भारताच्या संपूर्ण ठिबक सिंचनाच्या 60 टक्के सिंचन एकट्या महाराष्ट्रात वापरली जाते. Rashtriya Krushi Vikas Yojana information in Marathi, RKVY – prati themb adhik pik yojna
त्याचप्रमाणे सिंचनाच्या आधुनिक पद्धतीमध्ये तुषार सिंचनाचा सुद्धा समावेश होतो. तुषार सिंचन हे पाणी शिंपडणारे असते. ज्याप्रमाणे अवकाशातून पाणी पडते त्याच पद्धतीने तुषार सिंचन कार्य करते. तुषार सिंचन पद्धतीमध्ये स्पिंकलर्स करत असतात. त्याचे नोझल गोल गोल फिरून आजूबाजूच्या संपूर्ण भागाला पाणी पुरवठा करतात. RKVY – prati themb adhik pik yojna
“प्रती थेंब अधिक पीक योजना” चे स्वरूप RKVY – prati themb adhik pik yojna
आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन पद्धतीकडे वळविणे. पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पिकाची उत्पादन मिळवणे तसेच महाराष्ट्रातील सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवणे हे योजनेचे स्वरूप आहे.RKVY – prati themb adhik pik yojna
“प्रती थेंब अधिक पीक योजना” अटी व पात्रता
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजना चा लाभ मिळवायचा असल्यास आपल्याला खालील अटी व पात्रतेची पूर्तता करावी लागेल.
1. योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांपाशी सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी लागते.
2. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असावे.
3. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचा सातबारा व ८ अ असावा.
4. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करावी लागेल, तसेच आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल.
“प्रती थेंब अधिक पीक योजना” आवश्यक कागदपत्रे
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.RKVY – prati themb adhik pik yojna
1. कास्ट सर्टिफिकेट
2. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याबाबतचे प्रमाणपत्र
3. सातबारा व 8 अ
4. सूक्ष्म सिंचन खरेदी केल्याचा आराखडा व प्रमाणपत्र
5. पूर्व संमती पत्र
6. योजने अंतर्गत खरेदी केलेल्या संचाचे बिल
“प्रती थेंब अधिक पीक योजना” अंतर्गत लाभ प्रक्रिया :-
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या “प्रती थेंब अधिक पीक योजना” RKVY – prati themb adhik pik yojna अंतर्गत जे शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक असतील अशा शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान देण्यात येईल. तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये 40 टक्के हिस्सा राज्य सरकारचा असतो. तर उर्वरित 60 टक्के हा केंद्र शासनाचा असतो.
“प्रती थेंब अधिक पीक योजना” अर्ज प्रक्रिया RKVY – prati themb adhik pik yojna
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या “प्रती थेंब अधिक पीक योजना” करिता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्हाला नोंदणी करून लॉगिन करून अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करण्याच्या लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
“प्रती थेंब अधिक पीक योजना” संपर्क :-
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास किंवा तुम्हाला काही अडचणी येत असल्यास, कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.
शेतकऱ्यांना सिंचनाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजना विषयीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना देखील शेअर करा. तुमच्या काही शंका प्रश्न असतील तर कमेंट करा आम्ही तुमच्या शंकाचे नक्कीच निरसन करू.