कोलगेट स्कॉलरशिप 2022 अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता | Colgate Keep India Smiling Foundational Scholarship

 

विद्यार्थी मित्रांनो वर्ष 2022 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यांच्याकरिता कोलगेट स्कॉलरशिप 2022 अंतर्गत 20,000 आणि 30,000 रुपये ही राबविण्यात येत आहे. ही स्कॉलरशिप दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना Colgate Keep India Smiling Foundational Scholarship अंतर्गत वितरित करण्यात येत आहे. तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्य करिता तसेच करिअरच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्या याकरिता तसेच पुढील शिक्षण घेण्याकरिता पाठपुरावा म्हणून ही स्कॉलरशिप देण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण कोलगेट स्कॉलरशिप 2022 (Colgate Keep India Smiling Foundational Scholarship)अंतर्गत अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता काय आहे? याविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

कोलगेट स्कॉलरशिप 2022 अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता | Colgate Keep India Smiling Foundational Scholarship
कोलगेट स्कॉलरशिप 2022 अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता | Colgate Keep India Smiling Foundational Scholarship

कोलगेट स्कॉलरशिप काय आहे?

कोलगेट स्कॉलरशिप हे नुकतेच दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी स्कॉलरशिप स्कीम आहे. कोलगेटच्या Colgate Keep India Smiling Foundational तर्फे ही स्कॉलरशिप राबविण्यात येत आहे. कोलगेट कंपनी त्यांच्या csr नुसार ही स्कॉलरशिप राबवत आहे. Csr म्हणजे corporate social responsibility होय. प्रत्येक प्रायव्हेट कंपनी त्यांची सोशल जबाबदारी म्हणून सामाजिक दायित्व म्हणून अशा प्रकारच्या योजना राबवित असते. त्याच प्रकारे कोलगेट सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडविण्याकरिता मदत व्हावी म्हणून ही स्कॉलरशिप योजना राबवित आहे.

कोलगेट स्कॉलरशिप 2022 उद्दिष्ट

कोलगेट कंपनीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कोलगेट स्कॉलरशिप 2022(Colgate Scholarship 2022) चे उद्दिष्ट हे जे विद्यार्थी पात्र आणि गुणवान आहेत, तसेच अभ्यासामध्ये हुशार असून पुढील शिक्षण घेऊ इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याकरिता तसेच त्यांना त्यांच्या संधी ओळखण्याकरिता मदत व्हावी म्हणून राबविण्यात येत आहे. कोलगेट कंपनीच्या वतीने राबविण्यात येणारा हा स्कॉलरशिप कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य उज्वल करण्याकरिता मार्गदर्शन करणार आहे. Colgate Keep India Smiling Foundational Scholarship

कोलगेट स्कॉलरशिप पात्रता व निकष

कोलगेट स्कॉलरशिप 2022(Colgate Scholarship 2022) अंतर्गत लाभ घेण्यासाठी तसेच अर्ज करण्याकरिता विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या निकषांची तसेच पात्रतांची पूर्तता करावी.

1. वर्ष 2022 मध्ये दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या कोलगेट स्कॉलरशिप प्रोग्राम 2022 अंतर्गत अर्ज करू शकतात.
2. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत किमान 75 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
3. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
4. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच जे विद्यार्थी तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत आहे तसेच चार वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. जसे की इंजीनियरिंग, बीडीएस डेंटल, एमबीबीएस. हे विद्यार्थी सुद्धा स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्र आहेत.
5. कोलगेट स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे पाच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.Colgate Keep India Smiling Foundational Scholarship

हे नक्की वाचा:- पी एम यशस्वी स्कॉलरशिप अर्ज सुरू

कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत मिळणारी स्कॉलरशिप किती?

कोलगेट स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत वितरित करण्यात येणारे स्कॉलरशिप ही विद्यार्थी शिकत असलेल्या शिक्षणावर अवलंबून आहे. म्हणजे जर विद्यार्थी तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेला असेल तर त्या विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी 30 हजार रुपये स्कॉलरशिप मिळते. कोलगेट स्कॉलरशिप 2022 अंतर्गत विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये आणि 30 हजार रुपये स्कॉलरशिप चे प्रावधान आहे. Colgate Keep India Smiling Foundational Scholarship in Marathi

कोलगेट स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थी मित्रांनो कोलगेट स्कॉलरशिप 2022 अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. Colgate Keep India Smiling Foundational Scholarship Apply Now

1. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक
2. उत्पन्नाचा दाखला
3. मार्कशीट
4. बोनाफाईड प्रमाणपत्र
5. कॉलेज ऍडमिशन पावती
6. अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास

वरील कागदपत्रे असल्यास आपण कोलगेट स्कॉलरशिप मिळवण्याकरिता पात्र आहोत.

कोलगेट स्कॉलरशिप 2022 अर्ज प्रक्रिया Colgate Scholarship 2022 Application Process

आता आपण कोलगेट स्कॉलरशिप 2022 अंतर्गत Colgate Scholarship 2022 Application Process In Marathi जाणून घेणार आहोत.Colgate Keep India Smiling Foundational Scholarship in Marathi

हे नक्की वाचा:- sc आणि obc विद्यार्थ्यांकरिता वार्षिक 50,000 स्कॉलरशिप अर्ज सुरू

विद्यार्थी मित्रांनो कोलगेट स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कोलगेट स्कॉलरशिप 2022(Colgate Scholarship 2022) अंतर्गत अर्ज करायचा असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. कोलगेट स्कॉलरशिप करिता अर्ज आपण घरबसल्या करू शकतो. आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने किंवा नेट कॅफेवर जाऊन कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज करू शकतात. कोलगेट स्कॉलरशिप अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा Colgate Keep India Smiling Foundational Scholarship Apply Now

वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही कोलगेट स्कॉलरशिप अर्ज करण्याच्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात. कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी कोलगेट कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्कॉलरशिप संबंधित सर्व माहिती एक वेळेस वाचून घ्यावी नंतरच अर्ज करावा.

कोलगेट स्कॉलरशिप 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख

कोलगेट स्कॉलरशिप 2022 अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करायचे आहे. कोलगेट स्कॉलरशिप 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31-12-2022 आहे. Colgate Keep India Smiling Foundational Scholarship. कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही जवळ आलेली असल्यामुळे जर तुम्ही कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज करण्यास पात्र असाल तर लवकरात लवकर अंतिम तारखेच्या आत अर्ज करून घ्यावा.

कोलगेट स्कॉलरशिप नियम व अटी काय आहेत?

जे विद्यार्थी कोलगेट स्कॉलरशिप 2022(Colgate Keep India Smiling Foundational Scholarship) अंतर्गत अर्ज करू इच्छित आहेत, त्यांनी खालील नियम व अटी यांची पूर्तता करायला हवी.

हे नक्की वाचा:- बँकिंग, रेल्वे, एमपीएससी आणि एसएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप

कोलगेट स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत फक्त भारतीय नागरिकांना अर्ज करता येणार आहे. कोलगेट स्कॉलरशिप प्रोग्राम हा दारिद्र्यरेषेखालील तसेच जे व्यक्ती आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशांकरिता लागू आहे. कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट आणि अंतिम निवडी संबंधित विविध पायऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना निवडी संदर्भात कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करता येणार नाही. तसेच विद्यार्थी निवड प्रक्रियेमध्ये काही महिन्याचा कालावधी लागू शकतो. ज्या विद्यार्थ्यांची कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत निवड करण्यात येईल त्यांना कोलगेट अंतर्गत संपर्क करण्यात येईल. कागदपत्रांची पडताळणी करण्याचे अधिकार कोलगेट कडे आहे. जर उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची खोटी माहिती देऊन दिशाभूल केली तर त्या संबंधित सर्व अधिकार हे कोलगेट कडे असतील. अशा वेळेस दिलेली शिष्यवृत्ती परत घेण्याचे अधिकार कोलगेट कडे राखीव आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कोलगेट स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारची नोंदणी शुल्क किंवा अर्जाची फी भरावी लागत नाही.

कोलगेट स्कॉलरशिप संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटत असेल, Colgate Scholarship संदर्भातील ही माहिती सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.

Leave a Comment