फळ पिक विमा योजना 2022 अर्ज सुरू; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी | Fal Pik Vima Yojana 2022 Maharashtra

 

शेतकरी मित्रांनो जी शेतकरी फळबाग लागवड करतात. किंवा त्यांच्या शेतामध्ये फळबाग आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे फळ पिक विमा योजना 2022 अंतर्गत अर्ज सुरू झालेले आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण फळ पीक विमा योजना 2022 महाराष्ट्र(Fal Pik Vima Yojana 2022 Maharashtra) संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

फळ पिक विमा योजना 2022 अर्ज सुरू | Fal Pik Vima Yojana 2022 Maharashtra
फळ पिक विमा योजना 2022 अर्ज सुरू | Fal Pik Vima Yojana 2022 Maharashtra

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना(Fal Pik Vima Yojana) 2022-23 करिता नवीन अर्ज मागविण्यात येत आहे. फळ पीक विमा 2022 अंतर्गत शेतकऱ्यांना खालील पिकांचा फळ पिक विमा काढता येणार आहे. फळ पिक विमा 2022-23(Fal Pik Vima Yojana) अंतर्गत सात फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये द्राक्ष, केळी, मोसंबी, आंबा, डाळिंब,  संत्रे आणि पपई या फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. Fal Pik Vima Yojana 2022

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान यादीत नाव नाही आले? हे काम करा लगेच येईल नाव!

फळपीक उत्पादक शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळ पिक विमा काढल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकाचे नुकसान झाल्यास विमा धारक शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असतील. फळ पीक विमा योजना 2022(fal pik vima yojana 2022) ही कर्ज असलेले तसेच कर्ज नसलेले शेतकरी यांच्या करिता लागू आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या फळ पिकांची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या फळ पिक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई वितरित करण्यात येते.Fal Pik Vima Yojana 2022

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना ची नवीन यादी आली! लगेच करा डाऊनलोड

 

त्यामुळे जे शेतकरी फळ पिकवतात अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या फळ पिकांचा पिक विमा(fal pik vima yojana Maharashtra) काढून घ्यावा. फळ पीक विमा योजना ही केंद्र शासन तसेच राज्य शासन व शेतकरी यांच्या विद्यमानाने राबविण्यात येत असते. म्हणजेच शेतकरी स्वतःचा विमा हप्ता सुरुवातीला भरतात, त्यानंतर राज्य सरकार त्यांच्या हप्त्याची रक्कम विमा कंपनीला देते व केंद्र सरकार सुद्धा याच पद्धतीने त्यांच्या हप्त्याची रक्कम किंवा कंपनीस देते. त्यानंतर प्रत्येक उत्पादक शेतकऱ्यांच्या फळ पिकांची नुकसान झाल्यास त्यांना फळ पिक विमा वितरित करण्यात येतो.

Leave a Comment