बियाणे अनुदान योजना 2022 अर्ज सुरू | Biyane Anudan Yojana 2022 Maharashtra

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाणे वाटप करण्यात येत आहे. बियाणे अनुदान योजना 2022 अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळण्याकरिता अर्ज सुरू झालेले आहे. बियाणे अनुदान योजना अंतर्गत रब्बी बियाणे करिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Biyane Anudan Yojana 2022 Maharashtra अंतर्गत अर्ज कसा करायचा? त्याचप्रमाणे या योजनेबद्दल विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

बियाणे अनुदान योजना 2022 अर्ज सुरू | Biyane Anudan Yojana 2022 Maharashtra
बियाणे अनुदान योजना 2022 अर्ज सुरू | Biyane Anudan Yojana 2022 Maharashtra

 

 

 

 

बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र

आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना प्रमाणित आणि दर्जेदार बियाणे अनुदानित तत्त्वावर उपलब्ध व्हावे. याकरिता ही बियाणे अनुदान योजना 2022 महाराष्ट्र राबविण्यात येत आहे. नवीन अंतर्गत तृणधान्य पिके तसेच कडधान्य पिके यांचे नवीन वाणाचा प्रसार व्हावा व हे वान शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लावावे याकरिता बियाणे अनुदान योजना (Biyane Anudan Yojana) राबविण्यात येत आहे.

 

 

आता रब्बी हंगाम सुरू होत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामा करिता बियाण्यांची आवश्यकता पडणार आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत शेतकरी बांधवांना अनुदानावर बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे. बियाणे अनुदान मिळवण्याकरिता अर्ज करण्याची आवाहन हे करण्यात येत आहेत. Seed subsidy scheme 2022 अंतर्गत रब्बी हंगामा करिता बियाणे, तृणधान्य व कडधान्य बियाणे व ज्वारी, करडई यांचे वाटप करण्यात येणार आहे.

 

 

बियाणे अनुदान योजना 2022 अर्ज प्रक्रिया Biyane Anudan Yojana Maharashtra

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बियाणे अनुदान योजना 2022 अंतर्गत अर्ज हा Maha Dbt Farmers Portel वर ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. Biyane Anudan Yojana अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून घ्यायचे आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून अर्जाची फी सुद्धा ऑनलाईन पेड करायची आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर त्यांना संदेश प्राप्त होईल.

 

 

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना यादी जाहीर

 

 

बियाणे अनुदान योजना अर्ज कोण करू शकतो?

बियाणे अनुदान योजना (Biyane Anudan Yojana) अंतर्गत अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती त्याचप्रमाणे सर्वसाधारण शेतकरी व महिला, अल्प व अत्यल्प भूधारक या शेतकरी बांधवांनी अर्ज करायचा आहे.Seed subsidy scheme 2022

 

 

बियाणे अनुदान योजना अंतर्गत मिळणारे अनुदान

बियाणे योजना (Seed subsidy scheme 2022)अंतर्गत हरभरा पिकाकरिता हरभऱ्याच्या दहा वर्षाच्या आतील वाणास 25 रुपये प्रति किलो प्रमाणे अनुदान दिले जाते.

बियाणे अनुदान योजना(Biyane Anudan Yojana Maharashtra)अंतर्गत रब्बी ज्वारीच्या पिकाकरिता दहा वर्षाच्या वरील वाणास 15 रुपये प्रती किलोप्रमाणे अनुदान देण्यात येत आहे.

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर

 

महाबीज अकोला, कृभको अकोला,राबिनी अमरावती, के.व्ही.के.अकोला हे तालुका निहाय अधिकृत विक्रेता द्वारे बियाणे अनुदानाचे वाटप करणार आहे. Biyane Anudan Yojana अधिकृत विक्रेत्यांकडे अनुदान वजा करून प्रमाणित दराने बियाणे हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे अनुदान वजा करून बियाण्यांची खरेदी करायची आहे.

 

 

बियाणे अनुदान योजना 2022 महाराष्ट्र(Biyane Anudan Yojana 2022 Maharashtra) अंतर्गत हरभरा तसेच रब्बी ज्वारी, करडई या पिकांकरिता पीक प्रात्यक्षिक अंतर्गत महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर गावातील लॉटरीमध्ये निवड झालेल्या 25 शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

 

 

बियाणे अनुदान योजना लाभ वितरण प्रक्रिया

ज्या शेतकरी बांधवांनी बियाणे वाटप योजना( Seed Subsidy Scheme)अंतर्गत maha dbt farmers portel वर ऑनलाईन अर्ज केला आहे, अश्या शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीने अनुदान देण्यात येते. तुमच्या गावातील maha dbt पोर्टल ची लॉटरी लागल्या नंतर, तुमची निवड होते. त्यानंतर तुम्हाला बियाणे अनुदान मिळविण्यासाठी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून अनुदान वजा करून बियाण्यांची खरेदी करायची आहे.

 

 

हे नक्की वाचा:- पीक विमा यादी जाहीर

 

खरीप पीक बियाणे अनुदान पिके

बियाणे अनुदान योजना(Biyane watap Yojana) अंतर्गत खरीप पिकांच्या खालील पिकांना अनुदानावर बियाणे मिळत आहे. हरभरा, रब्बी ज्वारी व करडई इत्यादी पीके.

 

 

बियाणे अनुदान योजना अंतर्गत अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या जवळच्या कार्यालयास भेट द्यावी. शेतकरी बांधवांविषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता आपल्या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment