आपले सरकार सेवा केंद्र नवीन अर्ज सुरू | Apale Sarkar Seva Kendra 2022 Nondani

 

मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्याकरिता रायगड जिल्ह्याच्या रिक्त जागा प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी 2022(Apale Sarkar Seva Kendra 2022 Nondani) रायगड जिल्हा करिता सुरू झालेली आहे. 433 रिक्त जागांकरिता आपले सरकार सेवा केंद्र करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. आजच्या पोस्टमध्ये आपण आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी करिता अर्ज कसा करायचा? अटी, शर्ती व पात्रता हे जाणून घेणार आहोत.

 

आपले सरकार सेवा केंद्र नवीन अर्ज सुरू | Apale Sarkar Seva Kendra 2022 Nondani
आपले सरकार सेवा केंद्र नवीन अर्ज सुरू | Apale Sarkar Seva Kendra 2022 Nondani

 

 

 

आपले सरकार सेवा(Apale Sarkar Seva Kendra Registration) केंद्र उभारून आपण आपल्या आपले सरकार सेवा केंद्र आयडी मार्फत नागरिकांची विविध ऑनलाईन कामे करून देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतो. तसेच चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतो. रायगड जिल्ह्यातील 433 रिक्त आपले सरकार सेवा केंद्र करिता नवीन अर्ज मागविणे सुरू झालेले आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपले सरकार सेवा केंद्र बाबत नवीन जाहिरात काढलेली आहे. Apale Sarkar Seva Kendra 2022 Nondani

 

 

आपले सरकार सेवा केंद्र रायगड अर्ज करण्याची तारीख

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी आपले सरकार सेवा केंद्र(Apale Sarkar sewa kendra) करिता अर्ज 13 सप्टेंबर 2022 पासून 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत करावयाचा आहे. How to Apply For Apale Sarkar Seva Kendra  Online

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी मधून वगळलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; 755 कोटी रुपये वितरित

 

आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी ज्यांनी अर्ज केलेले आहे, त्यांच्या अर्जाची छाननी करण्यात येईल व पात्र अर्जदारांची यादी जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल. Aaple Sarkar Seva Kendra

 

 

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज कुठे मिळेल Where to get Apale Sarkar Seva Kendra application

आपले सरकार सेवा केंद्र(ASSK-Apale Sarkar Seva Kendra) रायगड अंतर्गत करावयाचा अर्ज हा ऑफलाईन आहे. आपले सरकार सेवा केंद्र करिता अर्ज हा जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळेल. तसेच आम्ही या पोस्टमध्ये तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र करिता करावयाच्या अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिलेला आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आपले सरकार सेवा केंद्राचा नमुना डाऊनलोड करून घ्या.

 

 

आपले सरकार सेवा केंद्र रायगड अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागा पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी अटी व शर्ती

आपले सरकार सेवा केंद्र(Apale Sarkar Seva Kendra) चालकांना आपले सरकार सेवा केंद्र मध्ये नमूद असलेल्या सर्व योजना पुरविणे बंधनकारक आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आपले सरकार सेवा केंद्राचा बोर्ड फलक हा लावला पाहिजे. आपले सरकार सेवा केंद्र अर्जदारास या जागे करिता आपले सरकार सेवा केंद्र देण्यात आलेले आहेत त्याच जागेवर आपले सरकार सेवा केंद्र चालविले पाहिजे. शासनाने जो ठराविक वेळ ठेवून दिलेला आहे, त्या वेळेमध्ये आपले सरकार चालविले पाहिजे. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत विविध सेवांकरिता जो दर ठरवून देण्यात आलेला आहे, त्याच दराने ग्राहकांकडून पैसे घेणे. कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क घेऊ नये. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे. शासनातर्फे देण्यात येणारे निर्देश वेळोवेळी पाहणे आवश्यक आहे. आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकरिता सीएससी आयडी आवश्यक आहे. त्यांनी सर्वप्रथम CSC ID काढणे बंधनकारक आहे. aaple sarkar seva kendra registration

 

 

   हे नक्की वाचा:- बियाणे अनुदान योजना 2022 अर्ज सुरू

 

आपले सरकार सेवा केंद्र रायगड अर्ज कुठे करायचा?

आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत(aaple sarkar seva kendra registration) रायगड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जमा करावयाचा आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक ते कागदपत्रे जोडून जमा करायचा आहे.

 

 

आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रिया

सर्वप्रथम आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांनी केलेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल. अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास अर्ज अपात्र करून त्यांना दुरुस्त करण्याकरिता संधी देण्यात येईल. त्यानंतर अंतिम पात्र झालेल्या अर्जदारांची यादी प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना आपली सरकार सेवा केंद्र आयडी वितरित करण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!