कडबा कुट्टी मशीन मोफत वितरण योजना अर्ज सुरू | Kadba Kutti Machine Subsidy Scheme Maharashtra


मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक प्रकारच्या शासकीय योजना ह्या राबविण्यात येत असतात. कडबा कुट्टी मशीन मोफत वितरण योजना सुद्धा राबविण्यात येत आहे. या Kadba Kutti Machine Subsidy Scheme अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत घरपोच कडबा कुट्टी मशीन ही वितरित करण्यात येणार आहे. ही योजना 100% अनुदानावर राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत अर्ज सुरू झालेले आहेत. या पोस्ट मध्ये कडबा कुट्टी मशीन मोफत वितरण योजना विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.


कडबा कुट्टी मशीन मोफत वितरण योजना अर्ज सुरू | Kadba Kutti Machine Subsidy Scheme Maharashtra
कडबा कुट्टी मशीन मोफत वितरण योजना अर्ज सुरू | Kadba Kutti Machine Subsidy Scheme Maharashtraकडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत 100% अनुदान मिळविण्यासाठी अर्ज कसा करायचा? कागदपत्रे कोणती लागतात? अटी आणि पात्रता या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.Kadba Kutti Machine Subsidy


मित्रानो जे शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात, अश्या शेतकरी बांधवांसाठी कडबा कुट्टी मशीन ची फार आवश्यकता भासते, कारण की जास्त जनावरे असल्यास त्या जनावरांना चारा खाद्य जास्त टाकावे लागते, त्यामुळे आपण येवढे मोठे जनावरांचे खाद्य कापून म्हणजेच बारीक करून टाकू शकत नाहीत. त्यामुळे जर आपल्याकडे कडबा कुट्टी मशीन असेल तर आपण कमी वेळात सर्व जनावरांना खाद्य बारीक करून टाकू शकतो. शक्यतो जनावरे कडबा किंवा इतर त्यांचे खाद्य पूर्णता खात नाही ते बारीक करून टाकल्यास खातात त्यामुळे कडबा कुट्टी मशीन आवश्यक आहे. परंतु प्रत्येक शेतकरी हा कडबा कुट्टी मशीन विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने कडबा कुट्टी मशीन करीता 100% अनुदान देण्यात येणाऱ्या योजनेचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे.


कडबा कुट्टी मशीन योजना पात्रता:-

कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत जर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन मिळवायचे असेल तर तुमच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2. अर्जदार हा ग्रामीण भागात राहणारा असावा.
3. अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
4. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
5. अर्जदाराकडे दहा एकर पेक्षा कमी जमीन असावी लागते.

Kadba Kutti Machine Subsidy Scheme Maharashtra अंतर्गत वरील पात्रता असणे आवश्यक आहे.


हे नक्की वाचा:- शेतीसाठी तार कुंपण योजना अर्ज सुरू
 


कडबा कुट्टी मशीन वितरण योजना आवश्यक कागदपत्रे:-

कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. सातबारा
2. आठ अ उतारा
3. आधार कार्ड
4. बँक खाते
5. बीज बिल

वरील कागदपत्रे असल्यास आपण कडबा कुट्टी योजना अंतर्गत अर्ज करू शकतो.

कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या कडबा कुट्टी यंत्राच्या साह्याने शेतकरी जनावरांना जनावरांचे खाद्य बारीक करून टाकू शकतात. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा पशुपालक असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करावा.


हे नक्की वाचा:- महीलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज सुरू 


कडबा कुट्टी मशीन मोफत वितरण योजना अर्ज प्रक्रिया:-

कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन केल्या नंतर कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायची आहे. खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करून घ्यावा.


अर्ज ऑनलाईन करण्यासाठी येथे क्लिक करा.


अश्या प्रकारे कडबा कुट्टी मोफत वितरण योजना अंतर्गत अर्ज करून आपण कडबा कुट्टी मिळवू शकतो. ही माहिती महत्वपूर्ण असल्यास इतरांना देखील शेअर करा. अशीच माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईट वर भेट रहा.

Post a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने