महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू | Pithachi Girani (flour mill) Yojana Online Application

मित्रांनो महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी करिता ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत. या पिठाची गिरणी योजना अंतर्गत महिलांना फ्री मध्ये पिठाची गिरणी वितरित करण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी मिळवण्याकरिता अर्ज कसा करायचा? अर्ज कोठे करायचा? Free Pithachi Girani (flour mill) करिता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.Mofat Pithachi Girani Yojana
महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू | Pithachi Girani (flour mill) Yojana Online Application
महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू | Pithachi Girani (flour mill) Yojana Online Application

 

मित्रांनो महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्रशासन हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवीत असते. अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येत असतात. सरकारच्या वतीने महिलांकरिता मोफत पिठाची गिरणी ही देण्यात येणार आहे. 100 टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोफत पिठाची गिरणी योजना मुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार देखील प्राप्त होणार आहे. त्यामुळे खास महिलांकरिता राबविण्यात येणारी Pithachi Girani (flour mill) ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. Government Schemes Maharashtra

 

हे नक्की वाचा:- महा समृद्धी महिला सक्षमीकरण योजना

 

पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे Pithachi Girani (flour mill) Scheme Required Documents

महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या या पिठाची गिरणी योजना(Mofat Pithachi Girani Yojana) अंतर्गत अर्ज करण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
1. अर्जदार महिलाही बारावी शिकलेली असावी. त्याबाबत पुरावा जोडावा.
2. आधार कार्ड
3. 8अ उतारा(घराचा)
4. विहित नमुन्यातील अर्ज
5. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा
6. बँक पासबुक
7. विज बिल
वरील कागदपत्रे जोडून आपण फ्री पिठाची गिरणी योजना(Free flour mill Scheme) अंतर्गत अर्ज करू शकतो.
महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू | Pithachi Girani (flour mill) Yojana Online Application

या योजने अंतर्गत कोण अर्ज करू शकतो?

मित्रांनो शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोफत पिठाची गिरणी योजना अंतर्गत महिला अर्ज करू शकतात. 18 ते 60 वयोगटातील मुली तसेच महिला या योजने अंतर्गत अर्ज करू शकतात.

 

हे नक्की वाचा:- विधवा पेन्शन योजना माहिती मराठी

 

मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज कुठे मिळेल?

मित्रांनो आम्ही या पोस्टमध्ये मोफत पिठाची गिरणी योजना(Mofat Pithachi Girani Yojana) अंतर्गत अर्जाचा नमुना हा उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून, विहित नमुन्यातील अर्ज हा व्यवस्थितपणे भरून सबमिट करायचा आहे. मोफत पीठ गिरणी योजना चा अर्ज जर तुमच्या जिल्ह्यासाठी ऑनलाइन सुरू असेल तर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. जर अर्ज ऑफलाईन करायचा असेल तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात करू शकतात.
मोफत पिठाची गिरणी योजना संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशीच माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment