मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान | Mini Tractor Anudan Yojana Maharashtra

 

मिनी ट्रॅक्टर हे शेतकरी बांधवांना खूप महत्वपूर्ण ठरत आहे.  आपण मिनी ट्रॅक्टर च्या माध्यमातून आपल्या जमिनीची कामे तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीपयोगी कामे करून देऊन चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतो. मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना(Mini Tractor Anudan Yojana) अंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. 90% अनुदानावर शेतकरी बांधवांना मिनी ट्रॅक्टर पुरवण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Mini Tractor Anudan Yojana 2022 Maharashtra अंतर्गत अर्ज कसा करायचा? या विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. मिनी ट्रॅक्टर योजना

 

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान | Mini Tractor Anudan Yojana Maharashtra मिनी ट्रॅक्टर योजना
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान | Mini Tractor Anudan Yojana Maharashtra

 

 

 

मित्रांनो जे शेतकरी परभणी जिल्ह्यातील आहेत. आणि ते अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील आहेत, अश्या घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही या Mini Tractor Anudan Yojana 2022 Maharashtra अंतर्गत पुरविण्यात येत आहे. या मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र करिता 90% अनुदान हे शासन देत आहे. mini tractor yojana

 

 

मिनी ट्रॅक्टर योजना अटी व शर्ती Mini tractor anudan yojana maharashtra

 

mini tractor yojana अंतर्गत खालील प्रमाणे अटी व शर्ती आहेत.

1. या मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना अर्ज करता येणार आहे.

2. या अर्ज करणाऱ्या बचत गटातील ८०% सदस्य हे नवबौध्द घटकांतील व अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावे लागते.

3. अर्ज करणारे गटातील सदस्य म्हणजेच अर्जदार हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे.

4. जो बचत गट या मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज करत आहे, त्या गटातील सचिव आणि अध्यक्ष हे नवबौध्द घटकांतील किंवा अनुसूचित जाती या प्रवर्गातील असावे लागते.

5. या योजनेअंतर्गत ज्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर देण्यात येईल त्यांना मिनी ट्रॅक्टर हा विकता येणार नाही किंवा गहाण ठेवता येणार नाही.

 

 

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना लाभ प्रक्रिया Mini Tractor Subsidy Scheme Benefit Process

 

या मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना (Mini Tractor Yojana) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3 लाख 50 हजार रुपये पर्यंत लाभ देण्यात येईल. म्हणजेच या योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. हे   अनुदान 3 लाख 15 हजार रुपये देण्यात येईल. आणि उर्वरित 10% हिस्सा म्हणजेच 35 हजार रुपये हे स्वतः लाभार्थी बचत गटात भरावे लागतील. या योजने अंतर्गत बचत गटास किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यास 90% अनुदान हे देण्यात येणार असल्याने उर्वरित रक्कम बचत गट सहज रित्या भरून मिनी ट्रॅक्टर मिळवू शकतात.

 

 

हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना 2022-23 लाभार्थी यादी जाहीर

 

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ( Mini Tractor Yojana 2022)

जे स्वयंसहायता बचत गट या मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना करिता लाभ घेऊ इच्छित आहेत, त्यांच्याकडे बचत गटाच्या नावाचे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच ती बँक खाते शी अध्यक्ष आणि सचिवांचे आधार कार्ड लिंक असावे. या मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत ज्या बचत गटांची निवड होईल त्यांना संबंधित यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन त्याची प्रमाणपत्र सादर करायचे आहे.

 

 

मिनी ट्रॅक्टर योजना अनुदान कसे वितरित करण्यात येईल

ज्या बचत गटांची या मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत निवड करण्यात येत असते त्यांना मिनी ट्रॅक्टर व संबंधित उपसाधने संबंधित यंत्रे खरेदी करायची असते त्यानंतर खरेदी केल्याची पावती त्यांना जमा करावी लागते. त्यानंतर बचत गटास त्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण अनुदानाच्या 50 टक्के रक्कम जमा करण्यात येते. आता उर्वरित 50 टक्के अनुदानाची रक्कम ही बचत गटास मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची साधने यांची नोंद आरटीओ कार्यालयामध्ये केल्यानंतर जमा करण्यात येते. बचत गटाच्या बँक खात्यामध्ये संपूर्ण अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.

 

 

हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी करण्यात आले, हे महत्त्वपूर्ण बदल!

 

मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र राबविण्याचा उद्देश:-

या मिनी ट्रॅक्टर योजनेचा(Mini Tractor Anudan Yojana Maharashtra 2022) उद्देश हा बचत गटांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावी. त्याचप्रमाणे बचत गट ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलीत यंत्र भाड्याने देऊ चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतात. त्याचप्रमाणे या mini tractor yojana अंतर्गत बचत गटातील सदस्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

 

 

मिनी ट्रॅक्टर योजना आवश्यक कागदपत्रे

Mini Tractor Yojana अंतर्गत लाभार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

 

1. बँक पासबुक

2. बचत गटाचे घटना पत्र

3. बचत गटाच्या कार्यकारणी मधील सदस्यांची मूळ यादी

4. बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला

5. कुरा कागदावर फोटो सहित बचत गटाची ओळख पत्र

6. आधार कार्ड, पॅन कार्ड

 

 

मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज प्रक्रिया Mini Tractor Scheme Application Process

 

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत ज्या बचत गटांना अर्ज करायचा असेल त्यांनी लेखी अर्ज आणि त्या अर्जासोबत आवश्यक ती दर्शवलेली सर्व कागदपत्रे जोडून अर्ज हा समाज कल्याण कार्यालय सहाय्यक आयुक्त परभणी यांच्याकडे जमा करायचा आहे.

 

 

हे नक्की वाचा:- कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत विविध यंत्रांसाठी आणि अवजारांसाठी अर्ज कसा करायचा?

 

मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख Mini Tractor Yojana Application Last Date

 

मिनी ट्रॅक्टर योजना(Mini Tractor Yojana) अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर 2022 आहे.

 

 

मित्रांना अशाप्रकारे आपण मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज करू शकतो, आता सध्या परभणी जिल्ह्यातील अर्जदारांसाठी या योजनेअंतर्गत अर्ज सुरू आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा परभणी जिल्ह्यातील असाल तर अर्ज करू शकतात. उर्वरित जिल्ह्यांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर नवीन पोस्ट च्या माध्यमातून कळविण्यात येईल. ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा.

Leave a Comment