जर तुमच्याकडे खालील वस्तू असेल तर रेशन धान्य बंद होणार | Ration Card New Update Maharashtra

मित्रांनो जर तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर, कार असेल तर तुम्हाला मिळणारे रेशन कार्ड वरील धान्य आता बंद होणार आहे. Ration Card New Update. मित्रांनो जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना रेशन कार्ड वर मिळणारे स्वस्त धान्य मुबलक उपलब्ध व्हावे याकरिता जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने विशेष नवीन अभियान हे आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असलेल्या नागरिकांनी स्वखुशीने हे धान्य सोडले पाहिजे, या करिता जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

 

जर तुमच्याकडे खालील वस्तू असेल तर रेशन धान्य बंद होणार | Ration Card New Update Maharashtra
जर तुमच्याकडे खालील वस्तू असेल तर रेशन धान्य बंद होणार | Ration Card New Update Maharashtra

 

 

 

या योजने अंतर्गत जे लाभार्थी स्वस्त धान्य( Ration Card New Update 2022 Maharashtra ) घेत आहेत, परंतु  ते सधन आहेत, अश्या लाभार्थ्यांनी हे स्वस्त धान्य न घेतल्यास इतर गरीब व गरजू लोकांना याचा लाभ मिळविता येईल, त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी आता स्वखुशीने हे स्वस्त धान्य सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी आता या स्वस्त धान्य पुरविण्यात येत असलेल्या या अन्नसुरक्षा योजनेतुन बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. तसेच या करिता अर्ज सुद्धा करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

हे नक्की वाचा:- रेशन कार्ड लिस्ट मध्ये असे करा नाव चेक

 

 

जर तुमच्याकडे ट्रॅक्टर, कार असेल तर होणार चौकशी?

आता जिल्ह्यातील लाभार्थ्यांची माहिती ही संकलित करण्यासाठी तुमच्या घरी चौकशी करण्यासाठी तलाठी येणार आहे. त्यांना तुम्हाला माहिती भरून द्यावी लागेल. त्या मध्ये तुम्हाला कुटुंबात असलेल्या एकूण व्यक्ती , कुटुंबातील सर्व व्यक्तींचे एकूण वार्षिक उत्पन्न, घरात असलेल्या वाहनांची माहिती द्यायची आहे, त्यामध्ये दुचाकी, चार चाकी, ट्रैक्टर असेल तर ही माहिती द्यायची आहे. तसेच घर पक्के आहे का याची माहिती, शेतीची माहिती जिरायत शेती आहे की? बागायत शेती आहे, ही संपूर्ण माहिती तुमच्याकडून संकलित केली जाणार आहे. आणि जर तुमच्याकडे ट्रॅक्टर तसेच कार आणि जमीन ही बागायती असेल तर तुमचे धान्य हे रद्द करण्यात येणार आहे. Ration card new update maharshtra

 

 

हे नक्की वाचा:- रेशन कार्ड डाऊनलोड करा ऑनलाईन घरबसल्या

 

जे लाभार्थी सधन असून सुद्धा स्वताहून या योजने अंतर्गत लाभ घेणे सोडणार नाहीत, अश्या लोकांची आता चौकशी होणार आहे. या लोकांच्या घरी अधिकारी स्वताहून जाऊन चौकशी करून यांचे धान्य रद्द करतील.Ration Card new update त्यामुळे जे लाभार्थी कोणत्याही शासकीय नोकरी करतील असतील, तसेच मोठे पगार असणारे खासगी क्षेत्रातील लाभार्थी यांनी सुद्धा रेशनवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडावा असे आवाहन हे करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे इतर नागरिकांनीही अशा सधन लोकांची माहिती द्यावी,त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत. रेशन धाण्यावरील आपले हक्क सोडण्यासंबंधीचे अर्ज हे स्वस्त धान्य पुरविणाऱ्या रेशन दुकानदार यांच्याकडे देण्यात आलेले आहे.

 

 

ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment