अतिवृष्टी मधून वगळलेल्या शेतकऱ्यांना 755 कोटी रुपये निधी मंजूर | Pik Nuksan Bharpai Yadi 2022 Maharashtra

 

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीमुळे जे शेतकरी बाधित झालेले होते परंतु त्या शेतकऱ्यांचा समावेश हा अतिवृष्टीमध्ये करण्यात आले नव्हता. म्हणजेच अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 चा निधी मिळणार नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. जे शेतकरी अतिवृष्टीच्या निकषात बसले नव्हते परंतु ते बाधित होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने 755 कोटी रुपयांची मदत जाहीर(PIK Nuksan Bharpai 2022 Maharashtra Madat Jahir) केलेली आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अतिवृष्टी च्या निकषात न बसणाऱ्या व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिलासा देण्यासाठी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.maharashtra ativrushti nuksan bharpai yadi, Pik Nuksan Bharpai Yadi,PIK Nuksan Bharpai 2022 Maharashtra

अतिवृष्टी मधून वगळलेल्या शेतकऱ्यांना 755 कोटी रुपये निधी मंजूर | Pik Nuksan Bharpai Yadi 2022 Maharashtra
अतिवृष्टी मधून वगळलेल्या शेतकऱ्यांना 755 कोटी रुपये निधी मंजूर | PIK Nuksan Bharpai Yadi 2022 Maharashtra

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये जोरदार अतिवृष्टी (Ativrushti madat jahir) झालेली होती. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने यापूर्वी शासन निर्णय काढून निधी हा वितरित केलेला आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये असे बरेच शेतकरी होते अशी बरेच गावे व महसूल मंडळ होती ज्यामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा त्या महसूल मंडळाचा समावेश हा अतिवृष्टी ग्रस्त मध्ये करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे ते शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 च्या निधीपासून वंचित राहणार होते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टीच्या निकषात  न बसणाऱ्या परंतु बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 755 कोटी रुपये निधी हा मंजूर केलेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. Ativrushti madat jahir, Ativrushti madat jahir 2022

आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची उप समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी हा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मागील अतिवृष्टीच्या याध्या मध्ये ज्या शेतकऱ्यांची गाव किंवा महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आलेली नव्हती, अशा शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन जो निधी जाहीर केलेला आहे त्या अंतर्गत लाभ मिळणार आहे. Ativrushti Anudan Maharashtra 2022,Ativrushti madat jahir

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 अंतर्गत नवीन मदत किती मिळणार?

ज्या शेतकऱ्यांची नावे या आधी जाहीर करण्यात आलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये नव्हती अशा नवीन शेतकऱ्यांना Pik Nuksan Bharpai Nidhi हा निधी मिळणार आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार करता एकूण क्षेत्र- 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र आणि एकूण निधी –  755 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहे. maharashtra ativrushti nuksan bharpai yadi

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 याद्या डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी 2022 वितरित करण्यासाठी एकूण 5 लाख 49 हजार 646 हेक्टर जमिनीचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि याकरिता 755 कोटी रुपये वितरित करण्यात येत आहे.

महत्वाचे अपडेट:- 50,000 अनुदान योजना नवीन यादी आली; लगेच डाऊनलोड करा 

नुकसान भरपाई महाराष्ट्र 2022 Pik Nuksan Bharpai 2022 Maharashtra

आज मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासंबंधी दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. Pik Nuksan Bharpai Yadi या निर्णयाचे स्वागत अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी परंतु ज्यांचा समावेश अतिवृष्टी मध्ये करण्यात आलेल्या नव्हता असे शेतकरी करत आहेत. बरीच महसूल मंडळे काही कारणास्तव अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी 2022 पासून वंचित राहणार होती. ही गोष्ट विचारात घेता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या निवारणाकरिता आत्तापर्यंत चार हजार पाचशे कोटी रुपये निधी हा शासनाने वितरित केला आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या विविध निकषामुळे बरेच शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार होते. परंतु महाराष्ट्र शासनाने निकषाच्या पलीकडे जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता नवीन नुकसान भरपाई निधी वितरित केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. सरकारच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ मिळणार असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. Pik Nuksan Bharpai Yadi, Pik Nuksan Bharpai Maharashtra 2022

आपल्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती, सोलापूर आणि औरंगाबाद या विभागातील आयुक्तांनी राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव पाठविले होते. त्यामुळे आता राज्य शासनाने यावर ठोस निर्णय घेऊन नुकसान भरपाई नवीन निधी जाहीर केलेला आहे.pik nuksan bharpai yojana

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 निधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार? Pik Nuksan Bharpai Yadi

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 755 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे. अतिवृष्टीचा 755 कोटी रुपये निधी हा 9 जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे. आता आपण खाली त्या जिल्ह्यांची नावे व त्या जिल्ह्यामधील बाधित क्षेत्र दिलेले आहे. त्या जिल्ह्यामध्ये जेवढे बाधित क्षेत्र आहे तेवढ्या शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे.

हे नक्की वाचा:- नवीन घरकुल यादी 2022-23 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अतिवृष्टी नुकसान भरपाई समाविष्ट जिल्हे Pik Nuksan Bharpai Maharashtra

अतिवृष्टीच्या निकषापासून वगळण्यात आलेल्या खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने 755 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात येत आहे. खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत मिळणार आहे. अतिवृष्टी जिल्हे 2022, ativrushti nuksan bharpai jilhe list

1. यवतमाळ- 36711.31  हेक्टर क्षेत्र
2. औरंगाबाद – 12679 हेक्टर क्षेत्र
3. सोलापूर- 74446 हेक्टर क्षेत्र
4. लातूर- 213251 हेक्टर क्षेत्र
5. परभणी- 2545.25 हेक्टर क्षेत्र
6. बीड- 48.80 हेक्टर क्षेत्र
7. उस्मानाबाद- 112609.95 हेक्टर क्षेत्र
8. जालना- 678 हेक्टर क्षेत्र
9. हिंगोली- 96677 हेक्टर क्षेत्र

वरील नऊ जिल्ह्यातील पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 755 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण क्षेत्र हे 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर आहे. Pik Nuksan Bharpai Yadi 2022 Maharashtra

अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या निकषामुळे वंचित ठेवण्यात येत होते, परंतु त्यांना आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने निधी वितरित केल्यामुळे अतिवृष्टीची रक्कम मिळणार आहे. याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment