मतदान कार्ड आधार कार्ड सोबत असे करा लिंक ऑनलाईन | Voter Card Aadhaar Card Link Online

मतदान कार्ड आधार कार्ड सोबत असे करा लिंक ऑनलाईन | Voter Card Aadhaar Card Link Online

 

 

निवडणूक कायदा सुधारणा अधिनियम 2021 नुसार मतदारांकडून आधार ची माहिती संग्रहित करण्याकरिता सूचना प्राप्त झालेल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगाची शिफारस आणि केंद्रशासन यांच्या शिफारशी नुसार आता मतदान कार्ड ला आधार कार्ड  सोबत ऑनलाइन पद्धतीने लिंक करणे सुरू झालेली आहे. या पोस्ट मध्ये आपण मतदान कार्ड ला आधार कार्ड सोबत लिंक करण्याची ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धत पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी 1 ऑगस्ट 2022 पासून मतदान काढला आधार कार्ड सोबत लिंक करण्याची मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे. ज्या व्यक्तींचे मतदार यादी मध्ये नाव आहे अशा प्रत्येकांकडून त्यांच्या आधार कार्डची माहिती मिळवण्याकरिता मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यात येत आहे. मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केल्यामुळे डुप्लिकेट मतदान कार्डधारकांना आळा बसणार आहे. त्याचप्रमाणे बोगस मतदान कार्ड हे रद्द होणार आहे. मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याकरिता प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्र. 6 ब मध्ये भरुन देऊ शकतो.

हे नक्की वाचा:- रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा? 

मतदान कार्ड ला आधार कार्ड सोबत ऑनलाईन लिंक करण्याची प्रक्रिया Process of Online Linking of Voter Card with Aadhaar Card

मतदार कार्डला आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने लिंक करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.(Voter Card Aadhar Card Link Online)

1.मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करण्याकरिता सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ब्राउझर मध्ये जाऊन nvsp.in या वेबसाइट जा.(Voter Card Aadhar Card Link Online)
2. आता या वेबसाईट आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करायची आहे. त्याकरता तुम्हाला  नवीन रजिस्ट्रेशन करण्याकरिता Don’t have Account Register as a New User या पर्यावरण क्लिक करायचे आहे. आता तुमच्या समोर नवीन डॅशबोर्ड हा ओपन झालेला असेल. त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करायचे आहे. त्याकरिता तुम्ही Login या पर्यावर क्लिक करून तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तसेच खाली दिलेला कॅपच्या टाकून लॉगिन करून घ्या.
3. आता तुम्हाला , Information of Aadhaar Number by Existing Electors हा पर्याय दिसेल या पर्यावर क्लिक करा.(Voter Card Aadhar Card Link Online)
4. आता तुमच्यासमोर विविध प्रकारचे ऑनलाइन फॉर्म दिसत असेल. त्यामध्ये आपल्याला आपले मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्याकरिता Form 6B हा भरायचा आहे. त्यामुळे Form 6B वर क्लिक करा.
5. आता तुम्हाला Form 6B अंतर्गत सर्व माहिती भरायचे आहे.
6. आता तुम्हाला “I have Aadhaar Number” पर्यावर क्लिक करायचे आहे. आणि आता तुम्हाला तुमचा आधार कार्डचा क्रमांक तसेच ठिकाण आणि खाली दिलेल्या त्याच्या टाकून Preview क्लिक करायचे आहे.
7. Preview केल्यानंतर तुमची माहिती व्यवस्थित आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. जर सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करून घ्या.
8. आता तुम्ही मतदान काढला आधार कार्ड सोबत लिंक करण्याचा Form 6B तुम्हाला अर्ज केल्याच्या क्रमांक मिळणार आहे. त्याच्या द्वारे तुम्ही तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती चेक करू शकतात.

मतदान कार्ड ला आधार कार्ड सोबत लिंक करण्याची ऑफलाइन पद्धत Offline Method of Linking Voter Card with Aadhaar Card

अशा पद्धतीने आपण आपली मतदान कार्ड(Matdan Card) आधार कार्ड(Adhar Card) सोबत ऑनलाइन पद्धतीने लिंक करू शकतो. ही प्रक्रिया आपल्याला ऑफलाईन सुद्धा करता येणार आहे. त्याकरिता तुम्ही Form 6B चा पीडीएफ डाऊनलोड करून घ्या. Form 6B प्रिंट करून घ्या त्यावर दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा. आणि तहसील केंद्रामध्ये जाऊन सबमिट करा. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने तुमचे मतदान कार्ड तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करण्यात येईल.

हे नक्की वाचा: फेरफार काढा आता ऑनलाईन

अशाप्रकारे आपण आपले मतदान कार्ड आधार कार्ड सोबत ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने लिंक करू शकतो. ही माहिती इतरांना देखील शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment