या जिल्ह्यासाठी सुप्रीम कोर्टाने 510 कोटींचा पीक विमा केला मंजूर | Kharip Pik Vima 2022 Manjur

 

मित्रांनो खरीप पीक विमा(kharip pik vima) मिळवा या करिता शेतकऱ्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती, शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास पीक विमा कंपनीने हात वर केले होते, त्यामुळे या संबंधित याचिका ही सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली होती, त्यावर सुप्रीम कोर्टाने सुप्रीम निर्णय देऊन या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला आहे. या लढ्यात शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. यापूर्वी हाय कोर्टाने सुद्धा शेतकऱ्यांच्याच बाजूने निर्णय दिला होता. या निर्णयामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 510 कोटी रुपये इतका पीक विमा(kharip pik vima new update) हा मिळणार आहे. हा जिल्हा कोणता आहे? या विषयी विस्तृत माहिती आपण जाणून घेत आहोत.

 

या जिल्ह्यासाठी सुप्रीम कोर्टाने 510 कोटींचा पीक विमा केला मंजूर | Kharip Pik Vima 2022 Manjur पीक विमा मंजूर जिल्हे
या जिल्ह्यासाठी सुप्रीम कोर्टाने 510 कोटींचा पीक विमा केला मंजूर | Kharip Pik Vima 2022 Manjur

 

 

 

कोणत्या जिल्ह्याला मिळणार खरीप पीक विमा kharip pik vima new update:-

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा 510 कोटी रुपयांचा खरीप पीक विमा(kharip pik vima 2022) मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मोठा विजय झाला आहे. पीक विमा कंपनी ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या मध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मोठा विजय झाला आहे. त्यामुळे आता यांना 510 कोटी रुपये पीक विमा मिळणार आहे. यामुळे आता जिल्ह्यातील 3.50 लाख शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे. Kharip Pik Vima New Update, Pik Vima 2022 Manjur

 

 

हे नक्की वाचा:- खरीप पीक विमा 2022 तात्काळ 25% विमा मंजूर

 

या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा मिळावा यासाठी खूप मोठा लढा दिलेला आहे. खरतर शेतकरी हे त्यांच्या पिकांना विविध धोक्यापासून संरक्षण प्रदान व्हावे, नुकसान झाल्यास योग्य भरपाई प्राप्त व्हावी याकरिता पीक विमा काढत असतात, त्यामुळे शेतकरी बांधवांना पीक विमा मिळवा यासाठी लढा द्यावा लागणे, सुप्रीम कोर्टात जावे लागने ही, अतिशय दुःखद गोष्ट आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांवर त्यांचे स्वतःचे हक्काचे पैसे मिळविण्यासाठी पुन्हा अशी परिस्थिती आली नाही पाहिजे, असो आता हा पीक विमा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे. खरीप पीक विमा तुम्हाला मिळाला का? हे कमेंट करून सांगा.

 

हे नक्की वाचा:- जर तुमचे नुकसान झाले असेल तर, असा करा पीक विमा क्लेम (तक्रार)

पीक विमा विषयीची ही नवीन अपडेट (kharip pik vima new update) आवडल्यास नक्की शेअर करा. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment