आता ऊस नोंदणी करा घरबसल्या ऑनलाईन | Sugarcane Nondani Online Process

 

मित्रांनो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे. जर तुम्ही तुमच्या शेतात उसाचे उत्पादन करत असाल तर, तुम्हाला आता ऊस नोंदणी करण्यासाठी  कारखान्यांमध्ये जाण्याची गरज नाही घरबसल्या आपण ऑनलाईन पद्धतीने ऊसाची नोंदणी करू शकतात. आजच्या या पोस्ट मध्ये आपण ऊसाची नोंदणी ऑनलाईन कशी करायची? या विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. Sugarcane Nondani Online, Sugarcane Registration Online Process

 

आता ऊस नोंदणी करा घरबसल्या ऑनलाईन | Sugarcane Nondani Online Process Sugarcane Registration Online ऊस नोंदणी ऑनलाईन
आता ऊस नोंदणी करा घरबसल्या ऑनलाईन | Sugarcane Nondani Online Process

 

 

 

या पूर्वी जे शेतकरी उसाचे पिक घेत होते, त्या शेतकऱ्यांना उसाचे पीक आल्यानंतर त्यांच्या उसाची नोंदणी करावी लागत होती, उसाची नोंदणी ही शेतकऱ्यांना कारखान्यामध्ये जाऊन करावी लागत होती, उसाची नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट वेळ खाऊ आणि खर्चिक होती परंतु आता उसाची नोंदणी ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ॲप्लिकेशनच्या साह्याने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण सहजरीत्या आपल्या मोबाईलच्या साह्याने उसाची नोंदणी ही करू शकतो. त्यामुळे आपला वेळ व पैसा वाचणार आहे. उसाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता मोबाईल ॲप्लिकेशन हे लॉन्च करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता सहज कोणताही शेतकरी जे शेतकरी ऊस पिकवतात ते आता घरबसल्या(sugarcane registration Maharashtra) त्यांच्या उसाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.

 

 

हे नक्की वाचा:- मोफत कडबा कुट्टी वितरण योजना अर्ज सुरू

 

ऊसाची नोंदणी करण्याच्या ऑफलाइन प्रोसेस मध्ये म्हणजेच कारखान्यात जाऊन उसाची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी बांधवांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. जसे की आपला ऊस कोणत्या कारखान्याला विकायचा? ऊसाची नोंदणी होण्याच्या प्रक्रियेला एकूण किती दिवस लागतील? आपण ज्या दिवशी उसाची नोंदणी करायला जातो त्या दिवशी उसाची नोंदणी होणार की नाही? आणि आपण ऊसाची नोंदणी केली तरी सुद्धा ऊसाला तोड कधी येते? असे अनेक प्रकारचे प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पडत होते. परंतु आता शासनाच्या वतीने ऑनलाइन पद्धत(Sugarcane Online Registration) उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व पर्याय निवडता येत आहे. ऊसाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केल्यास आपल्याला दोन कारखाने निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता ऊसाची नोंदणी करण्याची प्रक्रिया ही सुलभ झालेली आहे.

 

 

हे नक्की वाचा:- महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी वितरण योजना अर्ज सुरू 

 

ऊसाची नोंदणी ऑनलाईन कशी करायची?How to register sugarcane online?

 

ऊस नोंदणी ऑनलाईन पद्धतीने (sugarcane  online registration 2022 Maharashtra) करण्यासाठी शासनाच्या वतीने मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले आहे. ऊस नोंदणी ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे, ते मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर आवश्यक ती माहिती टाकून तुम्ही उसाची नोंदणी करू शकतात.

 

ऊस नोंदणी करण्याचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

मित्रांनो ऊस उत्पादक शेतकरी बांधवांविषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशीच माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment