लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार एवढी मदत | Lampi Virus Mantrimandal Nirnay


मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात त्याचप्रमाणे देशात सुद्धा लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातून लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा रोग नियंत्रण आणण्याकरिता निधीची तरतूद करण्यात येत आहे. लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य शासनाच्या वतीने मदत जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जाहीर केलेल्या निधीबद्दल माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. Lampi Virus Nuksan Bharpai 


लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार एवढी मदत | Lampi Virus Mantrimandal Nirnay
लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार एवढी मदत | Lampi Virus Mantrimandal Nirnay मित्रांनो लम्पी(Lumpy Virus) हा रोग संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे. हा जनावरांच्या त्वचेवर होणारा रोग आहे.  महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीमध्ये लम्पी या रोगाच्या प्रादुर्भावामुळे एखाद्या जनावराचा मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे.


हे नक्की वाचा:- लंपी आजार लक्षणे, उपाय लसीकरण


लम्पी नुकसान भरपाई मदत Lumpy Nuksan Bharpai Maharashtra 

Lampi Virus चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपयांची मदत देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती ही मदत जिल्ह्याला पुरवणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात या रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांच्या जनावराचा या आजार मुळे मृत्यू झाल्यास त्यांना राज्य शासन नुकसान भरपाई देणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणा मधील जे निकष आहेत त्या निकषानुसार ही भरपाई देण्यात येणार आहे. Lampi Nuksan Bharpai Nidhi 


हे नक्की वाचा:- घरकुल योजना यादी 2022 जाहीर; अशी करा डाऊनलोड


नुकसान भरपाई देण्याकरिता एक समिती गठित करण्यात येत आहे. ही नुकसान भरपाई देण्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे नेमून देण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष पदी विराजमान करण्यात आलेली आहे. एक कोटी रुपयांची तातडीने मदत देण्यात आलेली आहे या मदती अंतर्गत हा रोग नियंत्रित आणण्यासाठी लस, औषधी आणि इतर साधन सामग्री करिता खर्च करण्यात येत आहे.

Post a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने